केंद्राने सीरम इन्स्टिट्यूटला कोव्हिशील्ड लस पुरवण्याची दिली ऑर्डर, एका डोसची किंमत 200 रुपये असेल

Date:

केंद्र सरकारने ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची लस कोविशिल्डची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ला ऑर्डर दिली आहे. लसीच्या एका डोसची किंमत 200 रुपये असणार आहे. दर आठवड्याला कोविशील्डच्या एक कोटीपेक्षा जास्त डोसचा पुरवठा केला जाऊ शकतो. SIIच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.

देशभरात कोरोना लसीकरणाची तयारी सुरु करण्यासाठी 16 जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे. ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया (DCGI)ने 3 जानेवारी रोजी कोव्हिशील्डला मंजुरी दिली होती. त्याच्या प्रभावीतेबद्दल वेगवेगळ्या गोष्टी उघडकीस आल्या आहेत. अ‍ॅस्ट्राझेनेने व्हॅक्सिन 90% पर्यंत परिणामकारक असल्याचा दावा केला होता. तथापि, ही लस 70% पर्यंत प्रभावी असल्याचा भारतीय नियामकांचा विश्वास आहे.

16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात

देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास 30 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. पहिल्या टप्प्यातील 3 कोटी लोकांना मोफत लस देण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश आहे. त्यानंतर 50 पेक्षा जास्त वयाच्या आणि इतर आजार असलेल्या 27 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...