पुणे: राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. त्या लवकरच भाजप प्रवेश करणार आहेत. ..
सचिन अहिर यांच्यानंतर मुंबईत राष्ट्रवादीला आणखी खिंडार पडल्याचे दिसते. राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले प्रसाद यांच्या मध्यस्थीतून मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ भाजपात प्रवेश करणार आहेत. सोबतच माजी मंत्री मधुकर पिचड यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचडही भाजपात डेरेदाखल होणार आहे. अकोल्यातील अनेक पिचड समर्थकांनी राष्ट्रवादीतील पदाचा राजीनामा देण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसचे मुंबईतील वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर हे सुद्धा ३० जुलै भाजपात प्रवेश करतील.
काँग्रेसमधील तीन विद्यमान आमदार भाजपात प्रवेश करत आहेत. साता-यातील माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, सावनेरचे आमदार सुनील केदार आणि गोंदियातील आमदार गोपाळदास अग्रवाल हे सुद्धा ३० जुलै रोजी भाजपवासी होणार असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.
आघाडीतील अनेक नेते भाजपा जात असून, येत्या ३० जुलैला त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. १ ऑगस्टपासून मुख्यमंत्री यांच्या महाजनादेश यात्रेला प्रारंभ होत आहे. त्याआधीच आघाडीतील अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश उकरणार असल्याचे कळते.


