Industrialist

पुण्यातील दोन कंपन्यांनी टॅली एमएसएमई ऑनर्सच्या चौथ्या आवृत्तीत मारली बाजी

पुणे, : टॅली सोल्युशन्स ही जागतिक स्तरावर लघू आणि मध्यम उद्योगांसाठी नवनवीन उपाय शोधणारी आघाडीची तंत्रज्ञान कंपनी आहे. कंपनीने संपूर्ण भारतील ‘एमएसएमई सन्मान’च्या चौथ्या आवृत्तीच्या विजेत्याची घोषणा केली. डीबीएस (डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर लिमिटेड) बँक आणि मायबिझद्वारे समर्थित टॅली एमएसएमई ऑनर्सच्या संपूर्ण भारतातील 100 एमएसएमईचा सन्मान करण्यात आला. जेनेसिस टेक इंजिनीयर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कनेक्ट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या पुण्यातील दोन कंपन्यांनी या वर्षी 19,000+ जागतिक नामांकनांमध्ये बाजी मारली आहे. व्यवसाय आणि उद्योजकांना राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये त्यांच्या योगदानासाठी सन्मान करण्यासाठी टॅली एमएसएमई ऑनर्स हा वार्षिक उपक्रम आहे. एमएसएमईंच्या तळागाळातील सर्वोत्कृष्ट कार्यपद्धतींद्वारे विविधतेचा आणि सकारात्मक प्रभावांचा सन्मान केला जातो. अनेक नामांकित संस्थांकडूनही या उपक्रमाचे समर्थन केले जात असून, या वर्षी हा उपक्रम देशभरात पोहोचला आणि उन्नाव, आगरतळा, वापी, आसनसोल यांसारख्या दुर्गम आणि लहान भागातील व्यवसायांना सन्मानित केले आहे. शहरे, विभाग आणि अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या अनोळखी नायकांना खऱ्या अर्थाने सन्मानित करणे एमएसएमई ऑनर्स हे सर्वसमावेशक ओळखीचे व्यासपीठ असल्याचा हा खरा पुरावा आहे. हा सन्मान वर्षातून एकदा आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त दिला जातो आणि २५० कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या आणि वैध GSTIN असलेल्या सर्व प्रकारच्या व्यवसायांना लागू होतो. जेनेसिस टेक इंजिनीअर्स प्रायव्हेट लिमिटेडमधील शुभम पाटील यांना ‘न्यू जेन आयकॉन’ श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले आहे. कंपनी विविध प्रकारच्या उद्योगांसाठी एमईपी (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, पाइपिंग) सिस्टीम डिझाइनमध्ये कुशल आहे, ज्यामध्ये सेमीकंडक्टर पायाभूत सुविधा, ऊर्जा क्षेत्रातील ऊर्जा प्रकल्प, सौर पायाभूत सुविधा, वाहतूक, जागा आणि रासायनिक-तेल-गॅस डिझाइनचा समावेश आहे. जेनेसिस टेक इंजिनीयर्स एमईपी डिझाइन प्रमाणीकरण प्रदान करते, अभियांत्रिकी मानकांचे आणि स्थानिक सरकारी धोरणांचे पालन सुनिश्चित करते. कंपनी सर्वसमावेशक प्रोजेक्ट मॅनेजमेंट सोल्युशन्स देखील ऑफर करते, त्यामुळे वेळेत प्रकल्प वितरित केला जातो. त्यांचा विशेष प्रकल्प R&D विभाग नावीन्यपूर्ण आणि ऑटोमेशनवर लक्ष केंद्रित करतो, जटिल अभियांत्रिकी आव्हानांना सामोरे जातो. Konnect Consultancy Services Pvt Ltd मधील कविता चक्रवर्ती यांना ‘वंडर वुमन’ श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले आहे. कंपनी सर्वसमावेशक वित्तीय सेवा-बुककीपिंग, कर आकारणी आणि वेतन-मुख्यत: निर्यात क्षेत्राला पुरवते. ऑनलाइन आणि पारंपरिक विक्री चॅनेल दोन्ही वापरून, फर्मने स्थिर वाढ साधली आहे, त्याचा ग्राहक आधार वाढविला आहे आणि ग्राहकांचे समाधान वाढविले​​आहे. हा सन्मान ५ श्रेणींमध्ये देशातील चार झोन (पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण) मध्ये देण्यात आला: ●       वंडर वुमन : ज्या महिलांनी आव्हानांवर मात करत, व्यवसाय स्थापन करून भरभराट केली आणि या प्रक्रियेत इतरांना प्रेरणा दिली, त्यांना सन्मानित करणे. ●       बिझनेस मेइस्ट्रो: ज्यांचे कौशल्य आणि लवचिकता महत्त्वाकांक्षी उद्योजकांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करते आणि जे चिरंतर यशाचा पाया घालतात, अशा अनुभवी व्यावसायिकांना सन्मानित करणे. ●       न्यू जेन आयकॉन : व्यवसाय क्षेत्रात गतिशील नेते म्हणून स्टार्टअप्सना हायलाइट करणे, जुन्या आव्हानांवर नवीन उपाय शोधणे आणि वाढीसाठी नवीन मार्ग तयार करणे. ●       टेक ट्रान्सफॉर्मर: तंत्रज्ञानाच्या प्रगतीत आघाडीवर असलेल्या आणि त्यांच्या कार्यात कार्यक्षमता व परिणामकारकता आणण्यासाठी डिजिटल साधनांचा लाभ घेणाऱ्या व्यवसायांचा सन्मान करणे,. ●       चॅम्पियन ऑफ कॉज: एमएसएमईच्या जागतिक कल्याणाला प्राधान्य देणाऱ्या, अधिक शाश्वत आणि समावेशक व्यवसाय वातावरणाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या चॅम्पियन्सचा गौरव करणे.

‘टाटा केमिकल्सने सुरु केले मुळशीतील पहिले उपजीविका आणि कौशल्य प्रशिक्षण केंद्र’

~कौशल्य विकास आणि रोजगार संधी पुरवून स्थानिक समुदायांचे सक्षमीकरण~ मुळशी, १२ जुलै, २०२४:  टाटा केमिकल्स सोसायटी ऑफ रूरल डेव्हलपमेंट (टीसीएसआरडी) या टाटा केमिकल्सच्या सीएसआर विभागाने कंपनीच्या समुदाय विकास उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून “लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट” या स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने पुणे जिल्ह्यातील मुळशीमध्ये उपजीविका व कौशल्य प्रशिक्षण केंद्र आज सुरु केले. २०२४-२५ या आर्थिक वर्षात टाटा केमिकल्स इनोव्हेशन सेंटरच्या आजूबाजूच्या १० गावांमधील सुमारे ४३० व्यक्तींना या केंद्राचा लाभ मिळणार आहे.  उपजीविका पुरवण्यासाठी आणि कौशल्य विकास घडवून आणण्यासाठी या केंद्रामध्ये प्रशिक्षण पुरवले जाईल, इतकेच नव्हे तर, प्रशिक्षित व्यक्तींना रोजगार मिळवून देण्यासाठी किंवा त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी साहाय्य केले जाते. टीसीएसआरडी आणि एलओएलटीने मुळशीमध्ये सुरु केलेल्या या सर्वसमावेशक कौशल्य केंद्रामध्ये लघुकालीन प्रशिक्षण वर्ग चालवले जातील. यामध्ये एसी टेक्निशियन, इलेक्ट्रिशियन, कम्प्युटर्स, ब्युटी केयर, इंग्रजी संभाषण, मेहेंदी डिझाईन आणि जॉब रेडीनेस ट्रेनिंग यांचा समावेश असेल. टाटा केमिकल्सचे हेड - इनोव्हेशन, आरअँडडी, सीक्युएच आणि चीफ एथिक्स काऊंसेलर, डॉ रिचर्ड लोबो म्हणाले, "मुळशीमधील आमच्या इनोव्हेशन सेंटरच्या जवळ अशाप्रकारचे पहिले उपजीविका आणि कौशल्य विकास केंद्र सुरु करत असल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. वैविध्यतेवर भर देत, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणामार्फत स्थानिक सक्षमतेला प्रोत्साहन देण्याप्रती टाटा केमिकल्सची बांधिलकी या महत्त्वपूर्ण टप्प्यामध्ये अधोरेखित झाली आहे.  आजूबाजूच्या भागातील व्यक्तींना आवश्यक कौशल्ये आणि संसाधने पुरवून, सक्षम करून शाश्वत, पर्यावरणपूरक विकासाला चालना देण्याचा व आर्थिक स्वावलंबनासाठी संधी निर्माण करण्याचा आमचा उद्देश आहे. मुळशी भागातील व्यक्ती आणि कुटुंबांवर या केंद्राचा सकारात्मक प्रभाव निर्माण होईल याची आम्हाला खात्री आहे. हे व्हिजन प्रत्यक्षात साकार करण्यासाठी ज्या सह्योगी आणि भागधारकांनी आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत." टाटा केमिकल्सचे मुख्य -...

जेएसडब्ल्यू समूहातर्फे बेंगळुरू येथे सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यासाठी एमएसआरआयटी आणि शारिका यांच्यासह सामंजस्य करारावर सह्या

जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्सद्वारे फ्लेक्झिबल पॉवर सिस्टीम्स- स्मार्ट ग्रिड क्षेत्रातील संशोधन, प्रशिक्षण आणि विकासाला चालना दिली जाणार मुंबई आणि बेंगळुरू- अमेरिकी २४ अब्ज डॉलर्स जेएसडब्ल्यू समूहाने त्रिपक्षीय सामंजस्य करार केल्याची घोषणा केली आहे. संस्थेने विश्वेवरैय्या टेक्नोलॉजिकल विद्यापीठाशी संबंधित व कर्नाटक राज्य सरकारची मंजुरी असलेली सरकार स्वायत्त खासगी अभियांत्रिकी एमएस रामय्या इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीने (एमएसआरआयटी) आणि तांत्रिक ज्ञानावर आधारित सेवा व प्रशिक्षण, तसेच स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञानाचे डिझाइन आणि विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या शारिका एंटरप्रायझेस कंपनीचा विभाग शारिका स्मार्टेक यांच्यासह हा करार करण्यात आला आहे. या करारानुसार पारंपरिक ऊर्जा यंत्रणांचे नावीन्यपूर्ण सुविधांच्या मदतीने परिवर्तनशील ऊर्जा यंत्रणेत रूपांतर केले जाणार आहे. या त्रिपक्षीय करारानुसार बेंगळुरू येथील एमएसआरआयटीच्या कॅम्पसमध्ये स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञानासाठी जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्स (जेएसडब्ल्यू- सीओई) स्थापन केले जाणार आहे. या करारानुसार जेएसडब्ल्यू समूह जेएसडब्ल्यू- सीओईसाठी आवश्यक वित्तपुरवठा करेल, तर एमएसआरआयटी जेएसडब्ल्यू- सीओईची स्थापना व समन्वयात महत्त्वाची भूमिका बजावेल. शारिका स्मार्टटेक या संस्थेची नॉलेज पार्टनर असेल आणि कंपनीद्वारे जेएसडब्ल्यू- सीओईची स्थापना, कामकाज व हाताळणीसाठी मदत केली जाईल. या सामंजस्य करारातील तीन पक्ष समाजाच्या एकत्रित शक्तीचा वापर करून सातत्यपूर्ण शिक्षण, कौशल्य विकास, ज्ञान वर्धनाला चालना देऊन कर्मचारी, इंजिनीअर्स व व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना लाभ मिळवून देतील. जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्सतर्फे शिक्षण, प्रशिक्षण आणि विकासासाठी प्लॅटफॉर्म पुरविला जाईल. हे अत्याधुनिक जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्स शिक्षण आणि प्रशिक्षण मोड्युल्समध्ये मोठे बदल घडवून आणण्यासाठी इंजिनीअरिंग व्यावसायिकांच्या नव्या पिढीला, पूरक स्टार्टअप्सना ‘लॅब एक सेवा म्हणून’ पुरवतील आणि त्या दरम्यान टेस्टिंग व सल्लासेवेच्या स्वरूपात मदत करतील. यामुळे वेगाने बदलत असलेल्या ऊर्जा यंत्रणा क्षेत्रात सातत्यपूर्ण शिक्षण, कौशल्य विकास, ज्ञान वर्धनाला चालना मिळेल. एआय, डीप लर्निंग, बिग डेटा, ब्लॉकचेन, नेटवर्किंग आणि ऑटोमेशनच्या येण्यामुळे ऊर्जा यंत्रणा क्षेत्रातील नावीन्यपूर्ण सुविधांची मागणी अतिशय महत्त्वाची झाली आहे. एमएसआरआयटीमधील जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्स आधुनिक शिक्षण, डिझाइन, विकास आणि स्मार्ट ग्रिड किंवा परिवर्तनशील ऊर्जा यंत्रणा क्षेत्रासाठी अंमलबजावणी क्षमता पुरवेल. स्मार्ट ग्रिड ऊर्जा यंत्रणा प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करत, दरम्यान इंजिनीअर्स, पदवीधर आणि तांत्रिक कर्मचारीवर्गाला आधुनिक कौशल्ये व ज्ञान देऊन सक्षम केले जाणार आहे. त्यांच्या मदतीने एमएसआरआयटीमधील जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्स कुशल मनुष्यबळचा स्तर उंचावेल आणि त्यांची निर्मिती करेल. या उद्योगक्षेत्राच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे सेंटर ऊर्जा क्षेत्रातील व्यावसायिक विकासाला चालना देईल. एम.एस. रामैय्या नगर, एमएसआरआयटी पोस्ट, बेंगळुरू, 560054 येथे वसलेले जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्स ऊर्जा क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधन, प्रशिक्षण आणि विकासाचे केंद्र बनून या उद्योगाचा विकास आणि प्रगतीसाठी योगदान देईल.

बँक ऑफ इंडियातर्फे भारत सरकारला ९३५.४४ कोटी रुपये लाभांश

मुंबई, ११ जुलै २०२४ – बँक ऑफ इंडियातर्फे १० जुलै २०२४ रोजी भारत सरकारला ९३५.४४ कोटी रुपयांची लाभांशाची रक्कम धनादेशाद्वारे सुपूर्त करण्यात आली. बँक ऑफ...

ॲक्सिस बँकेतर्फे आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त महाराष्ट्रातील ७५० हून अधिक एमएसएमईचा सत्कार

मुंबई: गतिमान आणि यशस्वी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राला महत्त्वपूर्ण मानवंदना म्हणून भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त...

Popular