‘चंदन ही चंदन’… या हिंदी अभंग मैफिलीत रसिक तल्लीन.

Date:

पुणे – प्रभू मैने गिरवी रखे काया वाणी मन, आप ज्ञानीयोंके राजा, हे देव तू करूणासिंधू ..तू ही माईबाप, कितना प्यारा कितना सुंदर खडा है ईश इष्टीकासन पर . . अशा एकाहून एक सरस अभंगांनी अवघे सभागृह विट्ठलमय झाले . चंदन ही चंदन’ हा तुकोबा रायांच्या मराठी अभंगांचा हिंदी अनुवाद असलेला कार्यक्रम ओंकार एंटरटेनमेंट या संस्थेतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नुकताच पार पडला. उस्मानाबाद विद्यापीठातील निवृत्त शिक्षक प्रा. वेदकुमार वेदालंकार यांनी हिंदी भाषेत पद्यानुवादीत केलेले तुकोबारायांच्या तीन खंडांपैकी काही निवडक अभंग कार्यक्रमात सादर केले गेले. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सुप्रसिध्द गायक राहुल देशपांडे आणि युवा गायिका शरयु दाते यांनी अतिशय सुरेल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात तमाम पुणेकरांच्या वतीने राहुल देशपांडे यांचा राष्ट्रीय पुरस्कारा प्रित्यर्थ स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी जेष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, गुरुवर्य वेदकुमार वेदालंकार, नवभारत नवराष्ट्रचे सेल्स प्रमुख औदुंबर धनवट, मिलिंद लेले, माजी आमदार मेधा कुलकर्णी, चित्रपट निर्माते मेघराज भोसले,कविता जोशी, अमर जोशी, श्वेता मेंढेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे कलात्मक दिग्दर्शन सुनंदा काळुसकर यांनी केले.

चंदन ही चंदन… हा अनुवादित अभंगांचा कार्यक्रम पहिल्यांदाच सादर झाला असून याचे आयोजन, संकल्पना, निर्मिती व संगीत दिग्दर्शन प्रतिभा नागेश मेंढेकर यांचे होते. निखिल फाटक (तबला), आदित्य ओक हर्मोनियम), अनय गाडगीळ (की बोर्ड) प्रसाद जोशी (पखावज) रोहन वणगे (साईड ह्रिदम) आणि सुनिल अवचट (बासरी) यांनी साथ संगत केली होती. निवेदन मिलिंद कुलकर्णी आणि संयोजन विनायक पाष्टे यांनी केले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवजयंतीनिमित्त स्वच्छतेचा संकल्प – ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’चा भव्य शुभारंभ

पुणे: आज १९ फेब्रुवारी, शिवजयंतीच्या पावनदिनी पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन...

देशातील अगदी तळागाळातील माणसापर्यंत एआय साधने पोहोचणे आवश्यक: टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन

लवकरच एआय बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये मानवी क्षमतेला मागे टाकून...

एमआयटी डब्ल्यूपीयूतील २८० वर्गांमध्ये उलगडलाछत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा

देशात प्रथमच अनोखा प्रयोगः किल्ल्यांचे प्रदर्शन, रक्तदान शिबिर, ग्रंथ...