पुणे -शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने SC/ST/OBC चे आरक्षण केंद्रातील
भाजप सरकार रद्द करण्याच्या तयारीत असून या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालय,
पुणे येथे आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘काँग्रेस पक्षाने दलित,
मागासवर्गीय व आदिवासी यांच्या विकासासाठी सबप्लॅन करून निधीची व्यवस्था केली
होती. भाजपा सरकारने सबप्लॅन नष्ट केला त्याचप्रमाणे मागासवर्गीयांच्या ९०% नोकऱ्या
कमी केल्या. समाजकल्याणचा जो निधी होता तो पण SC/ST/OBC चा कमी केला.
केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर दलित व मुस्लिमांवरती हल्ले, अत्याचार, मोबलिंचिग,
गो वंश हत्या या नावाखाली त्रास देण्याचे काम चालू आहे.
मोदी मनुवादी विचाराने काम
करतात आणि केंद्रातील मंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच
सरसंघचालक मोहन भागवत, मनमोहन वैद्य, गिरीराज सिंग तसेच साध्वी प्रग्यासिंग हे
वारंवार आरक्षण बंद झाले पाहिजे अशा पध्दतीची मागणी असलेले जाहिर भाषणे करतात.
एकंदरितच भाजपाचा गोरगरीब जनतेच्या विरोधातील अंजेडा आहे. गेल्या ७० वर्षात काँग्रेस
पक्षाने पूर्ण बहुमत असताना देखील आरक्षणाला हात लावला नाही. डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी लिहिलेली घटना व त्यातील संविधान टिकले पाहिजे अशा प्रकारचे राज्य
काँग्रेस या देशावर केले. केंद्रातील मोदी सरकारने SC/ST/OBC च्या आरक्षणाला धक्का
लावला तर आम्ही रत्यावर उतरून विरोध करू.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यावेळी म्हणाले की,
‘‘केंद्रात भाजपाचे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या देशामध्ये भाजपाने घटनेची
पायमल्ली करण्याची सुरूवात केली. संविधानातील छोट्या छोट्या गोष्टींचा अनार्थ लावून
कोर्टामध्ये चूकीची व खोटी माहिती देऊन वेळप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाची दिशाभुल
करून आरक्षण नष्ट करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशारावरून मोदी
– शहा जोडगोळी करीत आहे. परंतु काँग्रेसचे कार्यकर्ते घटनेची ही पायमल्ली कदापीही सहन
करणार नाहीत. या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.’’
यानंतर अनुसूचित विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष गौतम अरकडे, प्रदेश चिटणीस संजय
बालगुडे, नगरसेवक अविनाश बागवे, गोपाळ तिवारी, मागासवर्गीय विभाग महिला अध्यक्ष
सौ. कल्पनाताई भोसले, ॲड. राजश्री अडसुळ आदींची भाषणे झाली.
यावेळी कमल व्यवहारे, गटनेते अरविंद शिंदे, वीरेंद्र किराड, अजित दरेकर, साहिल
केदारी, शिलार रतनगिरी, राजेंद्र शिरसाट, जयसिंग भोसले, बुवा नलावडे, शेखर कपोते,
विठ्ठल थोरात, सुरेखा खंडागळे, संगीता पवार, रजनी त्रिभुवन, मीरा शिंदे, भगवान धुमाळ,
राजेश शिंदे, हरजितसिंग बेदी, उस्मान तांबोळी, सईदभाई, रॉबर्ट डेव्हिड, सुजित यादव,
प्रकाश पवार, मिलिंद काची, किशोर वाघेला, चंदू चव्हाण, राजू अरोरा, केविन मॅन्युअल,
राजेंद्र पेशने, अस्लम बागवान, सरेश कांबळे, प्रविण करपे, रमेश सकट, प्रदिप परदेशी,
सुनिल घाडगे, रमेश सोनकांबळे, सचिन आडेकर, शोएब इनामदार, बाबा नायडु, रवि पाटोळे,
प्रशांत सुरसे, अरूण गायकवाड, राधिका मखामले, कल्पना उनवणे, संजय कवडे, भगवान
कडू, यासीर बागवे, हर्षद बोराडे, विलास कांबळे, रावसाहेब खवळे, नुरूभाई, खिलारे, लतेंद्र
भिंगारे, दयानंद अडागळे, देवीदास लोणकर, अजय खुडे, बाळा गायकवाड, राहुल पाटोळे,
बिपीन पाटोळे, छाया जाधव, रिबिका कांबळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले तर आभार संगीता तिवारी
यांनी मानले.



