मुख्यमंत्री आणि राष्ट्रपती देखील जनतेतूनच निवडा … अजित पवारांचा फडणवीसांना टोला

Date:

बारामती :  ‘तुम्ही नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय करता, तर मुख्यमंत्रीही थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय करा. तसंच पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष इतकेच नव्हे तर राष्ट्रपतिपदाची निवडणूकही अशीच घ्या,’ असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला आहे. ते बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयावर निशाणा साधताना अजित पवार म्हणाले की, ‘थेट जनतेतून नगराध्यक्ष, सरपंच निवडीमुळे राज्यातील काही ठिकाणी नगराध्यक्ष आणि सरपंच वेगळ्या विचारांचे आणि खालील सदस्य मात्र वेगळ्या विचारांचे, असं होतं. त्यावेळी नगराध्यक्ष इतर नगरसेवकांना विचारात घेत नाही. कोण्या एकाच व्यक्तीकडे तेथील सत्ता केंद्रित होते, जे लोकशाहीला मारक ठरते.’राज्य सरकारने बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना मतदान करण्याचा हक्क देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचं स्वागत करत असताना अजित पवार यांनी काही शंकाही उपस्थित केल्या आहेत. ‘शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. मात्र निवडणुकीचा खर्च बाजार समितीला करावा लागणार आहे. राज्यातील अनेक बाजार समित्या एवढा खर्च पेलू शकणार नाही. खर्च झेपणार नसेल तर निवडणुका थांबवणार का? हा निर्णय बदलण्याचे कारण काय?’ असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बांधकाम कामगारांसाठी गोदरेज प्रॉपर्टीजचा ‘गोदरेज सहयोग’ हा मानसिक आरोग्य उपक्रम

पुणे - भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट विकासकांपैकी एक असलेल्या गोदरेज...

मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई -महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी...

वगनाट्याची ‘परंपरा आणि योगदान’ सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारे लोककला अभ्यासकांचे चर्चासत्रात प्रखर मत..

मुंबई – लोकसंस्कृतीच्या समृद्ध परंपरेत तमाशा कलेने समाजमनावर कोरलेली...

उद्या 12 झेडपी, 125 पंचायत समित्यांसाठी मतदान:2193 जागा, 7438 उमेदवार; 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 मतदार करणार फैसला

मुंबई-राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या...