पुणे- नथूरामचे गोडवे गाणाऱ्या, त्याचे मंदिर बनवू पाहणाऱ्या ,सामाजिक सलोखा उध्वस्त करणाऱ्या पक्षाच्या , संघाच्या सेवकांच्या पाठीशी धनकवडी राहणार काय ? असा सवाल शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांनी येथे केला .
धनकवडी प्रभाग क्रमांक ३९ मधील काँग्रेस पक्षाकडून इचुउक असलेल्या उमेदवार डॉ . क्रांती नितीन हंबीर यांनी दुर्वांकुर मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते . अभय छाजेड, श्रीरंग आहेर , लक्ष्मीबाई सातपुते, अनिल सातपुते , श्रीरंग चव्हाण , अशोक लोधी आदी कार्य्कारे यावेळी उपस्थित होते.
श्रीरंग आहेर यांनी यावेळी , काँग्रेस ने धनकवडीतील पक्षातील मरगळ दूर करण्यासाठी नेत्यांनी येथील कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे . असे सांगितले तर सातपुते यांनी आतापर्यंतच धनकवडी चा विकास हा सुरेश कलमाडी असताना कॉंग्रेसनेच केलेला आहे याकडे लक्ष वेधून कलमाडींच्या अस्तानन्तर मात्र पाहिजे तसा विकास झाला नाही .असा आरोप केला आणि पिण्याच्या पाण्याची येथील समस्या देखील काँग्रेस नेच दीप्ती चौधरी , दत्ता गायकवाड महापौर असताना च पूर्णपणे सोडविली होती याची आठवण करून दिली .
पहा या कार्यक्रमाची व्हीडीओ झलक …