केंद्रीय लघू व मध्यम उद्योग मंत्री-नारायण राणे

Date:

नवी दिल्ली -केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला असून एकूण ४३ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्राच्या चार मंत्र्यांचा समावेश आहे.आजच नव्या मंत्र्यांचे खाते वाटपही जाहीर झाले असून, यामध्ये नारायण राणेंना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, रावसाहेब दानवे यांना आता रेल्वे राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. कपिल पाटील यांना पंचायतराज राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर, मराठवाड्यातील भाजपा नेते भागवत कराड यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. याचबरोबर भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.केंद्रीय सहकार विभागाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अमित शाह यांच्याकडे सहकार विभागाचा अतिरिक्त भार असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज्ञेप्रमाणे काम करू

प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी चार व्यक्तींचे प्रामुख्याने आभार मानले असून त्यांचे ऋणी असल्याचं सांगितलं आहे. “आज मी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे. त्यांच्यामुळेच मी आज मंत्री बनलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी जबाबदारी देतील, ती मी संभाळेन”, असं राणे यावेळी म्हणाले.आपण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज्ञेप्रमाणे काम करू, असं देखील राणेंनी यावेळी नमूद केलं. “सुरुवातीला मुंबई पालिकेत १९८५ मध्ये नगरसेवक झालो. मग बेस्टमध्ये चेअरमन झालो. मग आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, पुन्हा आमदार, खासदार आणि आता मंत्रीपदाची शपथ घेतोय याचं श्रेय नरेंद्र मोदी, अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं आहे. त्यांचा मी ऋणी आहे. मोदी देतील ती जबाबदारी मी सांभाळीन. त्यांच्या आज्ञेप्रमाणे मी काम करीन. महाराष्ट्राला मंत्रीपद मिळाल्याने महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी मी काम करीन”, असं राणेंनी नमूद केलं.“अनेक चढ-उतार आले. पण शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या कृपेने, सहकार्याने, आशीर्वादाने मला हे पद मिळालं आहे. मी त्यांचा ऋणी आहे. त्यांनी टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवीन”, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...

एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा नवी दिल्लीत‌ समारोप

18-19 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा...