Industrialist

मालाबार ग्रुपचे अध्यक्ष एम. पी. अहमद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६’ पुरस्काराने सन्मानित

मुंबई: मालाबार ग्रुपचे अध्यक्ष एम. पी. अहमद यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६' पुरस्कार सोहळ्यात 'बिझनेस भूषण' या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...

भारतीय घरातील स्मार्ट आणि ‘ऑल-इन-वन’ स्वयंपाकाच्या एका नव्या युगाची सुरुवात

पुणे- फिलिप्स होम अप्लायन्सेसने फिलिप्स वनशेफ सादर करण्याची घोषणा आज केली. स्वयंपाकासाठी हे एक नावीन्यपूर्ण, सर्वसमावेशक स्मार्ट उपकरण असून, रोजचा स्वयंपाक सोपा करण्यासोबतच भारतीय घरांसाठी पाककलेचे नवनवीन...

देशभरात व्यावसायिक गॅस थांबवला; घरगुती गॅसला प्राधान्य, काळजी करू नका – मुरलीधर मोहोळ

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात माध्यमांसमोर गॅस सिलेंडर वितरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मोहोळ म्हणाले, देशभरात व्यावसायिक क्षेत्राचा...

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड (KOEL) ने संचालक मंडळाच्या अध्यक्षपदासाठी उत्तराधिकाराची घोषणा केली

पुणे-१० मार्च २६ : किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड (KOEL) ने आज जाहीर केले की कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष  अतुल किर्लोस्कर हे 70 वर्षांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा पूर्ण केल्यामुळे 31 मार्च 2026 रोजी (कार्यालयीन वेळ संपल्यानंतर) आपल्या पदावरून निवृत्त होतील. श्री. किर्लोस्कर हे गेल्या ४३ हून अधिक वर्षांपासून KOEL सोबत कार्यकारी आणि गैरकार्यकारी अशा विविध भूमिकांमध्ये कार्यरत होते. त्यांनी १९८३ मध्ये कंपनीत प्रवेश केला. नोव्हेंबर १९८४ मध्ये त्यांची तत्कालीन KOEL (आता किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड KIL म्हणून ओळखली जाते) मध्ये एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट १९८५ मध्ये त्यांची संचालक मंडळावर सहनियुक्ती (coopted) करण्यात आली आणि त्यांनी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून जबाबदारी स्वीकारली. १९८८ मध्ये त्यांची तत्कालीन KOEL चे उपाध्यक्ष (Vice Chairman) म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी हे पद जुलै १९९८ पर्यंत भूषवले. त्यानंतर त्यांची तत्कालीन KOEL च्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून निवड झाली. वर्षानुवर्षे श्री. किर्लोस्कर यांनी कार्यकारी तसेच गैर-कार्यकारी भूमिकांमध्ये संचालक मंडळाच्या विविध समित्यांवर सेवा दिली आहे. जानेवारी २००९ मध्ये प्रस्तावित डिमर्जरनंतर श्री. किर्लोस्कर यांची KOEL च्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली. हा डिमर्जर मार्च २०१० मध्ये पूर्ण झाला. त्यानंतर त्यांनी ३१ मार्च २०१० ते २५ जानेवारी २०१२ या कालावधीत कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्य केले. जानेवारी २०१२ ते मार्च २०२३ या कालावधीत श्री. किर्लोस्कर यांनी कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चेअरमन म्हणून काम पाहिले आणि त्यानंतर त्यांनी कंपनीचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चेअरमन म्हणून आपली भूमिका पुढे चालू ठेवली. संचालक मंडळाने कंपनीसाठी श्री. किर्लोस्कर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक कौतुक आणि आभार व्यक्त केले. कंपनीच्या उत्तराधिकार नियोजन (Succession Planning) प्रक्रियेचा एक भाग म्हणून पुढील बदल नियोजित करण्यात आले आहेत. संचालक मंडळाने कंपनीचे विद्यमान नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री. राहुल किर्लोस्कर यांची चेअरपर्सन म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच, संचालक मंडळाने कंपनीच्या विद्यमान मॅनेजिंग डायरेक्टर सुश्री गौरी किर्लोस्कर यांची त्यांच्या सध्याच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदाच्या जबाबदारीसह व्हाइस चेअरपर्सन म्हणूनही नियुक्ती केली आहे. श्री. अतुल किर्लोस्कर म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून KOEL च्या प्रवासाचा भाग होणे माझ्यासाठी खरोखरच सन्मानाची बाब राहिली आहे. मागील काही वर्षांपासून आम्ही या संक्रमणावर नियोजित उत्तराधिकार म्हणून काम करत होतो. माझ्या मते, वेळेवर आणि सुयोग्य नियोजनासह केलेला उत्तराधिकार हा कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. तसेच, नवीन नेतृत्वाला त्यांच्या दृष्टीकोन आणि योजनांनुसार कंपनीला पुढे नेण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळणेही तितकेच आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, मी कंपनीच्या संचालक मंडळावरील आणि इतर सर्व पदांवरून पूर्णपणे पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल आणि गौरी यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. मला विश्वास आहे की KOEL ला नव्या उंचीवर नेण्यासाठी आमच्याकडे योग्य टीम आहे.” श्री. राहुल किर्लोस्कर म्हणाले, ”गेल्या अनेक वर्षांत कंपनीसाठी दिलेल्या सेवेबद्दल आणि योगदानाबद्दल मी अतुल यांचे आभार मानतो. या भूमिकेत पाऊल ठेवताना, अतुल यांच्या नेतृत्वाखाली कंपनीत झालेले उत्कृष्ट कार्य पुढे नेण्याचा माझा उद्देश आहे. कंपनीला तिच्या उद्दिष्टांच्या दिशेने पुढे नेण्यासाठी गौरी आणि व्यवस्थापन टीमसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.”

भारत-इंग्लंड उपांत्य फेरीदरम्यान आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026चा जिओहॉटस्टारवर नवा जागतिक स्ट्रीमिंग विक्रम

जिओहॉटस्टारवर भारत विरुद्ध इंग्लंडच्या उपांत्य फेरीच्या सामन्याला एकाच वेळी 65.2 दशलक्ष प्रेक्षकांची पसंती दुसरा उपांत्य फेरी सामना हा जागतिक स्तरावर सर्वाधिक स्ट्रीम केला गेलेला लाइव्ह कार्यक्रम आहेडिजिटल प्लॅटफॉर्मवर 619 दशलक्ष व्ह्यूजची नोंद - टी20 साठी आतापर्यंतचे सर्वाधिक व्ह्यूज दुबई / मुंबई, 7 मार्च 2026: क्रीडा, प्रसारमाध्यमे आणि स्ट्रीमिंगच्या जगात आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026 जागतिक स्तरावर नवनवीन बेंचमार्क स्थापित करत आहे. 5 मार्च रोजी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य सामन्यातील डिजिटल प्रेक्षकांच्या संख्येने एक ऐतिहासिक जागतिक टप्पा गाठला आहे. भारतातील आघाडीचा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म जिओहॉटस्टारने या महत्त्वाचा सामन्यादरम्यान अभूतपूर्व 65.2 दशलक्ष प्रेक्षकांची नोंद केली. जगातील कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवरील लाइव्ह इव्हेंटसाठी आतापर्यंत मिळालेली ही सर्वोच्च प्रेक्षक संख्या आहे. या सामन्याला जिओहॉटस्टारवर 619 दशलक्ष व्ह्यूज मिळाले, ज्यामुळे तो आतापर्यंतचा सर्वाधिक स्ट्रीम केलेला टी20 आंतरराष्ट्रीय सामना ठरला आहे. या सामन्यात दोन्ही डावांमध्ये मिळून 499 धावा झाल्या. या रोमांचक सामन्याने भारत आणि परदेशातील चाहत्यांची मने जिंकली. मुंबईतील या महत्त्वाच्या सामन्याने नोव्हेंबर 2024 मधील एका आंतरराष्ट्रीय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने स्थापित केलेल्या 65 दशलक्षांच्या आधीच्या जागतिक विक्रमाला मागे टाकले. वास्तविक,  वेगवेगळ्या मार्केटमधील एकत्रित प्रेक्षकसंख्येद्वारे हा आकडा साध्य झाला आहे. तर, दुसरीकडे जिओहॉटस्टारने केलेला हा विक्रम पूर्णपणे एकाच कार्यक्रमाचा होता. यामुळे थेट स्ट्रीमिंगमधील त्यांचे स्थान ठळकपणे स्पष्ट झाले आहे. तसेच लाइव्ह कार्यक्रमाचा आनंद देताना मोठ्या प्रमाणावरील मागणी हाताळण्याची त्याची क्षमता देखील सिद्ध करतो. हा विक्रम भारतीय संघाची लोकप्रियता, उपांत्य फेरी जिंकलीच पाहिजे, ही भावना आणि मोठ्या प्रमाणात चाहत्यांचे प्रेम या सगळ्यांच्या एकत्रीकरणामुळे आयसीसीच्या या स्पर्धेची लोकप्रियता सिद्ध होते. लिनियर टेलिव्हिजन आणि डिजिटल अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर, उपांत्य फेरी पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 320 दशलक्षांपेक्षा जास्त होती. तर स्क्रीन पाहण्याचा वेळ हा आश्चर्यकारकरित्या 23 अब्ज मिनिटांपेक्षा जास्त होता. यामुळेच तो आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला गेलेला टी20 आंतरराष्ट्रीय सामना ठरला. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह म्हणाले: "आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतातील कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना एकत्र आलेले पाहणे खूप आनंददायी आहे. भारत विरुद्ध इंग्लंडच्या उपांत्य सामन्यादरम्यान नोंदवल्या गेलेल्या उल्लेखनीय संख्येवरून केवळ क्रिकेट चाहत्यांचा उत्साहच दिसून येत नाही, तर हा खेळ सर्वांसाठीच सहज उपलब्ध आणि आकर्षक बनवण्यात झालेली प्रगती देखील दिसून येते. हा विश्वचषक जेवढा मैदानावरील खेळासाठी लक्षात राहील तितकाच तो खेळाची भावना साजरी करण्यासाठी एकत्र आलेल्या लाखो चाहत्यांमुळेही लक्षात राहील."  जिओस्टारचे उपाध्यक्ष उदय शंकर म्हणाले: “हे जसे जिओस्टारच्या तांत्रिक आणि सर्जनशील उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. तसेच ते क्रिकेटला आणखी मोठे बनवण्याच्या आयसीसीच्या वचनबद्धतेचेही प्रतीक आहे. दर तीनपैकी एका भारतीयाने गुरुवारी झालेला दुसरा उपांत्य सामना पाहिला. आणि जेव्हा लाखो लोक अशा पद्धतीने सामना पाहतात तेव्हा तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर करावा लागतो. मनोरंजनाचे भविष्य असेच असेल.” दोन्ही संघांच्या आकर्षक खेळाच्या पार्श्वभूमीवर, सामन्यादरम्यान नोंदवल्या गेलेल्या 619 दशलक्ष व्ह्यूजने 2024च्या आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक अंतिम सामन्यादरम्यान नोंदवल्या गेलेल्या 533 दशलक्ष व्ह्यूजच्या विक्रमाला मागे टाकले आहे. अंतिम सामना अजून खेळला जाणे बाकी असताना, आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026ने डिजिटल आणि ब्रॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर आधीच अनेक बेंचमार्क स्थापित केले आहेत. आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026चा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 8 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळवला जाणार आहे. या संपूर्ण सामन्याचा आनंद प्रेक्षक जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे थेट घेऊ शकतात.

Popular