CM शिंदेंचा दणका:941 कोटींच्या कामांना स्थगिती, बारामतीमधील कामांनाही ब्रेक,पवारांना केले टार्गेट

Date:

मुंबई-941 कोटींच्या नगर विकास विभागांच्या कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्थगिती दिली आहे. विशेष म्हणजे यापैकी तब्बल 245 कोटींची कामे ही बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून होणार होती. यामुळे हा विरोधी पक्षनेते अजित पवारांना धक्का मानला जात आहे. असे असताना मात्र शिवसेनेच्या आमदारांना सॉफ्ट कॉर्नर देण्यात आला आहे.

मार्च 2022 ते जून 2022 या काळात मविआ सरकारने हा निधी मंजूर केला होता. मात्र, आता अजित पवारांच्या मतदारसंघात कामांना ब्रेक लागणार आहे. यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांना मंजूर झालेला निधीलाही स्थगिती दिली आहे. शिंदे सरकारने यापूर्वीही अशी भूमिका महानगरपालिकेच्या निधी संदर्भात घेतली होती.

काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुचवलेली कामे यांना एकनाथ शिंदे सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. मात्र शिवसेनेच्या आमदारांच्या कामांना कोणतीही स्थगिती देण्यात आली नाहीये. सत्तांतर झाल्यानंतर शिंदेंकडून मविआ सरकारच्या निर्णयावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. एका निर्णयातून नव्या सरकारने दोन ठिकाणी निशाणा लावला आहे.

शिवसेनेच्या आमदारांना राष्ट्रवादीकडून निधी दिला जात नव्हता असा आरोप करत शिवसेनेच्या आमदारांसह एकनाथ शिंदेंनी बंड केले होते. मात्र विधानभवनातील भाषणात अजित पवारांचे शिंदेंनी खूप कौतुक केले होते. यानतंर मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना देण्यात येणाऱ्या निधीला स्थगिती दिली असून यातून नाराज गटाला आपल्यासोबत ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...