Industrialist

डबल डेकरचे पुनरुज्जीवन: भारतातील पहिल्या आणि अनोख्या इलेक्ट्रिक डबल-डेकर बसचे अनावरण

·         प्रगत आणि इलेक्ट्रिक तंत्रज्ञान उत्पादनाद्वारे वैशिष्ट्यपूर्ण डबल डेकरच्या आठवणी परत ताज्या ·         भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बस: आरामदायी आणि शहरी दळणवळणासाठी उपयुक्त ·         शैली, तंत्रज्ञान, सुरक्षितता, आराम आणि पर्यावरणाला...

लॉकडाऊनमुळे घरातील शाश्वत जीवनशैलीवर परिणाम :८४% पुणेकर कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून काम पुन्हा सुरू करण्यास उत्सुक -घरे कधीही कार्यालयांची जागा घेऊ शकत नाहीत

गोदरेज प्रॉपर्टी होम लिव्हअॅबिलिटी फॅक्टर्स अहवालातील प्रमुख ठळक मुद्दे: · पुण्यातील ७४% लोकांचे म्हणणे आहे की लॉकडाऊनमुळे घरातील शाश्वत जीवनशैलीवर परिणाम झाला आहे. ७०% हून अधिक पुणेकर...

रेसिंग इंडियाचे राजीव सेतु यांची एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपमध्ये टॉप ५ फिनिशसह भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी

स्पोर्ट्सलँड सुगो (जपान) – इदेमित्सु होंडा रेसिंग इंडियाने एफआयएम रोड रेसिंग चॅम्पियनशीप २०२२ मध्ये (एआरसीसी) आजवरची सर्वात चांगली कामगिरी केली आहे. आजच्या रेसमध्ये रायडर्सनी भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली....

भारतभरात ५,००० इलेक्ट्रिक बसेस तैनात करण्यासाठी स्विच मोबिलिटी आणि चलो यांचा परस्पर सहयोग

चेन्नई, भारत – ११ ऑगस्ट २०२२: अत्याधुनिक कार्बन न्यूट्रल इलेक्ट्रिक बस आणि वजनाने हलक्या व्यावसायिक वाहनांची कंपनी स्विच मोबिलिटी लिमिटेड ('स्विच') आणि भारतातील आघाडीची वाहतूक तंत्रज्ञान कंपनी चलो यांनी भारतभरात ५,००० अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेस तैनात करण्यासाठी धोरणात्मक सहयोग करत असल्याचे आज जाहीर केले. तीन वर्षांच्या सुरुवातीच्या कालावधीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. बसेस मेट्रो आणि इतर शहरांमध्ये तैनात केल्या जातील, ज्यामध्येसुरुवातीला स्विच EiV 12 प्रकारच्या गाड्या समाविष्ट आहेत. स्विच मोबिलिटी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्विच मोबिलिटी लिमिटेडचे मुख्य कामकाज अधिकारी महेश बाबू म्हणाले, "भारतातील बदलत्या दळणवळण रचनांमुळे लोकांच्या शहरांमध्ये प्रवास करण्याच्या पद्धतीत लक्षणीय बदल होत आहेत. स्वच्छ, शाश्वत इलेक्ट्रिक वाहतूक उपायांचा अवलंब करण्याच्या आमच्या दृष्टीकोनाला चालना देताना या क्षेत्रात अशा प्रकारची पहिली भागीदारी चलो सोबत  करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत इलेक्ट्रिक वाहन उत्पादनांसह चलोच्या मजबूत ग्राहक संपर्क आणि ऑपरेशनल कौशल्याचा फायदा घेऊन देशातील शहरी गतिशीलता बदलण्याचे आमचे ध्येय आहे. ५००० इलेक्ट्रिक बसेसची ही महत्त्वपूर्ण भागीदारी ग्राहकांचा एकूण अनुभव उंचावताना नक्कीच परवडणाऱ्या, आरामदायी, त्रासमुक्त आणि पर्यावरणास अनुकूल वाहतूक उपायांसाठी निश्चित प्रवेश खुला करेल." चलोचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित दुबे म्हणाले, "भारताच्या दैनंदिन प्रवासात बसेसचा ४८% वाटा आहे आणि तरीही आपल्याकडे १०,००० लोकांसाठी फक्त ३ बस आहेत. बसचा ताफा वाढवणे आणि उच्च दर्जाच्या बसेस उपलब्ध करून देणे हे प्रत्येकासाठी प्रवास अधिक चांगला करण्याचा चलोचा उद्देश साध्य करण्यासाठीची महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. गेल्या वर्षी आम्ही आमच्या तीन शहरांमध्ये १,००० नवीन बसची भर घालण्याचा प्रकल्प अंतिम केला. आज ५ पट मोठ्या प्रमाणावर स्विचसह भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. या बसमधील प्रवासाचा अनुभव हाँगकाँग आणि सिंगापूर सारख्या जागतिक शहरांमधील प्रवासाच्या तोडीचा असेल. आम्हाला विश्वास आहे की हा सहयोग शाश्वत शहरे निर्माण करण्याच्या दिशेने आमचा एकत्रित प्रवास पुढे सुरू ठेवेल." या भागीदारीअंतर्गत स्विच आणि चलो सध्या चलो कार्यरत असलेल्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसेस तैनात करण्यासाठी संयुक्तपणे गुंतवणूक करतील. चलो लाइव्ह बस ट्रॅकिंग, डिजिटल तिकिटे आणि प्रवास योजना यांसारख्या सुविधा देणारे चलो अॅप आणि चलो कार्ड सारख्या ग्राहक तंत्रज्ञान उपायांचा वापर करेल; आणि मार्ग, वारंवारता, वेळापत्रक आणि भाडे देखील निर्धारित करेल. स्विचच्या जबाबदाऱ्यांमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा आणि देखभाल यांचा समावेश आहे. स्विच मोबिलिटी बद्दल स्विच मोबिलिटी ही हरित दळणवळणाद्वारे जीवन समृद्ध करण्याचे ध्येय असलेली अत्याधुनिक इलेक्ट्रिक बस आणि वजनाने हलक्या व्यावसायिक वाहनांची कंपनी आहे. एक परिपक्व स्टार्ट अप असलेल्या स्विच मध्ये जगातील चौथ्या क्रमांकाची बस OEM अशोक लेलँड आणि बस डिझाइनमध्ये नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात शतकाहून अधिक अनुभव असलेल्या UK बस उत्पादक, Optare यांच्या नाविन्यपूर्ण EV घटकांमधून परिश्रमपूर्वक उत्पादन करण्यात आले. २०१४ मध्ये, स्विच (त्यावेळचे Optare) ने लंडनच्या रस्त्यांवर प्रथम ब्रिटीश निर्मित, शुद्ध इलेक्ट्रिक बसेस सादर केल्या आणि तेव्हापासून विकसित आणि विकसनशील बाजारपेठांमध्ये ३० दशलक्ष इलेक्ट्रिक मैल चालवून ३०० ईव्हीज मार्गांवर आणल्या आहेत. यूके तील लीड्स आणि भारतातील चेन्नई येथे आमच्या साइट्सवर समर्पित टीम्ससह एक समूह म्हणून काम करताना आमची बाजारपेठेतील आघाडीची वाहने जगभरातील ४६ पेक्षा जास्त देशांमध्ये विकली जातात आणि अद्वितीय उत्पादने तयार करण्यासाठी ब्रिटिश आणि भारतीय डिझाइन, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी यांचा उत्तम मेळ घालतात. हलक्या वजनाच्या वाहन रचने मधील अनुभव, निव्वळ शून्य कार्बन तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण, सॉफ्टवेअर आणि ग्राहक सेवा यामधील आमच्या प्रात्यक्षिक अनुभवाचा आणि सिद्ध कौशल्याचा फायदा घेत स्विच मोबिलिटीचे उद्दिष्ट उद्योगातील व्यावसायिक ईव्ही पुरवठादार आणि नियोक्ता बनण्याचे आहे. त्याच्या उपकंपनी OHM द्वारे, स्विच देखील eMaas सेवांची श्रेणी सादर करते, समुदायांना त्यांच्या शून्य उत्सर्जन वाहतूक नेटवर्कमध्ये संक्रमण करण्यास पाठबळ देते. चलो बद्दल चलो ही भारतातील आघाडीची वाहतूक तंत्रज्ञान कंपनी असून ती ४० शहरांमध्ये कार्यरत आहे. प्रत्येकासाठी प्रवास अधिक चांगला करण्याच्या  मूळ उद्देशाने २०१४ मध्ये तिची स्थापना करण्यात आ ली. चलो अॅप १५००० हून अधिक बसचे थेट ट्रॅकिंग पुरविते आणि हे भारताचे #1 बस ट्रॅकिंग अॅप आहे. चलो कार्ड , एक संपर्करहित टॅप-टू-पे ट्रॅव्हल कार्ड असून ते भारतातील सर्वात यशस्वी बस ट्रॅव्हल कार्ड आहे. हे बस कार्ड तसेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. चलो, चलो अॅप आणि चलो कार्डवर सुपर सेव्हर प्रवास योजना देखील सादर करते जे बस प्रवाशांना त्यांच्या बस प्रवासावर पैसे वाचविण्यात मदत करते. चलो ने आपले तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म कार्यरत करण्यासाठी आणि बस प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी २५०० पेक्षा जास्त बस ऑपरेटर्ससोबत भागीदारी केली आहे. जुलै २०२२ मध्ये, चलोने त्याच्या प्लॅटफॉर्मवर १२० दशलक्ष राइड्स केल्या.

ईझबझला आरबीआयकडून पेमेंट अ‍ॅग्रीग्रेशन अथोरायझेशनसाठी तत्वतः मंजुरी

पुणे, ११ ऑगस्ट २०२२ – पेमेंट सोल्यूशन्स प्लॅटफॉर्म ईझबझ प्रा. लि. ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) पेमेंट अ‍ॅग्रीग्रेटर (पीए) अथोरायझेशनसाठी तत्वतः मंजुरी मिळाल्याचे जाहीर केले. ईझबझ हा डिजिटल प्लॅटफॉर्म असून तिथे व्यवसायांना ‘टेक्नॉलॉजीवर आधारित उपाययोजना’ पेमेंट्सह दिल्या जातात व त्यामुळे त्यांना वसुलीचे डिजिटायझेशन सहजपणे करता येते. इतक्या वर्षांत कंपनीने परवडणारे, वापरण्यास सोपे एपीआयवर आधारित प्लॅटफॉर्म तयार केले आहेत, ज्याच्या मदतीने छोट्या व्यवसायांना वसुलीशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ‘सुविधा’ उपलब्ध होतात. अनुदानित किंमतीच्या बाबतीतही त्यांना लाभ होतो तसेच एकत्रीकरणास सोपे एपीआय आणि एंड युजरसाठी सर्व प्रकारच्या पेमेंट पद्धतींचाही त्यात समावेश असतो. अतिशय सोप्या पद्धतीने अवलंब करता येण्यासारख्या, विस्तारक्षम एपीआय सुविधांच्या मदतीने ईझबझ एमएसएमईजसाठी पेमेंटच्या पूर्ण प्रक्रिया मिळवून देत आहे. त्याद्वारे सध्या अस्तित्वात असलेल्या ६३ दशलक्ष भारतीय एमएसएमईजसाठीची आर्थिक ऑपरेटिंग सिस्टीम बनून डिजिटल क्रांती घडवून आणण्याचे ध्येय आहे. याविषयी ईझबझचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित प्रसाद म्हणाले, ‘आरबीआय रेग्युलेशनमुळे डिजिटल पेमेंट इकोसिस्टीममध्ये निश्चितच आणखी विश्वासार्हता तयार होते आणि आमच्यासारख्या कंपन्यांना नाविन्यपूर्ण सुविधा तयार करून देशातील डिजिटल पेमेंट्सच्या वाढीला चालना व बळकटी देण्यास मदत होते. सुरक्षित, अत्याधुनिक आणि वापरण्यास सोप्या पेमेंट पद्धती तयार करण्यावर आमचा भर असून या पद्धती भारतीय एसएमईंजना सहजपणे उपलब्ध करून देत ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना सक्षम करण्याचे ध्येय आहे.’ मार्च २०२० मध्ये आरबीआयने ऑनलाइन क्षेत्रातील पेमेंट सुविधा देणारे पेमेंट अ‍ॅग्रीग्रेटर्स आणि पेमेंट गेटवेजचे नियमन करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली. या तत्वांनुसार पेमेंट अ‍ॅग्रीग्रेटर्स ई- कॉमर्स साइट्सच्या सुविधा उपलब्ध करून देणारे व व्यापाऱ्यांना ग्राहकांकडून वेगवेगळ्या पेमेंट पद्धती स्वीकारण्याची क्षमता देणारे तसेच त्यासाठी व्यापाऱ्यांना त्यांची स्वतःची पेमेंट इंटिग्रेशन यंत्रणा तयार करण्याची गरज भासू न देणारे घटक आहेत. पीएजमुळे व्यापाऱ्यांना त्यांच्या प्राप्तीकर्त्यांशी जोडून घेता येते. या प्रक्रियेदरम्यान त्यांना ग्राहकांकडून पेमेंट्स मिळतात, ते एकत्रित करून कालांतराने व्यापाऱ्यांना हस्तांतर केले जाते. ईझबझ प्रा. लि. ईझबझ ही पुण्यात स्थित असलेली फुल- स्टॅक कंपनी असून विविध क्षेत्रांतील अंदाजे ७०,००० व्यवसायांना सेवा देते. कंपनीद्वारे लहान व मध्यम आकाराच्या व्यवसायांना डिजिटल वसुलीला चालना देण्यासाठी मदत करण्यावर भर दिला जातो.

Popular