Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

Industrialist

वॅस्कॉन इंजिनीयर्सने मिळविला मुंबईतील महालक्ष्मी येथील 161 कोटी रु. चा पुनर्विकास प्रकल्प

मुंबई, 10 ऑक्टोबर 2025: जवळपास चार दशकांचा वारसा असलेल्या अग्रगण्य EPC आणि रिअल्टी कंपन्यांपैकी एक वॅस्कॉन इंजिनीयर्स लिमिटेड (VASCONEQ) ला एमएसईबी होल्डिंग कंपनी लिमिटेड कडून मुंबईतील महालक्ष्मी येथील हाजी अली पार्क, प्लॉट क्रमांक 9, सौदामिनी इमारतीच्या पुनर्विकासासाठी लेटर ऑफ इंटेंट (LOI) प्राप्त झाले आहे. या प्रकल्पाची किंमत 161.18 कोटी रु(GST आणि विमा वगळून) इतकी आहे आणि काम सुरू झाल्यापासून 36 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प वॅस्कॉनच्या पुनर्विकास क्षेत्रातील अनुभवात भर घालत असून मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रातील त्यांचे स्थान अधिक मजबूत करत आहे. या घोषणेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना वॅस्कॉन इंजिनीयर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सिद्धार्थ वासुदेवन मूर्ती म्हणाले, “एमएसईबी होल्डिंग कंपनी लिमिटेडने आमच्यावर या महत्त्वपूर्ण पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी सोपवल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. हा प्रकल्प आमच्या ऑर्डर बुकला अधिक बळकट करतो आणि मुंबईसारख्या बाजारपेठेत एवढ्या मोठ्या स्तरावरील प्रकल्प पूर्ण करण्याच्या आमच्या क्षमतेवर ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास दर्शवतो. आम्ही या प्रकल्पाचे काम ठरवलेल्या गुणवत्तेच्या मानकांनुसार आणि वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करू.”मुंबईत वॅस्कॉनने सांताक्रूझ येथील वॅस्कॉन ऑर्किड्स आणि सांताक्रूझ वेस्ट येथील प्रकाश सीएचएस अशा प्रकल्पांद्वारे आपल्या पुनर्विकास-केंद्रित धोरणाला बळकटी दिली आहे. सांताक्रूझ, पवई आणि इतर मायक्रो-मार्केट्समधील सुरु असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांनी एकत्रितपणे सुमारे 0.4 दशलक्ष चौ.फुट क्षेत्र व्यापलेले आहे. त्यांचे अपेक्षित विक्री मूल्य 1050 कोटी रु. इतके आहे.मुंबईतील सध्याचे आणि नियोजित प्रकल्प आर्थिक वर्ष 27 पर्यंत कंपनीच्या एकूण रिअल इस्टेट पोर्टफोलिओत सुमारे 50 टक्के योगदान देतील अशी अपेक्षा आहे. रिअल इस्टेट पुनर्विकासासोबतच, मुंबई आणि पश्चिम भारतातील EPC संधी देखील सक्रियपणे साधल्या जात आहेत. त्यामध्ये संस्थात्मक आणि पायाभूत प्रकल्पांसाठीच्या टेंडर्समुळे कंपनीच्या दीर्घकालीन ऑर्डर पाइपलाइनमध्ये भर पडत आहे.

सुमीत एसएसजीची अपोलो हॉस्पिटल ग्रुपच्या युअरलाईफ आणि मेडस्कील्ससोबत भागीदारीची घोषणा

राज्यात सक्षम वैद्यकीय यंत्रणा उभारण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ·एमईएमएस १०८ या प्रकल्पांतर्गत राज्यातील विविध भागांत सुमीत एसएसजीकडून हजारांहून अधिक रुग्णवाहिकांची सोय केली जाणार. · अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप कंपनीकडून २ हजार ३०० हून अधिक डॉक्टरांची नेमणूक होईल. वैद्यकीय आपत्कालीन प्रतिसाद प्रोटोकॉलअंतर्गत अपोलो मेडिस्कील्स ४ हजार ५०० हून अधिक वैद्यकीय कर्मचा-यांना आवश्यक प्रशिक्षणाचे धडे देईल. ·एमईएमएस१०८ हा जागतिक पातळीवरील आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा उभारण्यासाठी आखलेला सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. पुणे, १० ऑक्टोबर २०२५: राज्यातील आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे बळकटीकरण व्हावे तसेच पायाभूत वैद्यकीय सुविधांचे जाळे वाढवण्यासाठी सुमीत एसएसजीने अपोलो हॉस्पिटल्स समूह कंपनीच्या युअरलाइफ आणि अपोलो मेडिस्किल्ससोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एमईएमएस१०८) या प्रकल्पांतर्गत ही भागीदारी जाहीर करण्यात आली आहे. या भागीदारीमुळे राज्यभरातील आपत्कालीन वैद्यकीय सेवांची क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत वैद्यकीय कर्मचा-यांची योग्य प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारणे, यंत्रणेत गतीमानता यावी, कार्यक्षमता निर्माण व्हावी याकरिता तजवीज करणे हे या भागीदारीचे मुख्य उद्दिष्ट आहे. राज्यातील प्रत्येक शहरी तसेच ग्रामीण भागात राहणा-या रुग्णाला विनामूल्य वैद्यकीय सेवा मिळावी, वैद्यकीय सेवा पुरवण्यात कोणतीही कमतरता राहू नये याकरिता या भागीदारीतून विविध उपक्रम राबवले जातील. सुमीत एसएसजी राज्यभरातील विविध ठिकाणी हजारांहून जास्त रुग्णवाहिकांची उपलब्धता करुन देईल. या रुग्णवाहिकांमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी, चालक यांचा समावेश असेल. आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि प्रभावी उपचार देण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. शहरी तसेच ग्रामीण भागांतील आरोग्य सेवांमधील कमतरता दूर सारण्यासाठी मोठ्या संख्येने रुग्णवाहिकांचे नियोजन केले जात आहे. राज्यातील दुर्गम भागांतही रुग्णवाहिका नियुक्त केल्या जातील. रुग्णवाहिकांच्या उपलब्धतेमुळे गरजू रुग्णाला तातडीने योग्य प्रकारे सक्षम प्राथमिक पातळीवरील वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात, असा या उपक्रमामागील मानस आहे. अपोलो इकोसिस्टीमही सक्षम वैद्यकीय यंत्रणा उभारण्यासाठी विस्तृत पातळीवर योजना राबवणार आहे. अपोलो इकोसिस्टीम युअरलाईच्यावतीने तब्बल २ हजार ३००हून अधित पात्र डॉक्टरांची नियुक्ती करेल. अपोलो मेडिस्कीलच्यावतीने सुमीतएसएसजीच्या ४ हजार ५०० हून अधिक कर्मचा-यांना विशेष प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. हे सर्व कर्मचारी एमईएमएस १०८ प्रकल्पांतर्गत आपत्कालीन वैद्यकीय कर्मचा-यांच्या तातडीच्या नेमणुकीसाठी सज्ज असतील. या सर्व प्रक्रियेत अपोलो मेडिस्कील्सची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरेल. अपोलो मेडिस्कील्स आपत्कालीन सेवा देणा-या कर्मचा-यांना रुग्णकेंद्रित उपचार, अत्याधुनिक अपघात व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थितीत सर्वोत्तम उपाययोजना राबवण्यात प्रशिक्षण देईल. हा वैद्यकीय आपत्कालीन प्रतिसाद प्रोटोकॉल हा राष्ट्रीय आरोग्य अभियान, एनएबीएच, एनएमसी, एआयआयएमएस आणि आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार केलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रुग्ण सुरक्षा मानांकनांशी सुसंगत प्रोटोकॉल आहे. कर्मचा-यांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचे ज्ञान, प्रतिसाद व्यवस्थापन सक्रियता, मुलभूत आणि अत्याधुनिक जीवनसुरक्षा प्रणाली, आपत्कालीन परिस्थितीतून रुग्ण वाचल्यानंतर पुढील प्रक्रियेतील रुग्णसेवा आदींचे प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाईल. या प्रशिक्षण काळात कर्मचा-यांना लेखापरिक्षण, चर्चा तसेच संवाद कौशल्यही शिकवण्यावरही अपोलो मेडिस्कील्सचे अधिकारी सहभागी होतील. हा कार्यक्रम अपोलोची वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्ता, करुणा तसेच रुग्ण सुरक्षिततेचा मापदंड कायम राखण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक प्रतिसादकर्त्याला गंभीर तसेच संवेदनशील परिस्थितीतही अचूकतेने आणि सहानुभूतीने उत्तम दर्ज्याची रुग्णसेवा देण्याचे कौशल्य निर्माण होईल. कर्मचा-यांच्या शास्त्रोक्त प्रशिक्षणामुळे वैद्यकीय सेवेचे जाळे राज्यभरात सर्वदूर पोहोचेल. तिन्ही संस्थाची भागीदारी राज्यात सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. सुमीत यांचा भारतातील कार्यान्वयन कौशल्य, एसएसजी स्पेनचे युरोपातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा क्षेत्राचे ज्ञान आणि कौशल्य तसेच अपोलोची वैज्ञानिक उत्कृष्टता, जागतिक स्तरावरील वैद्यकीय पद्धतीचा अवलंब यां सर्व घटकांचा सुरेख मिलाफ उदयास येईल.  राज्यातील आरोग्यसेवा यंत्रणेची रुपरेषा बदलण्यासाठी ही भागीदारी महत्त्वपूर्ण योगदान देईल. या एकत्रित प्रयत्नांमुळे राज्यातील आपत्कालीन प्रतिसादाच्या मानांकनांमध्ये नवा आदर्श निर्माण होईल, असा विश्वास भागदारकांनी व्यक्त केला. राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुलभ, विश्वसनीय आणि गुणवत्तापूर्वक आरोग्यसेवा देण्याच्या सामायिक ध्येयापोटी ही भागीदारी करण्यात आली आहे. या सहकार्यातून आरोग्यसेवेचा वेळोपरत्वे बळकटीकरण होत जाईल, असेही भागदारकांडून सांगण्यात आले.  ‘‘सुमीत एसएसजीच्या कार्यक्षमतेमुळे आणि अपोलोच्या विश्वसनीय आरोग्यसेवा प्रणालीमुळे राज्यात आता आपत्कालीन सेवेचे नवे मापदंड निर्माण होईल. राज्यातील नवी आरोग्यसेवा यंत्रणा देशभरातील आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी नवा आदर्श ठरेल. या आरोग्य यंत्रणेचे इतर राज्यांमध्येही अनुकरण केले जाईल.’’, असा विश्वास सुमीत एसएसजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधांशु करंदीकर यांनी व्यक्त केला. अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या युअरलाईफचे मुख्य कार्यकारी अधिकारी टी. करुणाकर क्झोक्झो असे म्हणाले, “अपोलो हॉस्पिटलची ही भागीदारी भारतातील आरोग्य सेवा यंत्रणा सक्षम करण्याच्या आमच्या अढळ बांधिलकीची पुष्टी करते. संपूर्ण देशभरात आपत्कालीन वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध करुन दिल्यामुळे, आम्ही केवळ त्वरित प्रतिसाह क्षमता वाढवत नाही तर प्रत्येक नागरिकाला तत्काळ गरजेच्यावेळी विश्वासार्ह आणि उच्च दर्ज्याच्या वैद्यकीय मदतेची खात्री देत आहोत. रुग्णांचा जीव वाचवणारी आणि आपत्कालीन सेवेत नवीन मापदंड स्थापित करणारी एक मजबूत आणि सर्वसमावेशक पायाभूत आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे हेच आमचे ध्येय आहे.” अपोलो मेडिस्कील्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीनिवास राव पुलिजाला म्हणाले, ‘‘ही भागीदारी रुग्णांना त्वरित वैद्यकीय उपचार, उत्कृष्ट क्लिनिकल सेवा, समाज केंद्रित आरोग्य सेवा देत लाखोंना नवे जीवनदान करण्याच्या आमच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आहे.’’

टायटनने आणले भारतातील पहिले वॉन्डरिंग अवर्स घड्याळ

होरोलॉजीच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा स्टेलार ३.० मध्ये प्रस्तुत केली तीन लिमिटेड-एडिशन घड्याळे - सेलेस्टीयल इन्स्पिरेशन, ऍडव्हान्स्ड होरोलॉजी आणि रेअर मटेरियल्स राष्ट्रीय, ९ ऑक्टोबर, २०२५:  टायटनने स्टेलार ३.० प्रस्तुत करून भारतातील घड्याळ बनवण्याच्या कलेमध्ये एक नवा अध्याय रचला आहे. टायटनने स्वतःच्या इन्फिनाईट या प्रमुख फेस्टिव कलेक्शनपासून प्रेरणा घेऊन स्टेलार ३.० तयार केले आहे. यातील ९ अतिशय अनोख्या घड्याळांपैकी ३ लिमिटेड एडिशन्स आहेत, ही तीनही घड्याळांचे वैशिष्ट्य म्हणजे वॉन्डरिंग अवर्स हा प्रकार भारतात पहिल्यांदा सादर केला जात आहे. या निमित्ताने टायटनने मुंबईतील बॅस्टियन ऍट द टॉप येथे एक विशेष लॉन्च शोकेसचे आयोजन केले होते. स्टेलर ३.० ची कल्पना एका कॅनव्हास म्हणून करण्यात आली, असा कॅनव्हास ज्यावर अनेक खगोलीय चमत्कार आणि होरोलॉजिकल कल्पकता यांचा मिलाप होतो. द वॉन्डरिंग अवर्समध्ये हे व्हिजन प्रत्यक्षात साकार करण्यात आले आहे. चंद्र आणि प्रवास करणाऱ्या ताऱ्यांपासून, त्यांच्या खगोलीय मार्गांनी  प्रेरित होऊन हे कलेक्शन बनवण्यात आले आहे. स्फटिकीकृत टायटॅनियम, तांब्याच्या बेझल, ट्विन सॅटेलाइट डिस्क, मिनिट ट्रॅकवर प्रमाणबद्ध फिरणे ही सर्व या घड्याळांची वैशिष्ट्ये आहेत. टायटनच्या इन-हाऊस मुव्हमेंट्स यामध्ये वापरण्यात आल्या आहेत, या लिमिटेड-एडिशनमध्ये फक्त ५०० घड्याळे बनवण्यात आली आहेत. किंमत ₹१,७९,९९५ आइस मेटियोराइट, स्टेलर १ आणि २ ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर तेच यश पुन्हा संपादन करण्यासाठी शानदार पुनरागमन करत आहे. आता यामध्ये एक कॉस्मिक आइस-ब्लू डायल है, जी खऱ्याखुऱ्या १,२०,००० वर्षे जुन्या म्यूओनियोनालुस्टा उल्केवर प्लेट करण्यात आली आहे. गहन अंतरिक्षाचा इतिहास आणि आधुनिक डिझाईन यांची ही सांगड अप्रतिम आहे. याची किंमत  ₹१,३९,९९५ आहे. ऑरोरा कैलमची किंमत ₹९५,९९५ आहे, चमकणारी हिरवी डायल नॉर्दन लाईट्सची आठवण करून देते आणि आपल्या सामंजस्यपूर्ण गतीने सूक्ष्म डिस्कला फ्रेम करते. वॉचेस अँड वेयरेबल्सचे सीईओ, कुरुविल्ला मार्कोस यांनी सांगितले: “टायटनने ४१ वर्षांपासून, सर्जनशीलता आणि कारीगरीच्या माध्यमातून भारतातील घड्याळ निर्मितीची व्याख्या रचली आहे. स्टेलार १.० ने डिझाईन विश्वात नव्या विषयांचा उदय घडवून आणला. स्टेलार २.० मध्ये अचूकता आणि बारकावे वाढवण्यात आले, आणि आता स्टेलार ३.० ने एका अज्ञात क्षेत्रात साहसी भरारी घेतली आहे. टायटनच्या इन-हाउस मूवमेंटचा वापर करून तयार करण्यात आलेले वॉन्डरिंग अवर्स एका निर्णायक क्षणाचे प्रतीक आहे, जे हे सिद्ध करते की आपण भारतीय घड्याळ निर्मितीला जागतिक पातळीवर मजबूत स्थान मिळवून देण्यासाठी सज्ज आहोत, जिथे नावीन्य, कलात्मकता आणि तंत्रज्ञान नैपुण्ये एक असाधारण अनुभव निर्माण करण्यासाठी एकत्र येतात. हा प्रारंभ आहे एका दूरवरच्या प्रवासाचा आणि आम्ही भारतीय घड्याळ निर्मितीला अधिकाधिक उंचीवर नेण्यासाठी वचनबद्ध आहोत." स्टेलार ३.० कलेक्शनचे तीन रचनात्मक आधारस्तंभ आहेत: आकाशात घडणाऱ्या घटना, ज्यांच्यामध्ये ब्रह्मांडीय चक्रांची लय पकडलेली असते; उच्च दर्जाची घड्याळ निर्मिती, ज्यामध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि कथाकथन यांचे सघन मिश्रण आहे आणि दुर्मिळ सामग्री, जी ब्रह्मांडातील तत्त्वांना वेयरेबल कलेमध्ये साकार करते. नऊ घड्याळांमध्ये, हे विचार कलेक्टर्स आणि महत्त्वाकांक्षी व्यक्तींना अनंताची एक झलक दाखवण्यासाठी एकत्र आणले गेले आहेत. निवडक टाइटन स्टोर्स आणि www.titan.co.in वर स्टेलार ३.० कलेक्शन खरेदी करता येईल. महत्त्वाकांक्षी आणि घड्याळप्रेमींना ब्रह्मांडाची सैर करता येईल, हे कलेक्शन तुम्हाला जाणीव करून देईल की अनंत, आश्चर्यकारक ब्रह्मांड तुमच्या मनगटावर सामावले जाणे शक्य आहे.

बीव्हीजी इंडियातर्फे 300 कोटी रु. फ्रेश इश्यू आणि 2.85 कोटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलसाठी डीआरएचपी सादर

पुणे-देशातील सर्वात मोठी इंटिग्रेटेड फॅसिलिटी मॅनेजमेंट (IFM) सेवा पुरवठादार आणि पुण्यात मुख्यालय असलेल्या बीव्हीजी इंडिया लिमिटेड कंपनीने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे आपला ड्राफ्ट...

कॅनरा एचएसबीसी लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री शुक्रवार 10 ऑक्टोबर 2025 पासून

प्रति इक्विटी शेअरसाठी 100 रु. ते 106 रु. किंमतपट्टा निश्चित ·         फ्लोअर प्राईस इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्याच्या 10.00 पट आणि कॅप प्राईस इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्याच्या 10.60  पट ·         बोली/ऑफर शुक्रवार 10 ऑक्टोबर 2025रोजी खुली होईल आणि मंगळवार, 14 ऑक्टोबर 2025 रोजी बंद होईल (“Bid Dates”). Ø  यूपीआय मॅनडेटची शेवटची वेळ आणि दिनांक बोली/ऑफर बंद होण्याच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता ·         प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक गुरूवार, 09 ऑक्टोबर 2025आहे. Ø  प्रमुख गुंतवणूकदाराची बोली/ऑफर वेळ बोली/ऑफर सुरु होण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी ·         बोली किमान 140इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 140 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल (“No. of Bids”) ·         रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस लिंक: https://www.canarahsbclife.com/investor-relations/rhp राष्ट्रीय, 07 ऑक्टोबर 2025: कॅनरा एचएसबीसी लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची (“कंपनी”) प्रती शेअर 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअरसाठीची प्राथमिक समभाग विक्री (“इक्विटी शेअर्स”) शुक्रवार 10 ऑक्टोबर 2025रोजी खुली करण्याचा प्रस्ताव आहे. कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्री ऑफरमध्ये प्रवर्तक विक्री समभागधारकांकडून 237,500,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल आहे. प्रति इक्विटी शेअरसाठी 100 रु. ते 106 रु. किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 140इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 140 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल ऑफर फॉर सेल मध्ये 137,750,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स कॅनरा बँकेकडून, एचएसबीसी इन्श्युरन्स (एशिया- पॅसिफिक) होल्डिंग्ज लिमिटेड कडून 4,750,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि पंजाब नॅशनल बँकेकडून 95,000,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आहेत.  प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक गुरूवार, 09 ऑक्टोबर 2025आहे. बोली/ऑफर शुक्रवार 10 ऑक्टोबर 2025रोजी खुली होईल आणि मंगळवार, 14 ऑक्टोबर 2025 रोजी बंद होईल. हे इक्विटी शेअर्स कंपनीच्या दिनांक 04 ऑक्टोबर 2025 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“RHP”) द्वारे सादर करण्यात येत असून नवी दिल्ली येथील रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (the "ROC”), दिल्ली आणि हरयाणा यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत. रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस द्वारे कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, बीएनपी परिबास, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, जेएम फायनान्शीयल लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायर्स लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत. ही ऑफर 1957 च्या SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित  नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR च्या 32(1) नियमांनुसार, ऑफरच्या 50% पेक्षा जास्त नसलेला भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB Portion मध्ये समाविष्ट केले जातील. प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBsसाठी प्रमाणात वाटप केले जाईल. ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. बिगर संस्थात्मक भागापैकी एक तृतीयांश भाग बिगर संस्थात्मक बोली लावणारे (“NIBs”) (“बिगर संस्थात्मक भाग”) यांच्यासाठी उपलब्ध असेल. त्यापैकी (अ) एक तृतीयांश भाग 200,000  रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ब) दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु. रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग दुसऱ्या इतर उप-श्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. SEBI ICDR नियमनानुसार ऑफरपैकी किमान 35% वाटप रिटेल इंडिव्हिज्युअल बिडर्ससाठी उपलब्ध असेल. ऑफर प्राईसच्या बरोबर किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीवर वैध बोली प्राप्त झाल्या असतील तर हे लागू होईल. येथून पुढे, पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कर्मचारी आरक्षण भागांतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना त्यांची वैध बोली ऑफर किंमती एवढी किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास (कर्मचारी सवलतही किंमतीत मिळू शकते) इक्विटी शेअर्सचे प्रमाणात वाटप केले जाईल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. तपशीलासाठी रेड हेअरिंग प्रोस्पेक्टसचा पृष्ठ क्रमांक 552 वरील “ऑफर प्रोस्युजर” बघावी.

Popular