पुणे:-
चाटे शिक्षण समूहाच्या 2017-18 मध्ये दहावी बारावी व स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा अण्णाभाऊ साठे सभागृहात संपन्न झाला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाटे समुहाचे चेअरमन प्रा. गोपीचंद चाटे तसेच संचालक प्रा. फुलचंद चाटे, पुणे विभागाचे विजय बोबडे व प्रा. बापू काटकर यासह खुप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक उपस्थित होते,
कार्यक्रमाचा शुभारंभ शर्वरी जेमनिस यांच्या गणेश वंदनांने झाली, प्रास्ताविक विजय बोबडे यांनी केले.
सीईटी स्पर्धा परीक्षेत राज्यातून दुसरा क्रमांक प्राप्त अमेय झरकर सर्वांचा प्रेरणा ठरला,यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच मिळत असलेल्या शिक्षण पध्द्ती, सिक्युरिटी, सेवा सुविधामुळेच यश प्राप्त होत असल्याचे सांगितले
चाटे समूहाचा सीईटी मध्ये राज्यात द्वितीय आलेला अमेय झरकर- ज्ञानाचा झरा असलेला झरकर, सीईटी मध्ये मिळालेल्या यशाने आनंदाचा मोठा धक्का बसला, या उत्तुंग यशात आई-वडील, बहीण, चाटे सर तसेच शिक्षकानी याविद्यार्थ्यांना दिलेला पाठिंबा व शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले, मन शांत ठेऊन अभ्यास केल्यानंतर यश मिळत असतात. मोजकाच अभ्यास तसेच शालेय पाठय पुस्तकातील अभ्यासक्रमाचा अभ्यास करावा. वर्गातील उपस्थिती, चुकांचा अभ्यास, बारावीची परीक्षा व स्पर्धा दोन महिन्याचा वेळ कारणी लावली. टाईम मॅनेजमेंट व वेळ तपासून पेपर सोडवले, मानसिक स्थिती सांभाळत मानसिक आधार, घरचे जेवण, आरोग्य सांभाळताना छंद देखील जोपासले असल्याचे अमेय झरकर याने सांगीतले.
पहा या सत्कार सोहळ्याची एक झलक

