पुणे–माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर कदम यांच्या पार्थिवावर सांगलीतील वांगीमध्ये असलेल्या सोनहिरा साखर कारखाना परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
एक निष्ठावंत शिल्पकार गमविला:रमेश बागवे
डॉ.पतंगराव कदम यांनी अनेक कठीण समस्यांना तोंड देऊन आपले शिक्षण पूर्ण केले आणि संपूर्ण देशात भारती विद्यापीठ संस्थचे नाव उंचावले. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करून दाखवली. काँग्रेस पक्षाने त्यांना दिलेल्या अनेक मोठमोठ्या जबाबदा-या त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने एक निष्ठावंत शिल्पकार गमविला. अशा शब्दात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मोठे साम्राज्य उभे करणारा साधा नेता हरपला : अॅड. वंदना चव्हाण
पतंगराव कदम यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आहे. अतिशय गरिबीतून त्यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक साम्राज्य उभे केले. त्यामागे त्यांची कामावरील अविचल निष्ठा दिसून येते. इतके मोठे साम्राज्य उभे करून ते अत्यंत साधे होते. सर्वांशी प्रेमाने वागायचे. अत्यंत मिनमिळावू असलेल्या या नेत्याच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
माजी खासदार सुरेश कलमाडी –
ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रातून एक लोकनेता हरपला. ते माझे चांगले मित्र होते. सांगली आणि पुणे या शहरांच्या विकासात त्यांनी भरीव योगदान दिले. राजकीय क्षेत्रासोबतच शैक्षणिक, सामाजिक, सहकार अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तबगारीने मोठा ठसा उमटवला. हजारो कार्यकर्त्यांना घडवत असताना त्यांनी लाखो तरुण-तरुणींना शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र दुरदृष्टीच्या आणि खंबीर नेतृत्वास मुक




