Industrialist
पुण्याच्या होम टीम बीबी रेसिंगने इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग सीझन २ ची पहिली फेरी गाजवली
~ बिगरॉक मोटरस्पोर्ट्सच्या मॅट मॉस (ऑस्ट्रेलिया) ने कावासाकीवर स्वार होत ४५०सीसी आंतरराष्ट्रीय वर्गाचे विजेतेपद पटकावले. ~~ बीबी रेसिंगच्या हंटर श्लॉसर (अमेरिका) ने होंडावर स्वार...
‘गिव्ह विथ डिग्निटी™’ उपक्रमाच्या पाच वर्षांच्या यशाचा फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनकडून उत्सव साजरा
करुणा आणि सामूहिक सद्भावना यांच्या पाच वर्षांच्या प्रवासाचा हा उत्सव; या उपक्रमाद्वारे स्थानिक पातळीवर तयार केलेल्या उत्सवी ‘डिग्निटी किट्स’च्या माध्यमातून वंचित घटकांचे सशक्तीकरणाचा प्रयत्न.
पुणे, २७ ऑक्टोबर, २०२५ : फिनोलेक्स इंडस्ट्रीज...
इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग – सीजन 2 चीपुण्यात 26 ऑक्टोबरला होणार धमाकेदार सुरुवात
● राईज मोटो फॅन पार्क दुपारी 2 वाजता खुले होईल | उद्घाटन समारंभ संध्याकाळी 6:20 वाजता | शर्यती रात्री 7 वाजल्यापासून शिव छत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे सुरू होतील
● जगभरात थेट प्रक्षेपण ISRL यूट्यूब आणि रेव टीव्ही कॅनडा वर
● भारतात थेट प्रक्षेपण युरोस्पोर्ट इंडिया आणि फॅनकोड वर
पुणे – इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दुसऱ्या सीजनचा पहिला राऊंड रविवारी, 26 ऑक्टोबरला शिव छत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे बालेवाडी येथे पार पडणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे...
विमा आवाक्यात आणण्यासाठी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने संपूर्ण जीएसटी लाभ दिला
कोणत्याही व्यक्तीच्या आर्थिक नियोजनाचा मुदत विमा हा एक आवश्यक भाग आहे. जर घरातील कमावत्या सदस्याचे निधन झाले तर कुटुंबासाठी उत्पन्नाचे साधन म्हणून याचा उपयोग...
मीशोने सेबीकडे दाखल केला अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस
मीशो लिमिटेड ही भारतातील ई-कॉमर्स क्षेत्रात ग्राहक, विक्रेते, लॉजिस्टिक्स भागीदार आणि कंटेंट क्रिएटर्स या चार प्रमुख घटकांना एकत्र आणणारे मल्टी-साइडेड टेक्नॉलॉजी कंपनी आहे. कंपनीने भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाकडे (सेबी) आपला अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (UDRHP) दाखल केला आहे.
प्रस्तावित प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) मध्ये ₹4,250 कोटींच्या नवीन इक्विटी शेअर्सचा इश्यू (फेस व्हॅल्यू ₹1 प्रत्येकी) तसेच 17,56,96,602 इक्विटी शेअर्सचा ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट आहे. या ओएफएसमध्ये एलेव्हेशन कॅपिटल व्ही लिमिटेड, पीक एक्सव्ही पार्टनर्स इन्व्हेस्टमेंट्स व्ही, हायवे सिरीज 1 (व्हेंचर हायवे एसपीव्ही एलएलसीचा एक भाग), वाय कॉम्बिनेटर कॉन्टिन्युइटी होल्डिंग्ज I एलएलसी, गोल्डन समिट लिमिटेड, व्हीएच कॅपिटल, व्हीएच कॅपिटल एक्सआय हे कॉर्पोरेट सेलिंग शेअरहोल्डर्स आहेत. विदित आत्रेय आणि संजीव कुमार हे प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स आहेत, तर मॅन हे टॅम हे इंडिव्हिज्युअल सेलिंग शेअरहोल्डर म्हणून सहभागी आहेत.
कंपनीने नेट प्रोसीड्सचा वापर पुढील कारणांसाठी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे : मीशो टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (सबसिडियरी) मध्ये क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवरील गुंतवणूक; मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि टेक्नॉलॉजी विकासासाठी काम करणाऱ्या टीम्सच्या विद्यमान व नव्या कर्मचाऱ्यांचे वेतन भरणे; मीशो टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये (सबसिडियरी) मार्केटिंग आणि ब्रँड इनिशिएटिव्हसाठी खर्चाची गुंतवणूक; तसेच अधिग्रहण (Acquisitions) व इतर धोरणात्मक उपक्रमांद्वारे इनऑर्गॅनिक ग्रोथ साधणे आणि सामान्य कॉर्पोरेट कामकाजासाठी निधी वापरणे.
FY25 मध्ये मीशो भारतातील सर्वात मोठे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणून उदयास आले. वार्षिक ट्रान्झॅक्टिंग युजर्स आणि वार्षिक प्लेस्ड ऑर्डर्स या दोन्ही बाबतीत मीशोने सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना मागे टाकले. या प्लॅटफॉर्मने 5 लाखांहून अधिक ट्रान्झॅक्टिंग विक्रेत्यांना सुमारे 199 दशलक्ष वार्षिक ट्रान्झॅक्टिंग युजर्स सोबत जोडले आणि वर्षभरात जवळपास 1.8 अब्ज ऑर्डर्स सुलभ केल्या — हे भारतभरातील ग्राहकांसाठी ई-कॉमर्स अधिक परवडणारे, सुलभ आणि आकर्षक करण्याच्या मीशोच्या प्रयत्नांचे खरे प्रतिबिंब आहे.
मीशोचे वार्षिक ट्रान्झॅक्टिंग युजर्स (ATU) FY25 मध्ये सुमारे 28% वार्षिक वाढीसह सातत्याने मजबूत कामगिरी करत राहिले असून, जून 2025 ला समाप्त झालेल्या मागील बारा महिन्यांत (LTM) ते सुमारे 213 दशलक्षांवर पोहोचले. FY23 ते FY25 या कालावधीत ऑर्डर फ्रिक्वेन्सी वर्षाला 7.5x वरून 9.2x पर्यंत सुधारली, तर जून 2025 ला समाप्त झालेल्या मागील बारा महिन्यांत ती 9.4x झाली. यामुळे प्लॅटफॉर्मवरील वाढता एंगेजमेंट आणि विश्वास अधोरेखित होतो, ज्याला सतत उत्तम डिस्कव्हरी व युजर एक्सपीरियन्स देण्याच्या प्रयत्नांची साथ आहे.
एकूण ऑर्डर्स FY23 मधील सुमारे 1 अब्ज वरून FY25 मध्ये 1.8 अब्जांवर पोहोचल्या. फक्त 30 जून 2025 ला समाप्त झालेल्या तीन महिन्यांतच जवळपास 562 दशलक्ष ऑर्डर्स नोंदल्या गेल्या, जे Q1 FY26 मध्ये सुमारे 50% वार्षिक वाढ दर्शवते. FY25 मधील प्लेस्ड ऑर्डर्सची वाढ संपूर्ण भारतभर दिसली, विशेष म्हणजे टॉप 8 शहरांमधील ऑर्डर्स ~46% वाढल्या, तर एकूण प्लॅटफॉर्म वाढ 37% इतकी होती.
या वाढत्या प्रमाणावर आधार घेत, नेट मर्चेंडाइज व्हॅल्यू (NMV) मध्ये FY25 दरम्यान सुमारे 29% वार्षिक वाढ झाली आणि ती ₹29,988 कोटींवर पोहोचली. FY24 मध्ये ही वाढ सुमारे 21% होती. Q1 FY26 मध्ये NMV वाढ आणखी वेगवान झाली असून ती वार्षिक आधारावर सुमारे 36% वाढून ₹8,679 कोटींवर गेली. उत्तम प्राइसिंग, डिस्कव्हरी आणि असॉर्टमेंटद्वारे प्लॅटफॉर्मची वॅल्यू प्रपोजिशन सुधारल्यामुळे आणि वाढीसाठी केलेल्या गुंतवणुकीमुळे ही गती साधता आली.
ई-कॉमर्स क्षेत्रात NMV म्हणजे करांसह यशस्वीरीत्या वितरित केलेल्या ऑर्डर्सचे एकत्रित चेकआऊट मूल्य. हे प्लॅटफॉर्मच्या हेल्थचे मुख्य मोजमाप मानले जाते, कारण यातून ग्राहकांचा स्वीकार (adoption) आणि पुनर्वापर (repeat usage) किती मजबूत आहे हे स्पष्ट होते. त्यामुळेच हे उत्पन्न, मार्जिन्स आणि रोख प्रवाह (cash flow) या सर्व घटकांचे महत्त्वाचे चालक मानले जाते.
उल्लेखनीय बदल घडवून आणत, मीशो FY25 मध्ये भारतातील स्केल्ड लिस्टेड ई-कॉमर्स कंपन्यांपैकी सर्वाधिक फ्री कॅश फ्लो निर्माण करणारी कंपनी ठरली. मागील बारा महिन्यांचा फ्री कॅश फ्लो निगेटिव्ह ₹2,336 कोटींवरून पॉझिटिव्ह ₹1,032 कोटींवर (व्याज उत्पन्नासह) आणि ₹591 कोटींवर (व्याज उत्पन्न वगळता) पोहोचला. हे अॅसेट-लाइट आणि कॅपिटल-इफिशियंट मॉडेलचे फायदे दर्शवते, ज्यामुळे मोठ्या भांडवली खर्चाशिवाय कंपनीला प्रमाण (scale) आणि सखोलता (depth) साधता आली.
कर व अपवादात्मक बाबींआधीचा तोटा FY23 मधील ₹1,672 कोटींवरून FY25 मध्ये केवळ ₹108 कोटींवर आला. हे होत असतानाच, वाढीचा प्रवास (growth trajectory) अधिक मजबूत करण्यासाठी कंपनीने टेक्नॉलॉजी व युजर अॅक्विझिशनमध्ये गुंतवणूक वाढवली.
तथापि, FY25 मध्ये कंपनीचा निव्वळ तोटा ₹3,942 कोटी इतका राहिला. यामागचे प्रमुख कारण म्हणजे वन-टाइम अपवादात्मक खर्च, ज्यामध्ये रिव्हर्स फ्लिप टॅक्स आणि पर्क्विझिट टॅक्सचा समावेश होता. हे खर्च कंपनीच्या पब्लिक स्ट्रक्चरमध्ये रूपांतर प्रक्रियेसाठी आवश्यक होते.
Q1 FY26 मध्ये मीशोने वाढीसाठी गुंतवणूक सुरूच ठेवली. याच काळात नेट मर्चेंडाइज व्हॅल्यू (NMV) वार्षिक आधारावर सुमारे 36% वाढून ~562 दशलक्ष ऑर्डर्सवर पोहोचली, ज्यात प्लेस्ड ऑर्डर्समध्ये सुमारे 50% वाढ दिसून आली. कंपनीने प्रमाण (scale) वाढवल्यामुळे सर्व्हर आणि टेक्नॉलॉजीवरील खर्चही वाढले, जे प्लॅटफॉर्मच्या वाढीस पाठबळ देण्यासाठी आवश्यक असलेल्या गुंतवणुकीचे प्रतिबिंब होते. परिणामी, या तिमाहीत अपवादात्मक बाबींआधीचा तोटा ₹148 कोटी आणि निव्वळ तोटा ₹289 कोटी इतका राहिला. हे कंपनीकडून मार्केट शेअर वाढवण्यासाठी करण्यात आलेल्या धोरणात्मक गुंतवणुकीशी सुसंगत आहे.
FY25 आणि Q1 FY26 यांनी पुन्हा एकदा हे अधोरेखित केले की मीशो इंटरनेट कॉमर्सचे लोकशाहीकरण (democratization) करण्याच्या बाबतीत देशात अग्रणी आहे. कंपनीचे लक्ष आता बाजारपेठेचा विस्तार, परिसंस्थेसाठी दीर्घकालीन मूल्यनिर्मिती आणि शाश्वत वाढीच्या पुढच्या टप्प्यासाठी मजबूत पाया तयार करण्यावर आहे.
या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, जे. पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड काम पाहत आहेत.
UDRHP 1 Link: https://www.bseindia.com/corporates/download/381966/IPO%20Prior/MeeshoLimited_UDRHP1_20251018222146.pdf
