पुणे-आघाडीचे सरकार असताना ,आपण दिलेल्या माहितीवरून फडणवीस आणि त्यांचे सहकारी विधानसभेत सरकारला धारेवर धरून संबधितांवर कारवाई करायला भाग पाडत .मग आता त्यांच्याच सरकार मधील आमदारावर कारवाई करण्याचे धाडस दाखविण्याऐवजी तक्रारदार म्हणून माझीच का चौकशी करत आहेत.
त्यांचे सरकार नसताना त्यांना तेव्हा चालत होते ते आता का चालत नाही ? असा सवाल …भाजप आमदार टिळेकर यांच्या विरोधात खंडणीची तक्रार देणाऱ्या कंपनीच्या रवी बराटे या तथाकथित आरटीआय कार्यकर्त्याने आज माध्यमांशी बोलताना केला आहे .तर व्हायरल क्लिप मध्ये आपण पाया पडताना दिसतो आहे , आपणास जाताना वडिलधाऱ्या माणसाच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची सवय आहे. याचा अर्थ गुन्हा केला म्हणून माफी मागितली असा घेवू नये ,असे स्पष्टीकरण भाजपचे आ.योगेश टिळेकर यांनी माध्यमांना दिले आहे.
आ. टिळेकर यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झालेले हे प्रकरण सर्वप्रथम सोशल मिडियावर मोठ्ठे व्हायरल करण्यात येते आहे .टिळेकर आणि तक्रारदार कंपनीचे एक वरिष्ठ यांच्यातील मोबाईलवर झालेले संभाषण प्रथम व्हायरल झाले होते .आज टिळेकर हे तक्रारदार कंपनीच्या आणि त्यांच्या तथाकथित मित्राच्या
पाया पडत असतानाचे सीसी टीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर आज पुण्याच्या राजकीय क्षेत्रात पुन्हा आ. योगेश टिळेकर यांच्या बद्दलची चर्चा उसळून आली आहे.
याचा अर्थ मी गुन्हा केला आणि माफी मागतो असा काढू नये ,मला भेटून जाताना वडीलधाऱ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची सवय आहे .मी त्यांना ,’ माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून माझी राजकीय कारकिर्दीला बट्टा लावू नका अशी विनंती केली असा खुलासा आ. टिळेकर यांनी केला आहे .
तर याबाबत रवी बराटे यांनी मात्र , तक्रार मागे घ्यावी यासाठी ते पाया पडले असा दावा केला आहे .मात्र ते कितीही रडले काढले तरी आपण तक्रार मागे घेणार नाही असे सांगत बराटे म्हणाले कि ,’आपण हे सीसीटीव्ही फुटेज आज माध्यमांपुढे आणले त्यास कारण आहे . पूर्वी आघाडीचे सरकार असताना फडणवीस यांच्याकडे आपण सरकारमधील लोकांच्याबाबत तक्रारी देत असू तेव्हा ते विधानसभेत मांडून त्यावर कारवाई करवून घेत आणि आता त्यांचेच सरकार असताना मात्र आता कारवाई ऐवजी तक्रारदार यांचीच चौकशी का करण्यात येते आहे ?
पहा आणि ऐका नेमके कोण काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात …