News

डिजीलॉकरमध्ये विजेची बिले उपलब्ध लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

मुंबई दि. ११ जून, २०२५- आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सुरक्षित ठेऊन हवे तेव्हा उपलब्ध करून देणाऱ्या केंद्र सरकारच्या डिजिलॉकर या ऑनलाईन सुविधेमध्ये आता महावितरणची वीजबिलेही उपलब्ध झाली असून वीज ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी बुधवारी केले. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वीज ग्राहकांना ईज ऑफ लिव्हिंगच्या आधारे अधिकाधिक सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणने केंद्र सरकारच्या डिजिलॉकरशी वीजबिले जोडली आहेत. यामुळे वीज ग्राहकांना आपल्या मोबाईल फोनमध्ये डिजिलॉकर ॲपमध्ये ठेवलेल्या महत्त्वाच्या दाखल्यांसोबतच वीजेची बिलेही उपलब्ध होणार आहेत. त्यांना वीजबिल भरण्यासाठी तसेच गरजेनुसार हे बिल कोणाला पाठविण्यासाठी किंवा त्याचा प्रिंट काढण्यासाठी याचा उपयोग होईल. डिजिलॉकर हा केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरू केलेला महत्त्वाचा उपक्रम आहे. त्याचा वापर करून नागरिकांना आपले पॅन कार्ड, वाहन नोंदणी कागदपत्रे, रेशन कार्ड, दहावी मार्कशीट, बारावी मार्कशीट, निवासाचा दाखला असे अनेक दस्तऐवज ॲपमध्ये सुरक्षित ठेवता येतात आणि गरजेनुसार त्यांचा वापर करता येतो. सर्व दाखले मोबाईलच्या ॲपमध्ये ठेवलेले असल्याने ते सदैव सोबत उपलब्ध राहतात. देशात आतापर्यंत ५२ कोटी ८९ लाख नागरिकांनी डिजिलॉकरचा वापर सुरू केला असून त्यांनी त्यात ८५९ कोटी कागदपत्रे ठेवली आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या नियमावलीनुसार डिजिलॉकरमधील दस्तऐवज मूळ कागदी प्रत्यक्ष दाखल्याच्या समान समजले जातात व त्याला कायदेशीर दर्जा आहे. महावितरणने आपल्या संगणकीय व्यवस्थेतील बिलांची माहिती डिजिलॉकर सुविधेला उपलब्ध करून दिली आहे. वीज ग्राहकाने आपल्या डिजिलॉकर ॲपमध्ये गेल्यानंतर महावितरण वीज कंपनीची निवड करून आपला वीज ग्राहक क्रमांक दाखल करण्याची कृती एकदाच करायची आहे. त्यानंतर त्या ग्राहकाला आपल्या डिजिलॉकरमध्ये विजेचे चालू महिन्याचे बिल उपलब्ध होईल.

पुणे-ठाणे सह 9 महापालिकांमध्ये प्रभाग रचनेचे आदेश, मुंबईमध्ये मात्र एकसदस्यीय प्रभाग रचना

मुंबई:स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठीच्या हालचालींना वेग आला असून त्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना...

१४० कोटी देऊनही कात्रज कोंढवा रस्त्याचे काम पूर्ण करता येत नाही काय ? हिवाळी अधिवेशनापूर्वी काम पूर्ण करा – विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे...

• शासनाने 140 कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्यानंतर देखील काम झाले नाही याबाबत तीव्र नापसंती… मुंबई, दिनांक 10 जून, 2025 (प्रतिनिधी / वार्ताहर) पुणे शहरातील...

दारू महागली, 14000 कोटी रुपयांचा महसूल वाढवणार,मंत्रिमंडळाने केली उत्पादन शुल्कात वाढ..

मुंबई-काही दिवसांपूर्वी देशात बिअरचे दर कमी होतील अशा बातम्यांमुळे मद्यप्रेमींना आनंद झाला होता. मात्र, आता राज्य सरकारने उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून दारूविक्रीवरील कर वाढवण्याचा निर्णय...

‘लडेंगे और जितेंगे’ म्हणत अजित पवारांसोबत जाणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांचे स्पष्ट संकेत

https://youtu.be/JytZBurD6F4 पुणे -यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल. 'लडेंगे और जितेंगे', असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार...

Popular