नवी दिल्ली – काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर नवज्योत सिंग सिंद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
नवज्योत सिंग सिद्धू आम आदमी पार्टीमध्ये जातील अशी चर्चा होती, परंतु ‘आप’मध्ये मनासारखे पद न मिळाल्याने सिद्धू यांनी ‘आप’ची वाट सोडली.पंजाबमधील राजकारणात महत्त्वाची जाबाबदारी न मिळाल्यामुळे सिद्धू नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकून आपला मोर्चा ‘आप’कडे वळवला मात्र तेथेही महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची चिन्हे नसल्याने त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.