Industrialist

मार्च 2024 पर्यंत 10 कोटींहून अधिक भारतीयांनी त्यांचा सिबिल स्कोअर आणि अहवालाचे केले परीक्षण

●        वित्त वर्ष 23-24 मध्ये भारतीयांचा स्वतःचा सिबिल स्कोर आणि अहवाल 51% वाढला ●        गैर-मेट्रो क्षेत्रांमध्ये स्वयं-निरीक्षण करणारे ग्राहक 57% वाढले तर एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत मेट्रो क्षेत्रांमध्ये 33% वाढ झाली आहे. ●        वित्त वर्ष 24 मध्ये 12% अधिक व्यावसायिक संस्थांनी (MSMEs) प्रथमच त्यांचा कंपनी क्रेडिट अहवाल (CCR) ट्रॅक केला मुंबई, - संपूर्ण भारतातील ग्राहकांच्या स्व-निरीक्षणाच्या क्रेडिट वर्तनातील सर्वसमावेशक माहिती असणारा आर्थिक स्वातंत्र्याचे सशक्तीकरण : भारतातील क्रेडिट सेल्फ-मॉनिटरिंगचा उदय हा अहवाल ट्रान्सयुनियन सिबिलने प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, मार्च 2024 पर्यंत अंदाजे 119 दशलक्ष भारतीयांनी त्यांच्या सिबिल स्कोअरचे परीक्षण केले आहे. क्रेडिट प्रोफाइलचे निरीक्षण करणाऱ्या ग्राहकांची संख्या वित्त वर्ष 23-24 मध्ये 51% (वार्षिक आधारावर) वाढून 43.6 दशलक्षची भर पडली आहे. अधिक ग्राहक त्यांची क्रेडिटची स्थिती जाणून घेण्याची इच्छा असते, हे यातून दिसून येते.   अहवालात दिसून आले आहे की भारतातील क्रेडिट क्रांतीचे नेतृत्व तरुण करत आहेत. 119 दशलक्ष क्रेडिट मॉनिटरिंग ग्राहकांपैकी 77% जनरेशन झेड2 आणि मिलेनियल्स3 आहेत. अहवालात असेही दिसून आले आहे की 81% ग्राहक ज्यांनी त्यांचे पहिले क्रेडिट उत्पादन उघडल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्यांच्या क्रेडिट स्कोअरचे स्व-निरीक्षण सुरू केले आहे, ते गैर-मेट्रो प्रदेशातील आहेत. स्रोत: ट्रान्सयुनियन सिबिल सेल्फ-मॉनिटरिंग डेटाबेस अहवालातील निष्कर्षांवर भाष्य करताना, ट्रान्सयुनियन सिबिलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री राजेश कुमार म्हणाले : “या अहवालात स्पष्ट केल्याप्रमाणे क्रेडिट व्यवस्थापनाबद्दल सुधारित ग्राहक जागरुकतेसह भारताच्या वृद्धीला मजबूत पाया मिळतो. जे ग्राहक त्यांच्या क्रेडिट अहवालाचे स्व-निरीक्षण करतात आणि त्यानंतर त्यांचा सिबिल स्कोर सुधारतात अशा लोकांमध्ये यात उल्लेखनीय वाढ दिसून येते. ग्राहक जागरूकता वाढत असून, विशेषत: तरुण, महिला आणि गैर-शहरी ग्राहकांमध्ये झालेली ही वाढ, शाश्वत पत वाढ आणि वाढत्या आर्थिक समावेशाचे आश्वासक सूचक आहे. येत्या काही वर्षांत आपल्या देशाचे USD 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने ते चांगले संकेत आहेत. "ग्राहकांना सक्षम बनवण्यासाठी आणि आर्थिक संधींचा सहज आणि चांगल्या अटींवर लाभ घेण्यासाठी चांगल्या क्रेडिट स्कोअरच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ट्रान्सयुनियन सिबिल वचनबद्ध आहे. आमचे उपाय भारतातील लाखो लोकांसाठी आर्थिक संधी निर्माण करण्यात मदत करतात आणि आम्ही क्रेडिट व्यवस्थापनाबद्दल ग्राहक जागरूकता वाढवण्याची आमची जबाबदारी अत्यंत गांभीर्याने घेतो. भारतातील अग्रणी क्रेडिट माहिती कंपनी म्हणून, ट्रान्सयुनियन सिबिल सार्वजनिक हितासाठी क्रेडिट माहिती क्षेत्र मजबूत करण्यासाठी सदस्य क्रेडिट संस्थांसोबत सतत काम करत आहे.” वित्त वर्ष 23-24 मध्ये सिबिल स्कोअरचा मागोवा घेणाऱ्या महिलांच्या वाट्यामध्ये 70% वाढ झाल्याचे या अहवालातून दिसून येते. स्त्रिया केवळ क्रेडिट व्यवस्थापन चांगल्या प्रकारे समजून घेत नाहीत तर त्या अधिक क्रेडिट जागरूक बनत आहेत आणि आर्थिक नियोजनाला प्राधान्य देत आहेत असेही यातून स्पष्ट होते.. 72% पेक्षा जास्त नवीन क्रेडिट मॉनिटरिंग महिला या महानगरांतील नाहीत. क्रेडिट बघण्याचे अधिक प्रमाण व्यापक आर्थिक सहभागाकडे नेणारे अहवालात असे म्हटले आहे की ग्राहक अधिक क्रेडिट जागरूक होत आहेत. त्यामुळे असे दिसून येते की सिबिल स्कोअर आणि अहवाल तपासल्यानंतर सहा महिन्यांच्या आत 46% लोकांच्या क्रेडिट प्रोफाइलमध्ये सुधारणा झाली आहे (सिबिल स्कोर4). क्रेडिट स्कोअरवर भर न देणाऱ्या ग्राहकांच्या तुलनेत हे प्रमाण 41% पेक्षा जास्त आहे.यातून हे स्पष्ट होते की, क्रेडिट जागरूक असलेले भारतीय अधिक क्रेडिट उत्पादनांचा शोध घेत आहेत आणि कमी व्याजदर, चांगल्या ऑफर किंवा उच्च क्रेडिट रकमेचा लाभ घेण्यासाठी त्यांचे स्कोअर देखील सुधारत आहेत. तीन महिन्यांच्या आत त्यांचा स्कोअर तपासणे, स्व-निरीक्षण करणाऱ्यांच्या संख्येत नॉन-मॉनिटरिंग ग्राहकांच्या तुलनेत ग्राहकांनी नवीन क्रेडिट लाइन उघडण्यात सुमारे 6X वाढ दर्शविल्याचे अहवालात दिसून आले आहे.डेटा दर्शवितो की 44% ग्राहक त्यांच्या सिबिल स्कोअरचे निरीक्षण करत आहेत आणि 12 महिन्यांत किमान चार वेळा ते आपला स्कोअर बघतात, असेही दिसले आहे.  स्वयं-निरीक्षण करणारे ग्राहक त्यांच्या क्रेडिट इतिहासाचे पुनरावलोकन केल्यानंतर क्रेडिट संधींसाठी अर्ज करतात, यावरही हा अहवाल प्रकाश टाकतो. निरीक्षणानंतर, दुचाकी कर्ज घेणारे 50%, ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी कर्जे 41%, सुवर्ण कर्ज 38% आणि क्रेडिट कार्ड प्रमाण 14% वाढले आहेत. तथापि, वैयक्तिक कर्ज 16% कमी झाले. पुढील स्थानानुसार आकडेवारी पाहिली तर असे दिसून येते की, गैर-मेट्रो भागातील स्वयं-निरीक्षण ग्राहकांनी अधिक नवीन क्रेडिट खाती उघडली आहेत. स्वयं-निरीक्षण व्यवसाय संस्था चांगली क्रेडिट प्रोफाइल ठेवतात अहवालात असेही दिसून आले आहे की, प्रथमच त्यांचा कंपनी क्रेडिट रिपोर्ट (सीसीआर) तपासणाऱ्या व्यावसायिक संस्था वित्त वर्ष 23-24 मध्ये 12% (वार्षिक आधारावर) वाढल्या आहेत आणि स्व-निरीक्षण करणाऱ्या 47% संस्था व्यावसायिक रँक 1 आणि 3 दरम्यान राखतात (एसएस सिबिल MSME रँक)५), CMR-1 स्कोअर सर्वात कमी धोकादायक प्रोफाइल दर्शवतो. अहवालात असेही दिसून आले आहे की सीसीआर तपासल्यानंतर तीन महिन्यांच्या आत 32% व्यावसायिक संस्थांनी कर्जासाठी अर्ज केला आहे, ज्यामध्ये व्यावसायिक वाहन कर्ज, बँक हमी, दीर्घकालीन कर्ज, असुरक्षित व्यवसाय कर्ज आणि वाहन कर्ज यांचा प्रामुख्याने समावेश आहे. स्रोत: ट्रान्सयुनियन सिबिल सेल्फ-मॉनिटरिंग डेटाबेस क्रेडिटबद्दल जागरुकता वाढल्याने ग्रामीण भारतात पत वाढीला चालना अहवालात असे दिसून आले आहे की, क्रेडिटचे निरीक्षण करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत लक्षणीय सुधारणा झाली आहे, विशेषत: नॉन-मेट्रो ठिकाणी स्व-निरीक्षण करणारे ग्राहक वित्त वर्ष 23-24 मध्ये 57% वाढले आहेत, मेट्रो शहरांमध्ये हे प्रमाण 33% वाढले आहे.  अहवालात असेही दिसून आले आहे की, वित्त वर्ष 23-24 मध्ये 4.72 दशलक्ष नवीन प्रादेशिक स्व-निरीक्षण ग्राहक होते, जे वाढत्या क्रेडिट जागरूकतेचे प्रतीक आहे. सर्वाधिक क्रेडिट मॉनिटरिंग लोकसंख्या असलेल्या टॉप 10 राज्यांमध्ये, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल यांनी FY22-23 च्या तुलनेत वित्त वर्ष 23-24 मध्ये स्व-निरीक्षण ग्राहकांमध्ये वाढ केली. स्रोत: ट्रान्सयुनियन सिबिल सेल्फ-मॉनिटरिंग डेटाबेस स्व-निरीक्षण१ महिला कर्जदारांचा क्रेडिट आत्मविश्वास वाढला जसजसे अधिक महिलांना क्रेडिटचे परिणाम आणि शक्यता समजतात, तसतसे भारताच्या क्रेडिट मार्केटमध्ये अधिक माहितीदार कर्जदार वाढू लागले आहेत. क्रेडिटसाठी स्व-निरीक्षण करणाऱ्या महिला ग्राहकांमध्ये 70% वाढ दर्शविते की महिला आर्थिक नियोजनाला प्राधान्य देत आहेत आणि त्यांच्या क्रेडिट हेल्थची जबाबदारी घेत आहेत. सिबिल स्कोअर 730+ असलेल्या महिला ग्राहकांच्या संख्येत वित्त वर्ष 23-24 मध्ये 1.8 पट वाढ झाली आहे.. वित्त वर्ष 23-24 मध्ये प्रथमच त्यांच्या सिबिल स्कोअर आणि अहवालात प्रवेश केलेल्या 71 टक्के महिला या नॉन-मेट्रो भागातील होत्या. या क्षेत्रांमध्ये क्रेडिटच्या बाबतीत झपाट्याने वाढ झाल्याचे दर्शविते. संख्यास्व-निरीक्षण करणाऱ्या जनरेशन झेड  महिलांची संख्या FY22-23 च्या तुलनेत वित्त वर्ष 23-24 मध्ये 70% एवढी प्रचंड वाढली आहे. स्रोत: ट्रान्सयुनियन सिबिल सेल्फ-मॉनिटरिंग डेटाबेस तरुण कर्जदार अधिक क्रेडिट माहितीगार आणि क्रेडिट क्रांतीमध्ये महत्त्वाचे योगदान देणारे होत आहेत अहवालातील माहिती असे सूचित करते की, तरुण कर्जदार अधिक क्रेडिट शिस्तबद्ध आणि जागरूक होत आहेत - क्रेडिट स्कोअरचा मागोवा घेणाऱ्या जनरेशन झेडची संख्यावित्त वर्ष 23-24 मध्ये 1.5 पट वाढली आहे. नवीन क्रेडिट वापरकर्त्यांपैकी 91 टक्के वित्त वर्ष 23-24 मध्ये मिलेनियल्स आणि जनरेशन झेड होते. सुरुवातीलाच लागलेली ही सवय संकेत देते की या पिढ्या भारताच्या ग्राहक पत भविष्याला आकार देतील. सुरुवातीच्या काळापासूनच क्रेडिट सांभाळण्याची सवय भारतीय तरुणांना लागत आहे. या गटात स्व-निरीक्षण करणारे जनरेशन झेड ग्राहक सरासरी 1.32 सह आघाडीवर असून ते 1.25 वरील मिलेनियल्स आणि इतरांना 1.22 वरील मागे टाकतात. सरासरी, स्व-निरीक्षण करणारे ग्राहक 1.98 उत्पादने ठेवतात, जे त्यांच्या गैर-निरीक्षण भागांपेक्षा अधिक आहेत. निरिक्षण न करणाऱ्या ग्राहकांकडे सरासरी 1.33 उत्पादने असतात. “भारत झपाट्याने आर्थिकदृष्ट्या जाणकार आणि क्रेडिट जागरूक होत असल्याचे वास्तव या अहवालातून समोर येते. ज्यांच्याकडे सिबिल स्कोअर जास्त आहे अशा कर्जदारांसाठी अनेक क्रेडिट संस्था चांगल्या अटी आणि शर्ती ऑफर करतात, ग्राहकांना चांगल्या अटींवर आर्थिक संधींचा लाभ घेण्यासाठी निरोगी क्रेडिट प्रोफाइलचे निरीक्षण करणे आणि राखणे फायदेशीर ठरते,” असे ट्रान्सयुनियन सिबिल इंडियाचे वरिष्ठ संचालक आणि ग्राहक संवाद (डायरेक्ट-टू-कंझ्युमर) प्रमुख भूषण पडकील यांनी सांगितले.   1स्व-निरीक्षण करणारे ग्राहक हे असे यूजर्स आहेत ज्यांनी त्यांचे सिबिल स्कोअर सक्रियपणे तपासले आणि किमान एकदा ट्रान्सयुनियन सिबिलला आपला अहवाल दिला आहे.. 2जनरेशन झेड हे असे ग्राहक आहेत ज्यांचा जन्म 1997 ते 2012 या काळात झालेला आहे. 3मिलेनियल्स हे ग्राहक 1981 ते 1996 या काळात जन्मलेले आहेत. 4सिबिल स्कोअर हा 300-900 दरम्यान असतो. 300 ते 680 असलेला सिबिल स्कोअर सबप्राईम मानला जातो, 681-730 दरम्यान स्कोअर असेल तर नीअर प्राईम ग्राहक असतात.प्राईप = 731-770, प्राईम प्लस = 771-790 आणि super prime = 791-900 असा स्कोअर असतो. सिबिल एमएसएमई रॅकची रेंज 10 ते 1. 1 ही सर्वोत्तम रँक असते. 

महिंद्रातर्फे नवी दिल्लीत सीबीजी- पॉवर्ड ट्रॅक्टर तंत्रज्ञानाचे प्रदर्शन

नवी दिल्ली, २ सप्टेंबर २०२४ – महिंद्रा ट्रॅक्टर्स या भारतातील आघाडीच्या ट्रॅक्टर ब्रँडने आपला पहिला सीबीजी (कॉम्प्रेस्ड बायो- गॅस) पॉवर्ड युवो टेक+ ट्रॅक्टर श्री. नितिन गडकरी, माननीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, भारत सरकार यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे लाँच केला आहे.कॉम्प्रेस्ड नैसर्गिक गॅस वापरत महिंद्रा सीबीजी पॉवर्ड ट्रॅक्टटरने ट्रॅक्टर तंत्रज्ञान क्षेत्रात लक्षणीय प्रगती दर्शवली आहे. त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानामुळे प्रदूषक घटक व कार्बन उत्सर्जन कमी होते. जीवाश्म इंधनावर अवलंबून असलेल्या सीएनजीच्या तुलनेत कॉम्प्रेस् बायो- गॅस हरित, अक्षय इंधन असून ते जीवाश्व इंधनावरील अवलंबित्व कमी करते. हा गॅस विघटनशील घटक उदा. शेती खाद्यपदार्थ आणि इतर प्रकारच्या कचऱ्याचे विघटन करून बनवला जातो.महिंद्राचे युवो टेक + सीबीजी ट्रॅक्टर पारंपरिक डिझेल तंत्रज्ञानाच्या तुलनेत जास्त ताकद आणि चांगली कामगिरी देत असल्यामुळे शेती व इतर माल वाहतुकीचे काम चांगल्या प्रकारे करता येते. महिंद्राचा नवीन सीबीजी ट्रॅक्टर सर्व भारतीय नियमांचे कठोर पालन करतो.पर्यावरणपूरक शाश्वत तंत्रज्ञान सुविधांचा प्रसार करण्याच्या कंपनीच्या धोरणाशी सुसंगत सीबीजी ट्रॅक्टर तंत्रज्ञानाने शेतकरी समाज आणि पर्यावरणाला लाभ करून देण्याचे ध्येय ठेवले आहे. महिंद्रा आपली नाविन्यपूर्ण आणि शाश्वत उत्पादनांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी बांधील आहे. कंपनीने सीएनजी ट्रॅक्टर, एलपीजी ट्रॅक्टर आणि ड्युएल- फ्युएल ट्रॅक्टर तंत्रज्ञान यांसारखे पर्यायी इंधन ट्रॅक्टर तंत्रज्ञान गेल्या काही वर्षांत लाँच केले आहे.

जिओ जगातील सर्वात मोठी मोबाइल डेटा कंपनी बनली-रिलायन्सच्या AGM मध्ये AI क्लाउड वेलकम ऑफर जाहीर:100 GB पर्यंत फ्री स्टोरेज मिळेल

मुंबई-रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने आज (29 ऑगस्ट) आपल्या 47 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओ AI क्लाउड वेलकम ऑफरची घोषणा केली. त्यांनी सांगितले की...

मार्केटमधील विस्तार वाढविण्याच्या दृष्टीने गोदरेज इंटेरिओने 1,20,000 चौरस फुटांपेक्षा जास्त किरकोळ जागेसह किरकोळ विस्ताराला गती दिली आहे

~ ऑन-ग्राउंड आणि ई-कॉम रिटेल विस्तार योजनांची घोषणा ~ मुंबई, 27 ऑगस्ट, 2024: भारतातील घर आणि कार्यालयीन फर्निचर ब्रँडपैकी एक अग्रगण्य व गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपची कंपनी, गोदरेज अँड बॉइसचा एक...

 बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियाची स्थापना  

टाटा टेक्नॉलॉजीज आणि बीएमडब्ल्यू ग्रुपने केली  बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियाची स्थापना  - हा भागीदारी उद्यम ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेयर आणि बिझनेस आयटी इनोव्हेशनला चालना देईल ·         हा भागीदारी उद्योग ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेयरमध्ये नावीन्य आणेल, यामध्ये बिझनेस आयटीसाठी सॉफ्टवेयर-डिफाइन्ड वेहिकल्स (SDV) आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोल्युशन्स यांचा समावेश आहे. ·         स्ट्रॅटेजिक इंडियन टॅलेंट सेंटर्स - पुणे, बंगलोर आणि चेन्नई - बीएमडब्ल्यू ग्रुपच्या सॉफ्टवेयर आणि आयटी हबच्या जागतिक नेटवर्कचा भाग बनतील. ·         २०२५ च्या अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांच्या संख्येत चार-अंकी वाढ करण्याची योजना आहे. म्युनिच, जर्मनी आणि पुणे २०२४:  उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवा प्रदान करणारी जागतिक कंपनी, टाटा टेक्नॉलॉजीज आणि जगातील आघाडीच्या प्रीमियम ऑटोमोटिव्ह उत्पादकांपैकी एक, बीएमडब्ल्यू ग्रुपने मिळून बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया हा भागीदारी व्यवसाय सुरु केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. करारांवर अंतिम स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत आणि अधिकाऱ्यांकडून सर्व आवश्यक मंजुऱ्या मिळाल्या आहेत, आता हा भागीदारी व्यवसाय पुणे, बंगलोर आणि चेन्नईमध्ये प्रमुख तंत्रज्ञान केंद्रांमध्ये १०० कर्मचाऱ्यांसह संचालन सुरु करेल. हा उद्योग वेगाने विस्तार करण्यासाठी सज्ज आहे, २०२५ च्या अखेरपर्यंत चार अंकी कर्मचाऱ्यांसह पुढे जाण्याची योजना आखण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांमध्ये भारतातील अव्वल अभियांत्रिकी प्रतिभावंतांना आकर्षित करण्यावर विशेष भर दिला गेला आहे. या भागीदारी व्यवसायामध्ये बीएमडब्ल्यू ग्रुप आणि टाटा टेक्नॉलॉजीज या दोघांकडे ५०% शेयर्स आहेत. ही भागीदारी ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान व बिझनेस आयटीमध्ये नावीन्याला प्रोत्साहन देण्याचा सामायिक दृष्टिकोन अधोरेखित करते. बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया अत्याधुनिक वाहनांसाठी सहजसुलभ, स्केलेबल सॉफ्टवेयर सोल्युशन्स तयार करून आणि अधिक चांगला डिजिटल अनुभव प्रदान करून बीएमडब्ल्यू ग्रुपच्या जागतिक धोरणासाठी पूरक ठरेल. संकल्पना तयार करण्यापासून सर्वसमावेशक अभियांत्रिकी आणि टर्नकी एसडीव्ही विकासापर्यंत, संपूर्ण उत्पादन मूल्य शृंखलेमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजच्या क्षमता बीएमडब्ल्यूच्या भविष्यासाठीच्या मोबिलिटी सोल्युशन्ससाठी प्रमुख सॉफ्टवेयर योजनांमध्ये नावीन्याला प्रोत्साहन देईल आणि भारतातील प्रभावशाली प्रतिभावंतांपर्यंत पोहोचणे सोपे बनवेल. 'भारतातील इंजिनीयर, जगासाठी' हा सिद्धांत या भागीदारी व्यवसायाचा केंद्रबिंदू ठरेल. भारतातील असामान्य अभियांत्रिकी व आयटी प्रतिभावंत एसडीव्ही, ऑटोमेटेड ड्रायव्हिंग, डिजिटल इन्फोटेन्मेन्ट आणि ऑटोमोटिव्ह डिजिटल सेवांसाठी धोरणात्मक सॉफ्टवेयर सोल्युशन्स विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतील. ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेयरव्यतिरिक्त, हा भागीदारी व्यवसाय बीएमडब्ल्यू ग्रुपच्या बिझनेस आयटीसाठी डिजिटल नावीन्य प्रदान करेल. परिणामी, बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया या कंपनीच्या जागतिक उत्पादन नेटवर्कच्या डिजिटल परिवर्तनाला वेग मिळवून देईल आणि त्यासोबतच डिजिटल कस्टमर जर्नी व विक्री प्रक्रियांना मजबूत करेल. एआय ऍप्लिकेशन्स आणि प्लॅटफॉर्म्सच्या विकासावर भर दिला जाईल, त्यामुळे सर्व प्रमुख व्यावसायिक प्रक्रियांचा वेग व कार्यक्षमता वाढेल. हा भागीदारी व्यवसाय युवा भारतीय प्रोफेशनल्सना अशा तंत्रांवर काम करण्याची एक अनोखी संधी प्रदान करतो, जो जागतिक स्तरावर मोबिलिटीच्या भविष्याला आकार देईल. स्थानिक प्रतिभांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि अत्याधुनिक ऑटोमोटिव्ह नावीन्यांना नवे रूप देण्याप्रती या व्यवसायाची बांधिलकी ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान इकोसिस्टिममध्ये ग्लोबल इनोव्हेशन हब म्हणून भारताची ओळख मजबूत करते. महत्त्वाकांक्षी प्रतिभावंत भागीदारी व्यवसायाचा भाग बनण्यासाठी आणि जागतिक प्रभाव निर्माण करणाऱ्या सोल्युशन्सना नवे रूप देण्यासाठी याठिकाणी अर्ज करू शकतात. बीएमडब्ल्यू ग्रुपसोबत भागीदारी व्यवसायाच्या स्थापनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना टाटा टेक्नॉलॉजीजचे सीईओ आणि एमडी वॉरेन हॅरिस यांनी सांगितले, "भारतात टाटा टेक्नॉलॉजीज ब्रँडचे स्थान मजबूत आहे, त्याचा लाभ घेत हा भागीदारी व्यवसाय अव्वल प्रतिभावंतांना आकर्षित करेल आणि मोबिलिटीच्या भविष्याची नवी व्याख्या रचणारी दूरदर्शी सोल्युशन्स विकसित करण्यासाठी एक मंच प्रदान करेल.  प्रीमियम, सॉफ्टवेयर-संचालित गाड्यांच्या अभियांत्रिकी, डिजिटल अनुभवांना वाढवण्यासाठी आणि त्यांच्या डिजिटल परिवर्तनाच्या यात्रेला वेग देण्यासाठी बीएमडब्ल्यू ग्रुपसोबत भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे."  टाटा टेक्नॉलॉजीजचे ऑटोमोटिव्ह सेल्सचे अध्यक्ष श्री नचिकेत परांजपे यांनी सांगितले, "ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानाचा वेगवान विकास वाहनांचा विकास घडवून आणण्याच्या पद्धती बदलत आहे, या बदलामध्ये सॉफ्टवेयर-डिफाइन्ड गाड्या सर्वात पुढे आहेत. टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये आमची सखोल ऑटोमोटिव्ह विशेषज्ञता आणि मूल्य शृंखलेमध्ये एंड-टू-एंड सोल्युशन्स - संकल्पना आणि तपशीलवार अभियांत्रिकीपासून उत्पादन अभियांत्रिकी आणि टर्नकी एसडीव्ही विकासापर्यंत - आम्हाला मोबिलिटीच्या भविष्याला आकार देण्यात बीएमडब्ल्यू ग्रुपचे समर्थन करण्यासाठी पूर्णपणे तयार करतात. या भागीदारी व्यवसायामार्फत आम्ही ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीजच्या सीमा ओलांडून पुढे जाऊ, अशा गाड्या बनवू ज्या आधुनिक असतील, इतकेच नव्हे तर, जगभरातील ग्राहकांना असामान्य ड्रायव्हिंग अनुभव देखील प्रदान करतील." बीएमडब्ल्यू ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेयरचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट क्रिस्टोफ ग्रोट यांनी सांगितले, "बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया हा आमच्या जागतिक वेहिकल सॉफ्टवेयर डेव्हलपमेंट उपक्रमांचा एक लक्षणीय भाग आहे. भारतातील सॉफ्टवेयर प्रतिभावंत आमच्या भविष्यासाठीच्या सॉफ्टवेयर-डिफाइन्ड गाड्यांसाठी खूप मूल्यवान ठरतील. गतिशील प्रक्रिया आणि अत्याधुनिक टूल्स यांच्यासह बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियामधील भारतीय अभियंते नाविन्यपूर्ण ऑटोमोटिव्ह डिजिटल अनुभव जसे की, ऑटोमेटेड ड्रायव्हिंग आणि अत्याधुनिक इन्फोटेन्मेन्ट सिस्टिम्स इत्यादी निर्माण करतील." बीएमडब्ल्यू ग्रुप आयटीचे सीईओ आणि सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अलेक्झांडर बुरेश यांनी सांगितले, "बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियासोबत आम्ही आमचे आंतरराष्ट्रीय आयटी-हब धोरण सातत्याने प्रगत करत आहोत आणि आमच्या ग्लोबल बिझनेस आयटीचा विस्तार करत आहोत. टाटा टेक्नॉलॉजीजसोबत आमची भागीदारी धोरणात्मक दृष्ट्या एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि आमच्या मूल्य शृंखलेमध्ये नाविन्यपूर्ण सॉफ्टवेयर सोल्युशन्स विकसित करण्यासाठी अधिक चांगली परिस्थिती प्रस्तुत करते. बीएमडब्ल्यू ग्रुपच्या डिजिटल परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान प्रतिभावंतांचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे." बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियाचे सीईओ आदित्य खेरा यांनी सांगितले, "बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया सुरु करून आम्ही जागतिक स्तराचे सॉफ्टवेयर हब तयार करत आहोत, जे बीएमडब्ल्यू ग्रुपच्या ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेयर आणि बिझनेस आयटी धोरणामध्ये प्रमुख भूमिका बजावेल. सॉफ्टवेयर-डिफाइन्ड गाड्यांमध्ये बीएमडब्ल्यू ग्रुप आणि टाटा टेक्नॉलॉजीजची लीडरशिप आणि त्यांच्या प्रॉडक्ट इंजिनीयरिंग उत्कृष्टता यांना एकत्र आणून आम्ही इनोव्हेशन आणि वृद्धीसाठी तसेच भारतातील अव्वल प्रतिभावंतांना बीएमडब्ल्यू ग्रुपच्या मोबिलिटी सोल्युशन्सच्या भविष्याला आकार देण्याची संधी देण्यासाठी तयार आहोत." बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियाच्या मॅनेजमेंट टीममध्ये दोन्ही पार्टनर कंपन्यांचे अनुभव एक्झिक्युटिव्ह आहेत. टाटा टेक्नॉलॉजीजच्या वतीने आदित्य खेरा, सीईओ म्हणून तर स्वेता गिरिनाथम सीएफओ आहेत. बीएमडब्ल्यू ग्रुपकडून स्टेफन फ्लेडर हे एंटरप्राइज आयटीचे सीओओ आणि ऑलिव्हर शेकल ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेयरचे सीओओ आहेत.

Popular