Industrialist
डॅम कॅपिटल अड्वायजर्स लिमिटेडचा आयपीओ गुरुवारी, खुला होणार
· डॅम कॅपिटल अड्वायजर्स लिमिटेडच्या, प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी समभागासाठी प्राईस बँड २६९ रुपये ते २८३ रुपये निश्चित करण्यात आला आहे.
· अँकर...
ट्रान्सरेल लायटिंग लिमिटेडची प्राथमिक सार्वजनिक समभाग विक्री (IPO) गुरुवारी सुरू होणार
● दर्शनी मूल्य २ रुपये असलेल्या प्रत्येक शेअरसाठी प्राइस बँड ₹ 410.00 to ₹ 432.00 निश्चित करण्यात आला आहे.
● बोली/ऑफर कालावधी गुरुवार, 19 डिसेंबर 2024 रोजी सुरू होईल आणि सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी संपेल.
● अँकर गुंतवणूकदार बोली/ऑफर कालावधी बुधवार, 18 डिसेंबर 2024 रोजी सुरू होईल आणि संपेल.
● बोली किमान 34 समभागांसाठी केली जाऊ शकते आणि त्यानंतर 34 समभागांच्या पटीत केली जाऊ शकते.
● आरएचपी लिंक : https://ingaventures.com/docs/offer-docs/TLL_RHP.pdf
● संपूर्ण तपशिलासाठी, कृपया 16 डिसेंबर, 2024 रोजीच्या फायनान्शियल एक्स्प्रेस वृत्तपत्राच्या पृष्ठ 24-25 वर प्रकाशित झालेल्या कायदेशीर जाहिराती पाहून घ्याव्या.
ट्रान्सरेल लायटिंग लिमिटेडच्या ("TLL" किंवा "कंपनी") समभागांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) संदर्भातील बोली/ऑफर गुरुवारी, 19 डिसेंबर 2024 रोजी सुरू होईल आणि सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी संपेल. अँकर गुंतवणूकदार बोली/ऑफर कालावधी बुधवार, 18 डिसेंबर 2024 रोजी सुरू होईल आणि संपेल.
प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये ₹4,000 मिलियनपर्यंत नव्या समभागांचा समावेश आहे, तसेच कंपनीच्या प्रवर्तकांपैकी एक असलेल्या अजन्मा होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ("प्रवर्तक विक्री शेअरधारक") 10,160,000 समभागांच्या "विक्रीचा" समावेश आहे.
कंपनीला यातून मिळणाऱ्या रकमेचा उपयोग (i) कंपनीच्या वाढत्या कार्यशील भांडवलाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, (ii) कंपनीच्या भांडवली खर्चासाठी आणि (iii) सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी करण्याचा प्रस्ताव आहे.
दर्शनी मूल्य २ रुपये असलेल्या प्रत्येक शेअरसाठी प्राइस बँड ₹ 410.00 to ₹ 432.00 निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 34 समभागांसाठी केली जाऊ शकते आणि त्यानंतर 34 समभागांच्या पटीत केली जाऊ शकते.
कंपनीचे समभाग बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) यांसारख्या स्टॉक एक्स्चेंजवर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे (BSE आणि NSE एकत्रितपणे “स्टॉक एक्स्चेंज”). ऑफरसाठी, BSE हे नामांकित स्टॉक एक्सचेंज असेल.
इंगा व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड आणि आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड हे ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) आहेत.
येथे वापरलेले सर्व संज्ञांकित शब्द, जे परिभाषित केलेले नाहीत, त्यांना रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेल्या अर्थानेच समजले जाईल.
ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे केली जात आहे, जी SCRR च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 यांच्याशी संबंधित आहे व SEBI ICDR नियम 6(1) च्या अनुपालनात आहे, ज्यामध्ये नेट ऑफरचा 50% पेक्षा जास्त भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना (“QIBs”) प्रमाणिक पद्धतीने वाटला जाईल (“QIB Portion”), हे मान्य करताना की, कंपनी बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने QIB भागापैकी 60% पर्यंत एंकर गुंतवणूकदारांना, SEBI ICDR नियमांनुसार, एक पर्यायी पद्धतीने वाटू शकते (“अँकर गुंतवणूकदार पोर्शन”), ज्यामध्ये एक तृतीयांश भाग देशी म्युच्युअल फंडसाठी राखीव असेल, याची अट आहे की देशी म्युच्युअल फंडकडून वैध बोली मिळाल्यावरच ते अँकर इन्व्हेस्टरसाठी असलेल्या किमतीत किंवा त्यापेक्षा अधिक किमतीवर दिले जातील. जर अधिक सब्सक्रिप्शन न मिळाल्यास किंवा अँकर गुंतवणूकदार पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास, शिल्लक समभाग QIB पोर्शनमध्ये समाविष्ट केले जातील (“नेट QIB पोर्शन”).
तद्नंतर, नेट QIB पोर्शनचा 5% भाग केवळ म्युच्युअल फंडसाठी प्रमाणिक पद्धतीने वाटपासाठी उपलब्ध असेल, याची अट आहे की, वैध बोली ऑफर किमतीवर किंवा त्यापेक्षा अधिक प्राप्त होईल आणि नेट QIB पोर्शनचा उर्वरित भाग सर्व QIBs, म्युच्युअल फंडसह, प्रमाणिक पद्धतीने वाटपासाठी उपलब्ध असेल, याची अट आहे की, वैध बोली ऑफर किमतीवर किंवा त्यापेक्षा अधिक प्राप्त होईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकत्रित मागणी नेट QIB पोर्शनच्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड पोर्शनसाठी उपलब्ध असलेल्या शिल्लक समभागांना उर्वरित नेट QIB पोर्शनमध्ये समाविष्ट करून, सर्व QIBs साठी प्रमाणिक पद्धतीने वाटप केले जाईल.
तद्नंतर, नेट ऑफरचा किमान 15% भाग गैरसंस्थात्मक बोलीदारांना आणि नेट ऑफरचा किमान 35% भाग किरकोळ व्यक्तिगत बोलीदारांना SEBI ICDR नियमांचे पालन करून, ऑफर किमतीवर किंवा त्यापेक्षा अधिक वैध बोली प्राप्त होण्याच्या अटीवर उपलब्ध असेल. गैरसंस्थात्मक पोर्शनचा एक तृतीयांश भाग ₹0.20 लाखांपेक्षा जास्त आणि ₹1.00 लाखांपर्यंत बोली आकार असलेल्या गैरसंस्थात्मक बोलीदारांना वाटपासाठी उपलब्ध असेल व दोन तृतीयांश भाग ₹1.00 लाखांपेक्षा जास्त बोली आकार असलेल्या गैरसंस्थात्मक बोलीदारांना वाटपासाठी उपलब्ध असेल, हे मान्य करताना की, या दोन्ही उपवर्गांमध्ये कोणत्याही गैरसंस्थात्मक पोर्शनमध्ये अधिक सब्सक्रिप्शन झाल्यास, शिल्लक समभाग त्या उपवर्गात गैरसंस्थात्मक बोलीदारांना दुसऱ्या उपवर्गात, SEBI ICDR नियमांचे पालन करून, ऑफर किमतीवर किंवा त्यापेक्षा अधिक वैध बोली प्राप्त होण्याच्या अटीवर वाटप केले जाऊ शकतात.
सर्व संभाव्य बोलीदात्यांना (अँकर गुंतवणूकदार वगळता) ऑफरमध्ये अनुप्रविष्ट होण्यासाठी Application Supported by Blocked...
कॉनकॉर्ड एनव्हीरो सीस्टिम्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री गुरुवार,19 डिसेंबर 2024 पासून सुरू
· प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर”) 665 रुपये ते 701 रुपयांपर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.
· बोली/ऑफर गुरुवार, 19 डिसेंबर 2024 रोजी खुली होईल आणि...
टायटनने ४० व्या वर्धापन दिनी ‘युनिटी वॉच’ सादर करून विंग कमांडर राकेश शर्मा यांना केले सन्मानित
बेंगलोर - उत्कृष्टतेची परंपरा जपत असल्याला ४ दशके पूर्ण करत टायटन वॉचेस आपला ४० वा वर्धापन दिन भारताच्या एका सर्वात अभिमानास्पद टप्प्याचा सन्मान करून साजरा करत आहे. अंतराळात जाणारे पहिले भारतीय, विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक सफारीचा सन्मान टायटन वॉचेस आपल्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त करत आहे. १९८४ साली सोविएत अंतराळयान सोयूझ टी-११ मधून अंतराळात झेप घेऊन श्री शर्मा यांनी भारताच्या इतिहासात एक सुवर्णपान जोडले, अंतराळातून भारत कसा दिसतो आहे याचे उत्तर देताना त्यांनी उच्चारलेले "सारे जहाँ से अच्छा" हे शब्द म्हणजे जणू देशाच्या शिरपेचावरील मानाचा तुरा आहेत. त्यांचे हे एक उत्तर कोट्यावधी देशवासियांच्या हृदयावर कायमचे कोरले गेले, या एका वाक्याने अवघ्या जगाला एकजूट भारताचे दर्शन घडवले. ४० वर्षांनंतर स्वतःचा कारीगरी आणि नाविन्याचा वारसा साजरा करत असताना, टायटन ब्रँडने लॉन्च केले आहे 'युनिटी वॉच', सेलेस्टीयलपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेला हा लिमिटेड-एडिशन मास्टरपीस भारताची ही अतुलनीय गाथा सन्मानपूर्वक आपल्यासमोर मांडतो. एकता आणि अमर्याद संधी - अंतराळामधून पृथ्वीकडे पाहताना श्री शर्मा यांच्या मनात उमटलेल्या या भावनांपासून प्रेरणा घेऊन टायटनने 'युनिटी वॉच' तयार केले आहे. मानवतेची स्वप्ने आणि एकतेने गुंफलेले भविष्य यांनी एकत्र आलेल्या जगाचे व्हिजन या नावामधून दर्शवण्यात आले आहे.
लिमिटेड एडिशन युनिट वॉचचे फक्त ३०० पीस बनवण्यात आले आहेत. लुपा, बंगलोर येथे आयोजित करण्यात आलेल्या, एका विशेष हृदयस्पर्शी सोहळ्यामध्ये टायटनने या कलेक्शनमधील पहिले युनिटी वॉच विंग कमांडर राकेश शर्मा यांना दिले. यावेळी श्री शर्मा यांनी अंतराळवारीच्या थरारक आठवणी सांगितल्या, अंतराळातून दिसणाऱ्या पृथ्वीच्या विहंगम रूपाचे पुन्हा वर्णन केले. सीमांच्या पलीकडे जाऊन 'वसुधैव कुटुम्बकम' या विचाराची आठवण करून देणारा त्यांचा दृष्टिकोन सर्वांना प्रेरित करणारा ठरला. टायटनच्या डिझाईन टीमने हे विशेष घड्याळ तयार करण्यामागची नाजूक, तपशीलवार प्रक्रिया समजावून सांगितली. अंतराळ यात्रा आणि घड्याळ बनवण्याची प्रक्रिया या दोन्हींमध्ये अचूकता व अभियांत्रिकी ज्ञान, कौशल्ये अत्यंत गरजेची असतात. या सर्व चर्चांनी अवघे वातावरण प्रेरणादायी बनले, सुवर्ण आठवणींना उजाळा मिळाला. टायटनचे वॉचमेकिंग आणि अंतराळ संशोधनात भारताने केलेली अचाट प्रगती या दोन्हींमधून "मेक इन इंडिया" अधोरेखित झाल्याचे यावेळी ठळकपणे दिसून आले.
टायटन वॉचेसचे व्हाईस प्रेसिडेंट आणि सीएसएमओ श्री राहुल शुक्ला यांनी सांगितले, "गेली चार दशके टायटनने तयार केलेल्या प्रत्येक घड्याळामध्ये "भारत" अंतर्भूत आहे. यावर्षी आम्ही विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक अंतराळवारीला ४० वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहोत, एकजूट भारताच्या अमर्याद महत्त्वाकांक्षा दर्शवणारी ही घटना देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. आमच्या इन-हाऊस टीमने तयार केलेले युनिटी वॉच नावीन्य आणि 'मेक इन इंडिया' ची कलात्मकता दर्शवते. हे घड्याळ अंतराळ, विज्ञान यांचा सन्मान करते, समृद्ध भारतीय परंपरा दर्शवणारी घड्याळे तयार करण्यात उचललेले पुढचे पाऊल म्हणजे हे घड्याळ आहे. हे कलेक्शन लॉन्च करून आम्ही भारताच्या दुर्दम्य महत्त्वाकांक्षा दर्शवणारी घड्याळे तयार करण्याची आमची बांधिलकी अधिक मजबूत करत आहोत."
विंग कमांडर राकेश शर्मा म्हणाले, "अंतराळातून जेव्हा आपण पृथ्वीकडे पाहतो तेव्हा काळाला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. ४० वर्षांपूर्वी मी जेव्हा वरून पृथ्वीकडे पाहिले तेव्हा मला कोणत्याच सीमा दिसून आल्या नाहीत, दिसली ती एक सुंदर, एकजूट पृथ्वी. भविष्यातील पिढ्यांसाठी आपल्या सुंदर घराचे संरक्षण करण्यासाठी सहकार्याऐवजी संघर्षाला प्राधान्य देणारे सामाजिक मॉडेल कालबाह्य झाले आहे, ते बाजूला सारण्याची वेळ आली आहे. युनिट वॉचेसमध्ये टायटनने हा विचार इतक्या चपखलपणे आणि कुशलतेने मांडला हे पाहून मला खूप आनंद झाला. याच्या सेलेस्टीयल डायलमध्ये मला आपला प्रिय भारत दिसतो, घड्याळावरील कोरीवकाम आठवण करून देते की, आपण वेळ सेकंदांमध्ये मोजतो पण प्रगतीचे मोजमाप हे आपल्याला लाभलेल्या शांततेतून केले पाहिजे. हे घड्याळ अंतराळातील प्रवासाची आठवण करून देते, इतकेच नव्हे तर प्रत्येक भारतीयामध्ये असलेली, ताऱ्यांना कवेत घेण्याची क्षमता देखील दाखवून देते."
युनिटी वॉचमध्ये टायटनने कलात्मकता आणि नावीन्य यांची नवी व्याख्या रचली आहे, पहिले कन्सील्ड ऑटोमॅटिक घड्याळ म्हणजे अतुलनीय शान आणि क्रांतिकारी डिझाईनचा मास्टरपीस आहे. आकर्षक मिडनाईट ब्ल्यू रंगाची डायल अतिशय बारकाईने चित्रित करण्यात आलेला भारत दर्शवते, विंग कमांडर राकेश शर्मा यांना अंतराळातून दिसलेल्या भारताचे विहंगम दृश्य इथे पाहायला मिळते. देशभक्तीचे तीन रंग केशरी, सफेद आणि हिरवा काट्यांवर ठळकपणे दिसतात. सेकंद काट्याचा आकार रॉकेटसारखा आहे, श्री शर्मा यांच्या ऐतिहासिक अंतराळवारीचे आणि निग्रही शोधाचे हे प्रतीक आहे. या सगळ्याचा मानबिंदू आहे श्री शर्मा यांचे ऐतिहासिक वाक्य "सारे जहाँ से अच्छा" या घड्याळाच्या मागे कोरण्यात आले आहे. त्यासोबतच ती ऐतिहासिक तारीख देखील नमूद करून भारताच्या अमर्याद महत्त्वाकांक्षा व यश यांचा सन्मान करण्यात आला आहे.
निवडक टायटन स्टोर्समध्ये आणि ऑनलाईन खरेदीसाठी हे घड्याळ उपलब्ध असल्याची घोषणा करून टायटनने देशाच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण कायम आपल्यासोबत ठेवण्याची संधी घड्याळप्रेमींना दिली आहे.
*केएसबी लिमिटेडच्या कृषी, घरगुती आणि सौर पंपांच्या स्टॉल्सना किसान प्रदर्शनात उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : मोशी येथे 11 ते 15 डिसेंबर 2024 दरम्यान होणाऱ्या ,किसान प्रदर्शनामध्ये केएसबी लिमिटेडने कृषी, घरगुती आणि सौर पंपांच्या प्रगत तंत्रज्ञानाची झलक सादर...
