तिसरी लाट थोपविण्यासाठी कोविड नियमांचे अनुपालन आवश्यक – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Date:

मुंबई, दि. २२ : आपल्या देशात राजा हरिश्चंद्र व महर्षी दधिची यांनी दातृत्वाचे आदर्श समाजापुढे ठेवले आहेत. कोरोना काळात समाजबांधवांना मदत करून या परंपरेचे पाईक असल्याचे कोरोना योद्ध्यांनी दाखवून दिले. देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका कायम असल्याने ही लाट थोपविण्यासाठी अहर्निश जागरूक राहून मास्कचा वापर, परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखणे आदी कोविड नियमांचे अनुपालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.

दहिसर विधानसभा क्षेत्रातील ४५ कोरोना योद्ध्यांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २२) राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी व मंडळ प्रमुख अरविंद यादव व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाला दहिसर येथील नगरसेवक व कोरोना योद्धे उपस्थित होते.

कोविड -१९ अद्यापही आहे, हे लक्षात घेऊन परस्परांना सहयोग व नियमांचे पालन केल्यास कोरोनावर नियंत्रण तर मिळेलच आणि देशही अधिक प्रगती करेल असे राज्यपालांनी सांगितले. मार्च ते नोव्हेंबर २०२० या काळात दहिसर येथील गरजू लोकांना खिचडी वाटप, महिन्याचे सामान, मास्क, सॅनिटायझर आदी आवश्यक वस्तू पुरविल्याबद्दल राज्यपालांनी मनिषा चौधरी यांचे अभिनंदन केले.

राज्यपालांच्या हस्ते अनिल कान्तीप्रसाद पोद्दार, रमेश शहा, चिराग दोषी, मार्क डिसुझा, बिना शाह, नटवरलाल पुरोहित, हरीश कुमार जैन, आदीं कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पंतप्रधान आवास योजनेतील सव्वाचार कोटीच्या घोटाळ्यावर मुनगुंटीवार आक्रमक

'तारीख पे तारीख' नको, थेट निलंबन करा! सुधीर मुनगंटीवारांचा...

हुंडाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व जिल्हास्तरावर विशेष पथके तैनात करा- डॉ. गोऱ्हे

बुलढाणा-बाणेर येथील विवाहितांच्या आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी व कठोर...

१० लाख रुपयांची X रे मशीन ६१ लाखांना खरेदी केली-आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या काळात गैरव्यवहार :मनसे

मुंबई-महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी...

४ वर्षेच का मुंबई महापालिका अर्थकारणाची २५ वर्षाची चौकशी होऊ द्यात -भाजप आमदार अमित साटम

मुंबई मनपा चौकशीवरून भाजप-सपा आमने-सामनेमुंबई- महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विधानसभा...