विषयप्रदान मालिका आणि दर्जेदार कार्यक्रम देणारी वाहिनी अशी ओळख घेऊन कलर्स मराठी वाहिनीने आपली वाटचाल सुरु केली. गेल्या काही दिवसात महाराष्ट्राची लाडकी वाहिनी म्हणून कलर्स मराठी पुढे येत आहे. प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या या प्रेमासाठी त्यांचे आभार मानायला कलर्स मराठीचे कलाकार राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रेक्षकांची भेट देणार आहेत. आज ‘सरस्वती’ या मालिकेतील कलाकार माधव देवचाक्के, संग्राम साळवी, आस्ताद काळे आणि मयुरी कापडणे यांनी पुण्यातील प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी शहराला भेट दिली.
प्रत्येक मालिकेत प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव मिळावा यासाठी कलर्स मराठी कायम सतर्क होते. प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ कार्यक्रमातील कलाकार कायम निरनिराळे प्रयोग करीत असतात तर ‘मेजवानी’ या कार्यक्रमात थेट प्रेक्षकाना देखील सहभागी केले जाते. ‘दर्शन’या कार्यक्रमात परमेश्वरावरील आस्था आणि विश्वास याची प्रचीती येते तर आगामी ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या लावणीचे आधुनिक रुपात सदिरीकरण आहे. एकीकडे ‘अस्सं सासर सुरेख बाई’ सारखी हुळूवर फुलणाऱ्या नात्यांची गोष्ट आहे तर दुसरीकडे एक वेगळेच नाट्य असणारी ‘कमला’ ही मालिका आहे. ‘सरस्वती’ ही मालिका एका खेडेगावातल्या मुलीची गोष्ट आहे तर आगामी मालिका ‘किती सांगायचय मला’ ही शहरात राहणाऱ्या आधुनिक काळातील कार्यक्षम मुलीची गोष्ट आहे. ‘तू माझा सांगाती’ सारखी ऐतिहासिक मालिका असो अथवा ‘गणपती बाप्पा मोरया’ सारखी पौराणिक मालिका असो, प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कुठलेही शिवधनुष्य पेलण्याची तयारी कलर्स मराठीने कायम दाखवली आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मानाचे मानले जाणारे असे महाराष्ट्र राज्य शासन चित्र पुरस्कार, ‘इम्फा’ पुरस्कार किंवा ‘फिल्मफेयर’ पुरस्कार असो, मराठी मनोरंजन सृष्टीच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर कलर्स मराठी एक खंबीर आधारस्तंभ म्हणून उभे राहिले आहे. पुणे फेस्टिवल सारखा उपक्रम असो अथवा वैशाली सामंत, अवधूत गुप्ते सारख्या कलाकारांचे लाइव काँन्सेर्ट असो कलर्स मराठी त्याला एक वेगळा दर्जा मिळवून दिला.
या प्रसंगी बोलतांना कलर्स मराठीचे प्रमुख अनुज पोद्दार, म्हणाले, “प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा ध्यास घेऊन कलर्स मराठीने आपली वाटचाल सुरु केली. उत्तमोत्तम आणि दर्जेदार कार्यक्रम प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी आम्ही कायम झटत असतो. आमच्या मालिका आणि कथाबाह्य कार्यक्रम प्रेक्षकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनत चालल्या आहे. आम्ही करत असलेल्या कामाची दखल मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनी घेतली आणि आमच्या उत्साहात भर पडली. आज मराठी मनोरंजन क्षेत्रात मोठ्या दर्जेदार कार्यक्रमांच्या आयोजनासाठी कलर्स मराठी वाहिनी हे सर्वोत्तम व्यासपीठ मानले जाते आहे. यशाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेक्षकांचे निस्सीम प्रेम आम्हाला लाभले. आम्ही करत असलेल्या चांगल्या कामाची पावती आम्हाला वेळोवेळी प्रेक्षकांनी दिली. महाराष्ट्राच्या मायबाप प्रेक्षकांनी आम्हाला दिलेल्या प्रेमासाठी आम्ही कृतार्थ आहोत. आणि म्हणूनच आमचे हे यश आम्ही महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसोबत साजरे करायचे ठरवले. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील शहरांमध्ये निरनिराळे कार्यक्रम आयोजित करून आमच्या प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या कलाकारांशी थेट संवाद साधण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. या कार्यक्रमांना जो उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आहे त्यासाठी देखील आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत.”

