पुणे, ता. २६ – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव माजी विद्यार्थी महसूल अधिकारी अजित लिमये यांच्या हस्ते करण्यात आला. या वर्षी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. चाळीस विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण आणि १८३ विद्यार्थ्यांना विशेष योग्यता श्रेणी प्राप्त केली. वेदांत बाचल, आर्य लडकत, श्री. गुळुंबे यांनी गुणानुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले. शाला समितीचे अध्यक्ष विधिज्ञ अशोक पलांडे, प्रभारी मुख्याध्यापक दिलीप रावडे, पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार यांनी मार्गदर्शन केले.

