पुणे- मनसे मधून भाजपा मध्ये गेल्यावर कसब्याचे आमदार आणि पालकमंत्री असलेले भाजपचे नेते गिरीश बापट यांच्या प्रखर विरोधानंतर ना भाजपा मध्ये ना मनसे मध्ये अशी अवस्था प्राप्त होत असताना केवळ एकमेव उमेदवारी च्या अपेक्षेवर रवी धंगेकर यांचा कॉंग्रेस प्रवेश आज सायंकाळी मुंबईतील कॉंग्रेस च्या बैठकीत झाला . यावेळी पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारू असा शब्द धंगेकर यांनी दिला .
या वेळी पृथ्वीराज चव्हाण ,कृपाशंकर सिंग,अशोक चव्हाण , रमेश बागवे, पतंगराव कदम , विश्वजित कदम,अभय छाजेड , मोहन जोशी ,शैलेश टिळक ,वीरेंद्र किराड आदी मान्यवर उपस्थित होते . या प्रवेशानंतर राष्ट्रवादीशी आघाडीबाबत चर्चा सुरु झाली आहे .