कर्वेनगर: येथील कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन अभ्यासक्रम विभागामार्फत विविध मानसिक आजारावरील उपचार पद्धतींवर मार्गदर्शनपर एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच पार पडली.
संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर, सी.एस.आर व समुपदेशन विभागचे मानद संचालक प्रा महेश ठाकूर व समन्वयक प्रा चेतन दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत पुण्याच्या प्रसिद्ध समुपदेशक डॉ अनुराधा करकरे व सहकार्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मानसिक आजारामध्ये तज्ञांकडून वापरण्यात येणाऱ्या विविध उपचार पद्धतीविषयी मार्गदर्शन केले.
वैयक्तिक, समूह व कुटुंबाशी निगडीत सामाजिक, मानसिक, मानसशास्त्रीय, मनोसामाजिक व इतर एकत्रित समस्यांची उत्क्रांती, व्यक्तिगत व कुटुंबातील कलहाची मानसशास्त्रीय व मनोसामाजिक कारणे तसेच या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मानसोपचार तज्ञांकडून वापरण्यात येणाऱ्या विविध उपचार पद्धतींची रोल प्ले व प्रात्याक्षिकंच्या माध्यमातून यावेळी मांडणी करण्यात आली.
कार्यशाळेचे आयोजन प्रा महेश ठाकूर व प्रा चेतन दिवाण यांनी केले, प्रास्ताविक व स्वागत डॉ श्रुती आफळे व शीतल कुटे यांनी केले, सूत्रसंचालन राखी त्रिवेदी यांनी केले तर आभार दीपक चोपडे यांनी केले.