मोफत दर्जेदार शिक्षणाचे दिल्ली मॉडेल उभारणाऱ्या शिक्षणमंत्र्यांवर सीबीआयची कारवाई: पुण्यात मोदी सरकारविरोधात आपची निदर्शने

Date:

पुणे- मोफत दर्जेदार शिक्षणाचे दिल्ली मॉडेल उभारणाऱ्या शिक्षणमंत्र्यांवर जळूवृत्तीने सीबीआयची कारवाई केल्याचा आरोप करत पुण्यात मोदी सरकारविरोधात आप ने निदर्शने केली .डॉ अभिजीत मोरे यांनी याप्रकरणी सांगितले कि,”देशातच नव्हे जगात आपल्या अभिनव, कल्पक आणि प्रामाणिक उपक्रमांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी केंद्र सरकारचा पोपट बनलेली केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय काल दिवसभर दाखल झाली. अवघ्या २ दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीतील शैक्षणिक क्रांतीबद्दल अमेरिकेतील जगप्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्समध्ये राजधानी दिल्लीतील बदललेल्या प्रगत शिक्षण पद्धतीचे कौतुक करण्यात आले होते, त्याचीच पोटदुखी म्हणून की काय काल केंद्र सरकारने सीबीआयची धाड मनीष सिसोदिया यांच्या घरावर टाकली आहे. या छळवणूक व दडपशाहीचा निषेध करण्यासाठी आज पुण्यात अलका टॉकीज चौकात आम आदमी पार्टी तर्फे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाला राज्य संघटक आणि पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, श्रीकांत आचार्य, डॉ अभिजीत मोरे, एकनाथ ढोले, किरण कद्रे, सुजित अगरवाल, सुदर्शन जगदाळे, मंजुषा नयन, ज्योती ताकवले, आरती करंजावणे, वैशाली डोंगरे, निलेश वांजळे, अमोल काळे, संदीप घाडगे, घनश्याम मारणे, किरण कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.

विजय कुंभार म्हणाले कि,’शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवत केजरीवाल सरकारने देशासमोर एक आदर्श सरकारचे उदाहरण प्रस्तुत केले आहे. परंतु, संकुचित राजकारण करणाऱ्या मोदी सरकारला ते पचनी पडणे कठीणच आहे. म्हणूनच आधी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना खोट्या प्रकरणात जेलमध्ये टाकण्यात आले आणि आता मनीष सिसोदिया यांना अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. पण अशा प्रयत्नांमुळे आम आदमी पक्षाची आरोग्य – शिक्षण क्रांतीची ज्योत विझण्याऐवजी संपूर्ण भारतभरामध्ये तीव्र वेगाने पसरत आहे. सर्वसामान्य नागरिक याची दखल घेत आहेत आणि मोदी सरकारचा दांभिकपणा दिवसेंदिवस लोकांसमोर उघड होत आहे.

सीबीआयची धाड टाकण्यामागे केंद्र सरकारमार्फत दिल्ली सरकारच्या लीकर पॉलिसीचे कारण दिले जात असले तरी वस्तुस्थिती अशी आहे की – दिल्ली सरकारच्या नवीन लिकर पॉलिसीमुळे दारू वरील करापोटी मिळणारे उत्पन्न तब्बल ६००० कोटी रुपयांनी वाढले आहे आणि त्यामुळे दिल्ली सरकारला आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी, बस सेवा इत्यादी सुविधा देण्यासाठी वाढीव निधी मिळाला आहे. पूर्वी दारूवरील करापोटी मिळणारे उत्पन्न ४००० कोटी रुपये इतके होते. दिल्ली सरकारने नवीन लिकर पॉलिसी लागू केल्यानंतर ते उत्पन्न १०,००० कोटी रुपये इतके झाले आहे. सरकारच्या तिजोरीमध्ये वाढीव कर आल्यामुळे बेकायदेशीर दारू विकणाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. गुजरात राज्यात आम आदमी पार्टीला खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भारतीय जनता पार्टीच्या लोकांचे पित्त खवळले असून त्यांनी सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे.

मोदी सरकार सीबीआय, इडीचा वापर आपल्या राजकीय फायद्यासाठी कशा प्रकारे करत आहे ते आपण महाराष्ट्रात सुद्धा बघतच आहोत. विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते यांच्या भ्रष्टाचार विरोधात भाजपने विरोधी पक्षात असताना विधानसभा बंद पाडली होती. तेच गावित आज अटीतटीने बनवलेल्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत तर पाचपुते आमदार आहेत. नारायण राणे, भावना गवळी, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव अशी अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत जे भाजपसोबत गेले आणि पावन झाले. परंतु दिल्लीत मोदी सरकारची लढाई प्रामाणिक आम आदमी पक्षासोबत आहे. आमचे हात इतर भ्रष्ट राजकीय पक्षांच्या नेत्यांसारखे दगडाखाली नाहीत. त्यामुळे भाजपला जे करायचे आहे ते करावे आम आदमी पक्ष शरण जाणार नाही. जनतेसाठी आम्ही लढतच राहू. पूर्ण देश मनीष सिसोदिया यांच्यासोबत आहे.”जनताभिमुख केजरीवाल सरकारच्या कामात अडचणी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार सीबीआय, ईडी या संस्थांच्या माध्यमातून आपच्या एक एक मंत्र्यांना विनाकारण अडकवू पाहत आहे. याआधी सत्येंद्र जैन आणि आता मनीष सिसोदिया. देशातील जनता मोदी सरकारचा हा कुटील डाव ओळखून आहे, महाराष्ट्रासह संपूर्ण देश मनीष सिसोदिया यांच्या पाठीशी आहे.असेही विजय कुंभार यांनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...