पुणे- दिवाळीचे औचित्य साधून ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्ड यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदा एरंडवना गावठाण परिसरात १० हजार दिवाळी भेटवस्तू या मध्ये पणत्या, उठणे, उंबरा पट्टी आदी भेट वस्तू असलेले गिफ्ट बॉक्स ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्डचे महाराष्ट्र प्रेसिडेंटचे सनी निम्हण, स्नेहल सनी निम्हण यांच्या वतीने देण्यात आल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळीमध्ये फटाके मुक्त साजरी करा. सॅनिटायझर लावून पणत्या, फटाके पेटवू नका. असे संदेश ही घरोघरी जावून देण्यात आले.
या प्रसंगी सनी निम्हण, स्नेहल सनी निम्हण, यांच्यासह विठाबाई निम्हण, रंजना रजपूत, आशा हडवळे, सीता रजपूत, अमित शिंदे, शुभम पायगुडे, विठ्ठल रजपूत अजित गजमल आयुष्य मोरे योगेश होडे सिद्धार्थ तिकांडे महेश भुवड, सोनू पायगुडे व मित्र परिवाराने यात सहभाग घेतला होता.

