पुणे- बारावीच्या निकालानंतर दहावीच्या परीक्षेत देखील आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवून चाटेंच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले .दहावीचा निकाल जाहीर होताच आज सातारा रस्त्यावरील चाटे क्लासेस येथे विद्यार्थी आणि पालक यांची एकच गर्दी उसळली , हातात पुष्पगुच्छ,पेढ्यांचा बॉक्स आणि चेहऱ्यांवर ओसंडून वाहणारा आनंद यामुळे येथील वातावरण चैतन्यमय बनले होते. हि शेवटची परीक्षा नाही .. .. असे सांगत का होईनात पण सर आणि शिक्षक देखील पालक आणि विद्यार्थी यांच्या आनंदात सहभागी होताना दिसत होते . मोबाईलवर फोटो काढणे ,सेल्फी घेणे पेढे भरविणे या साऱ्यांचा या वातावरणात खच्चून समावेश होता .
चाटेंच्या समुहाने १०० टक्के यश संपादन केले आहे . अथर्व कुलकर्णी या विद्यार्थ्याला तब्बल 99.80टक्के गुण मिळाले तो या समूहातील पहिल्या क्रमांकाचा विद्यार्थी ठरला .तर सुतार जानव्ही ला ९८ टक्के गुण मिळाले . पालक ,विद्यार्थी शिक्षक अशा तिघांच्या मेहनतीचा हा त्रिवेणी संगम आहे , मात्र हि परीक्षा शेवटची नसली तरी ..पुढील परीक्षांना आपण लीलया पेलू ..असे आव्हान देणारे बळ निश्चित देवून जाणारी आहे असे सांगून प्रा. फुलचंद चाटे यांनी बदल्यात्या शिक्षण पद्धतीचा सामना करा आणि प्रगती करा अशा शुभेच्छ्या विद्यार्थ्यांना दिल्या . चाटे समूहाच्या प्रा . फुलचंद चाटे ,प्रा. विजय बोबडे ,बाप्पू काटकर ,समर जमादार,रत्नाकर सोनवणे आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छ्या दिल्या .


