गडचिरोली : जिल्हा प्रशासनाकडून शहरातील गोर-गरीब, गरजूंना सकाळी नास्ता व रात्रीचे जेवण मील ऑन व्हील योजनेतून ५ रूपयांमध्ये देण्यात येत आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठाण मधून...
पुणे जिल्हयातील 43 वर्षे वय असलेल्या एका रुग्णावर नायडू रुग्णालयात सोळा दिवस उपचार सुरु होते. महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेऊन पुण्यातील हा रुग्ण 16 दिवसांत...
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून आरोग्य यंत्रणा सर्वच स्तरावर प्रत्येक नागरिकाची काळजी घेत आहे. यातील एक घटक म्हणजे स्तनदा माता आणि नवजात...
उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही, अजूनही...
कुसुमाग्रजांच्या कवितेतील ह्या ओळी आजकाल रोज सकाळी प्रत्यक्षात अनुभवायला येताहेत. उजाडायची खोटी की चिऊताई चिवचिवाट करत ग्यालरीतल्या ग्रिलवर येऊन बसते. खूप वर्षांनी हे दृश्य नजरेस पडत आहे. माझ्या ओळखीतल्या श्रद्धा शिंदेनी सांगितले की, आता चिमण्या केवळ अंगणातच नाही तर खिडकीतून घरातही येऊ लागल्या आहेत. गंमत म्हणून लगबगीने चिमण्यांचा एक फोटोही त्यांनी पाठवून दिला. तसेच वाशीचा प्रेमानंद बिराजदार चिऊताईसाठी घरटे बनवून ती कधी राहायला येतेय याची प्रतीक्षा करतोय.
लॉकडाऊनमुळे माणसं घरात बसली आहेत आणि निसर्गाचं अधिराज्य सुरू झालं आहे. पक्ष्यांचा किलबिलाट तर नित्य ऐकू येतोच आहे पण आपल्या सगळ्यांचीच बालपणाची एक खूण म्हणजे चिऊताईंचं दर्शन रोज घडत आहे. इतके दिवस कुठे लपून बसली होती देव जाणे!
मंगेश पाडगावकरांनी त्यांच्या 'चिऊताई चिऊताई, चिऊताई दार उघड' या कवितेत चिऊला आर्जव केलंय-
वारा आत यायलाच हवा,
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !
दार उघड, दार उघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !
खरंच, लपून बसलेली चिऊताई आता घरट्याचं दार उघडून बाहेर आली आहे आणि रोज तिचा चिवचिवाट मनात रुंजी घालतोय. जणू काही, आपल्या बालपणीच्या चिऊ-काऊच्या आठवणी...
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2020
देशभरात सध्या पसरलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी चेहेऱ्यावर मास्क लावावा असा सल्ला आरोग्य अधिकारी अत्यंत गांभीर्याने...