पुणे- धरणात कितीही पाणी असो , कितीही पाउस झालेला असो ,उन्हाळा लागला कि पाणी टंचाई च्या झळा बसायला लागतात आणि उन्हाळ्यातच पाणीपुरवठा खाते दुरुस्तीची कामे काढून नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवते अशा स्थितीत खासदार गिरीश बापटांनी पुण्यात कमी अधिक दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठा विषय चव्हाट्यावर मांडला आणि आक्रमक पाउल उचलत कालवा समितीच्या बैठकीतून ४० वर्षात पहिल्यांदा सभात्याग केला आणि दुसर्या दिवशी आयुक्तांच्या बंगल्यातील नळाला येणाऱ्या पाण्याचे प्रेशर पाहायला थेट बंगल्यावर धडक मारली . या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी मात्र बापटांवर टीकेची झोड उठविली आहे , ते म्हणाले आयुक्तांच्या बंगल्यातले काय पाहता , पाहायचेच आहे तर तब्बल २ वर्षे स्थायी समिती अध्यक्ष आणि ३ वर्षे महापौर पद भूषविलेल्या मुरलीधर मोहोलांच्या घरातील पाण्याचे प्रेशर तपासा , पहा त्यांना कुठे कधी काही कमी पडलेय काय ?
काकडे यांनी असेही म्हटले आहे कि,’ म हानगरपालिकेत गेली पाच वर्षे भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद बहुमत होतं, त्यांची सत्ता होती तेव्हापासून पुण्याच्या पाणीपुरवठ्यात खंड पडत आहे, अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने मिळत आहे ही वस्तुस्थिती आपली भाजपची कारकीर्द संपल्यानंतर गिरीश बापट यांच्या लक्षात आली हे आश्चर्य आहे. परवा त्यांनी आयुक्तांच्या घराची पाहणी केली, माझी त्यांना विनंती आहे की माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या घरात किती दाबाने पाणी येते ते देखील त्यांनी पाहावे आणि जनतेला सांगावे. भाजपच्या गेल्या पाच वर्षातील आपल्या अपयशी कारकिर्दीची ठपका आता महापालिका आयुक्त यांच्या वर ठेवून काही उपयोग नाही. येणाऱ्या महानगरपालिकेत निवडणुकीत पुणेकर जनता गेल्या पाच वर्षातील भा ज पा चा महापालिका कारभार पाहून तुम्हाला घरी पाठवेल यात शंका नाही. असेही अंकुश काकडे यांनी म्हटले आहे.

