Industrialist
पुणे शहराने ३.१३ लाख कोटी रूपये एयूएम गाठला
पुणे: असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (एएमएफआय)ने आजमहाराष्ट्रातील म्युच्युअल फंड परिसंस्थेमधील पुणे शहराची वाढती भूमिका निदर्शनास आणली,ज्यासह शहरातील गुंतवणूकदारांना शिस्तबद्ध, दीर्घकालीन मालमत्ता निर्मिती...
विंगमॅनएक्स अवॉर्ड्स 2025-26 पुण्यात 15 फेब्रुवारीला
पुणे:
भारताच्या राइडिंग समुदायासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणाऱ्या विंगमॅनएक्स अवॉर्ड्स 2025-26 चे उद्घाटन 15 फेब्रुवारी 2026 रोजी हॉटेल हयात पुणे येथे होणार आहे. भारतातील आघाडीचे कम्युनिटी-टेक व्यासपीठ विंगमॅनएक्स, मोटरसायकलस्वारांसाठी समर्पित या पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांचे आयोजन करत आहे. हा कार्यक्रम केवळ आमंत्रित व्यक्तींसाठीच विशेष प्रवेश आहे.
राइडर-नेतृत्वाखालील सन्मानासाठी राष्ट्रीय मापदंड ठरणाऱ्या या पुरस्कारांचा उद्देश भारतीय मोटरसायकलिंगची खरी ओळख ठरवणाऱ्या चिकाटी, शिस्त, जबाबदारी आणि समुदायभावना यांचा गौरव करणे हा आहे. भारतात प्रथमच राइडिंग परिसंस्थेला मुल्यवर्धित करणाऱ्या गुणांसाठी राइडर्स आणि राइडिंग समुदायांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान केला जाणार आहे.
एका राइडरच्या गरजेतून उगम पावलेले आणि वाढत्या समुदायाने घडवलेले विंगमॅनएक्स अवॉर्ड्स, देशभरातील मोटरसायकलिंग संस्कृतीला शांतपणे बळकट करणाऱ्या व्यक्ती आणि क्लब्सचा सन्मान करतात.
या पुरस्कारांमध्ये एकूण 20 निवडक श्रेणी आहेत, ज्यात वैयक्तिक उत्कृष्टता आणि सामूहिक समुदाय प्रभाव या दोन्हींचा समावेश आहे. सुरक्षित राइडिंगचे नेतृत्व, लांब पल्ल्याचे राइडिंग, महिला राइडर्स आणि समुदाय-नेतृत्वाखालील उत्कृष्टतेचा गौरव करणाऱ्या श्रेणी यात समाविष्ट असतील. यामध्ये गार्डियन राइडर अवॉर्ड, लाँग हॉल लेजेंड्स, शी राईड्स फ्री, क्लब ऑफ द इयर, सेफ्टी-फर्स्ट क्लब अशा श्रेणींचा समावेश आहे.
या उपक्रमामागील दृष्टीकोन स्पष्ट करताना निलेश साने, सीईओ आणि संस्थापक, विंगमॅनएक्स म्हणाले, “विंगमॅनएक्सची सुरुवात राइडर्सना योग्य राइडिंग साथीदार शोधण्यात मदत करण्याच्या साध्या कल्पनेतून झाली. कालांतराने ते विश्वास, जबाबदारी आणि समुदायभावनेवर उभे असलेले एक व्यापक परिसंस्था बनले. विंगमॅनएक्स अवॉर्ड्स हे अशा राइडर्सचा सन्मान करण्याचे आमचे माध्यम आहे, जे रोज या मूल्यांनुसार जगतात आणि कोणतीही प्रसिद्धीची अपेक्षा ना करता, भारताची मोटरसायकलिंग संस्कृती घडवतात.”
याच भावनेला दुजोरा देताना उर्वशी पाटोले, पार्टनर – कम्युनिटी आणि मार्केटिंग म्हणाल्या, “राइडिंग विश्वात अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या सातत्य, शिस्त आणि उत्कटतेचा हा सन्मान आहे. मोटरसायकलिंग संस्कृती सतत विकसित होत असते आणि विंगमॅनएक्स अवॉर्ड्स दरवर्षी वाढत जाण्यासाठी सुरू केले गेले आहेत. हे पुरस्कार राइडर्सना केवळ त्यांनी किती अंतर प्रवास केला यासाठी नव्हे, तर त्यांनी समुदायाला कसे उंचावले यासाठी सन्मानित करतात.”
डॉ. साहिल त्रिंबके, सह-संस्थापक, विंगमॅनएक्स यांनी पुढे सांगितले, “मोटरसायकलिंग म्हणजे केवळ राइडिंग कौशल्य नाही; ते निर्णयक्षमता, जबाबदारी आणि रस्त्यावर एकमेकांची काळजी घेण्याची भावना आहे. विंगमॅनएक्स अवॉर्ड्स अशा राइडर्स आणि समुदायांचा सन्मान करतात, जे आपल्या कृतीतून ही मूल्ये स्थापित करतात, केवळ कामगिरीतून नव्हे. या मूल्यांचा सार्वजनिक गौरव करून आम्ही देशभरात अधिक सुरक्षित आणि जबाबदार राइडिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची अपेक्षा ठेवतो.”
या पुरस्कारांच्या केंद्रस्थानी आहे विंगमॅनएक्स अॅप – राइडर्सनी राइडर्ससाठी तयार केलेले भारतातील अग्रगण्य कम्युनिटी-टेक व्यासपीठ. भारतातील विखुरलेल्या राइडिंग विश्वाला एक सुसंगत डिजिटल आधार देणारे हे अॅप राइड ट्रॅकिंग, क्लब मॅनेजमेंट, सुरक्षा वैशिष्ट्ये, सत्यापित राइडर प्रोफाइल्स आणि समुदाय शोध अशा सुविधा पुरवते. अलीकडेच यात राइडर बॅजेस, राइडदरम्यान लाईव्ह ग्रुप लोकेशन ट्रॅकिंग आणि पीअर-आधारित राइडर रेटिंग्स ही नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत, ज्यामुळे जबाबदारीची भावना अधिक बळकट होते.
80,000 हून अधिक अॅप डाउनलोड्स आणि 500 पेक्षा जास्त राइडिंग क्लब्स आधीच सक्रिय असलेल्या विंगमॅनएक्स प्लॅटफॉर्मवर, भारतीय मोटरसायकलस्वार कसे जोडले जातात, कसे राइड करतात आणि एकत्र कसे प्रगती करतात याची व्याख्या सतत नव्याने केली जात आहे.
विंगमॅनएक्स अवॉर्ड्स 2025-26 हे वार्षिक उपक्रम म्हणून संकल्पित असून, येत्या काळात भारतीय मोटरसायकलस्वारांसाठी सर्वात विश्वासार्ह आणि प्रेरणादायी सन्मान मंच ठरण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे.
विंगमॅनएक्स विषयी:
विंगमॅनएक्स हे भारतातील आघाडीचे कम्युनिटी-टेक परिसंस्था आहे, जे तंत्रज्ञान, समुदाय आणि सामायिक अनुभवांच्या माध्यमातून अधिक सुरक्षित, जबाबदार आणि परस्पर जोडलेली राइडिंग संस्कृती घडवण्यावर लक्ष केंद्रित करते. हे ॲप गूगल प्ले आणि ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे.
एमएसएमईसाठी उच्च कर्जमूल्य आणि त्याच दिवशी वितरण सुविधेसह अॅक्सिस बँकेची सुवर्ण कर्ज योजना
पुणे : भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) सुवर्ण कर्ज योजना सुरू केली आहे. ही एक सुरक्षित...
महिंद्राचा महाराष्ट्रात एकात्मिक ऑटो आणि ट्रॅक्टर उत्पादन प्रकल्प:15,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा.
नागपूर येथील प्लांटमध्ये 2028 पासून उत्पादनास सुरुवात
नागपूर,: महाराष्ट्रातील नागपूर येथे ऑटोमोबाईल्स आणि ट्रॅक्टरसाठी आपला सर्वात मोठा एकात्मिक उत्पादन प्रकल्प उभारण्याची घोषणा महिंद्रा ग्रुपने आज केली आहे....
इटलीतील कंपनीकडून आणलेल्या यंत्रसामग्रीसह रत्नागिरीतील प्रकल्प मंजूर मानकांनुसारच कार्यरत ..
रत्नागिरी- स्थानिक नागरिकांनी गेल्या महिन्यात प्रकल्पाशी संबंधित पर्यावरणीय संरक्षण उपायांबाबत अधिक माहिती मिळावी, या मागणीसाठी प्रश्न उपस्थित करत आंदोलन केले होते.रत्नागिरीतील स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्रातील राजकारण्यांनी, इटलीतील मिटेनी (Miteni) या सांडपाणी प्रदूषणाच्या आरोपाखाली वादग्रस्त ठरलेल्या कंपनीची यंत्रसामग्री वापरून लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेडचा नवा प्रकल्प किनारपट्टी जिल्ह्यात कार्यरत असल्याबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्पष्ट केले की संबंधित कंपनीचे कामकाज मंजूर मानकांच्या चौकटीतच सुरू आहे
केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यसभेत लेखी निवेदन सादर केले. त्यामध्ये म्हटले आहे की,“महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) दिलेल्या माहितीनुसार सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा तसेच वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा पूर्णपणे कार्यरत आहेत. घातक कचऱ्याची साठवणूक वैज्ञानिक पद्धतीने करण्यात येत असून, त्याची विल्हेवाट कायदेशीर प्रक्रियेनुसार लावली जात आहे.4 नोव्हेंबर 2025 रोजीचे ताजे संयुक्त दक्षता नमुना (JVC) अहवाल मंजूर मानकांच्या मर्यादेत आहेत,” असे या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
“केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एमआयडीसी लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या एम/एस लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने 2021–22 या कालावधीत इटलीतील एम/एस मिटेनी एसपीए (Miteni Spa) या कंपनीकडून उत्पादनासाठी आवश्यक पायाभूत यंत्रणा खरेदी केली होती,” असे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
तिवारी यांनी प्रश्न उपस्थित केला की, रत्नागिरीतील सार्वजनिकरित्या सूचीबद्ध रासायनिक प्रकल्पात 2018 मध्ये कथित पीएफएएस (Per- and Polyfluoroalkyl Substances) प्रदूषण प्रकरणानंतर बंद करण्यात आलेल्या इटलीतील मिटेनी (Miteni) या कंपनीकडून खरेदी केलेली यंत्रसामग्री व तंत्रज्ञान वापरले जात आहे का. पीएफएएस किंवा ‘फॉरेव्हर केमिकल्स’ म्हणून ओळखले जाणारे घटक हे कृत्रिम रसायन असून, ते पर्यावरणात सहज विघटित होत नाहीत.
दरम्यान, रत्नागिरीतील स्थानिक नागरिकांनी गेल्या महिन्यात प्रकल्पाशी संबंधित पर्यावरणीय सुरक्षिततेबाबत अधिक माहिती मिळावी, या मागणीसाठी प्रश्न उपस्थित करत आंदोलन केले होते. कंपनीच्या कामकाजाचा आढावा घेत असल्याचे सांगितले जाणारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) अधिकारी प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत, असेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
मंत्रालयाच्या उत्तरात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित कंपनीला राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाकडून (State Environment Impact Assessment Authority) पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर हा प्रकल्प कंपनीच्या पूर्णतः मालकीच्या उपकंपनी यलोस्टोन फाइन केमिकल्स प्रा. लि.कडे हस्तांतरित करण्यात आला. तसेच, गेल्या वर्षी कंपनीला उत्पादन विस्तारासाठीही पर्यावरणीय मंजुरी मिळाली आहे.
मार्च 2021 मध्ये सेबीकडे सादर करण्यात आलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये — जो आयपीओपूर्व प्रक्रिया असते — लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेडने फ्लुओरॉस्पेशाल्टी रसायनांच्या उत्पादनासाठी प्रस्तावित प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे नमूद केले होते. या नोंदीनुसार, ही रसायने औषधनिर्मिती, कृषी रसायने, एअरोस्पेस तसेच वाहन उद्योगात वापरली जातात.
कंपनीने स्पष्ट केले होते की, वाढीच्या धोरणाचा एक भाग म्हणून फ्लुओरॉस्पेशाल्टी रसायनांचा व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, त्यासाठी इटलीतील मिटेनी एसपीए (Miteni SPA) — सेंद्रिय फ्लुओरॉस्पेशाल्टी आणि इलेक्ट्रोकेमिकल फ्लुओरिनेशन क्षेत्रातील उत्पादक — यांची काही प्रकल्प यंत्रणा, उपकरणे तसेच पेटंट्स (मिटेनी अॅसेट्स) विकत घेण्यात आली आहेत. ही खरेदी जून 2019 मध्ये झालेल्या लिलाव प्रक्रियेतून एकूण युरो 4.63 दशलक्ष इतक्या रकमेवर, कंपनीची पूर्णतः मालकीची उपकंपनी विवा लाइफसायन्सेस प्रा. लि.च्या माध्यमातून करण्यात आली होती.
यानंतर कंपनीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत सुमारे 80,000 चौ. मी. क्षेत्रफळावर नवा प्रकल्प उभारला.
दरम्यान, प्रमोद तिवारी यांनी सरकारकडे पीएफएएस (PFAS) रसायनांवर बंदी घालणारे नियम आहेत का, असा सवालही उपस्थित केला. यावर मंत्रालयाने उत्तर देताना स्पष्ट केले की, “पीएफएएस उत्पादनावर बंदी घालणारे कोणतेही विशिष्ट पर्यावरणीय नियम सध्या अस्तित्वात नाहीत.” मात्र, पीएफएएस गटातील ट्रायफ्ल्युरॅलिन आणि ऑक्सिफ्ल्युरोफेन ही दोन कीटकनाशके मर्यादित वापराच्या श्रेणीत आहेत. तसेच, कीटकनाशक कायदा, 1968 अंतर्गत असलेल्या अनुसूचीत 126 पीएफएएस सक्रिय घटकांचा समावेश करण्यात आला असल्याचेही मंत्रालयाने नमूद केले आहे.
