Filmy Mania

१४ जूनला ‘अल्याड पल्याड’ चा थरार

आपण जो विचार करतो त्यापलीकडे जाऊन आपल्या आजुबाजूला अनेक घटना घडत असतात. भीतीदायक वाटणाऱ्या घटनांमागचं नेमकं रहस्य काय असणार? याची उकल करताना थरार, उत्कंठा,...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात हजेरी लावणार ऐका दाजीबा फेम ईशिता अरुण.

लोकप्रिय हास्यमालिकेचा मान पटकावणारी सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'! या वर्षीही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होते आहे. या कार्यक्रमातून नेहमी नवनवीन गोष्टी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. नवे पर्व, नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होते आहेच. आता कार्यक्रमात येणार आहे ऐका दाजीबा फेम ईशिता अरुण. ईशिताने चक्क महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात प्रहसन साकारण्याचे धाडस केले आहे. समीर चौघुले आणि पृथ्वीक प्रताप या दोघांबरोबर ईशिता आपले प्रहसन सादर करणार आहे. आजवर तिच्या नृत्यामुळे ईशिताचा सगळीकडे नावलौकिक असल्यामुळे ती फार चर्चेत असते. पण आपली ही आवडती अभिनेत्री आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात प्रहसन करताना पाहायला मिळेल. प्रेक्षक नक्कीच पोट भरून हसण्यासाठी तयार असतील.               ऐका दाजीबा गाण्यामुळे ईशिता अरुण ही दाजीबा गर्ल म्हणून सर्वत्र सुप्रसिद्ध झाली आहे. २२ वर्षांपूर्वी हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते आणि अजूनही हे गाणे आणि त्याचे संगीत आपल्याला ठेका धरण्यास भाग पाडते. पण या वीकएंडला ईशिता अरुण हिच्याबरोबर धमाल हास्यमैफील रंगणार आहे. समीर चौघुले आणि पृथ्वीक प्रताप यांच्याबरोबर ईशिता हे सादरीकरण  साकारणार आहे. अतिशय धमाल असे हे प्रहसन या वीकएंडला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ईशिता अरुण यांचा मराठीतला कॉमेडी  अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मराठीतल्या ठसकेदार कॉमेडीचा ईशिताचा अंदाज काही वेगळाच आहे. तेव्हा ही धमाल मस्ती आणि विशेष असा हा भाग येत्या शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर दिसणार आहे .

सत्यघटनेवर आधारित ‘फुली’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई २८ मे २०२४ : फिल्मसृष्टी मध्ये सत्य घटनांवर आधारित चित्रपट सतत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशीच एका लहान मुलीची मोठी स्वप्न असलेली, अभिनेता...

अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर क्राईम आणि कॉमेडी चित्रपटांचा धमाका!

आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी अल्ट्रा झकास मे महिन्यात दोन जबरदस्त चित्रपट घेऊन येत आहे. क्राईम आणि रहस्याने भरलेला साऊथचा डब चित्रपट ‘अभ्युहम’ म्हणजेच ‘संभ्रम’ २४...

दिग्दर्शक रॉबी ग्रेवाल आणि सैफ अली खानसोबत सिद्धार्थ आनंदचा पुढचा चित्रपट ‘ज्वेल थीफ- द रेड सन चॅप्टर’ 

 चित्रपट निर्माता सिद्धार्थ आनंद यांच्या सोशल मीडिया पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिग्दर्शक-निर्मात्याने सैफ अली खानसोबतचा एक फोटो शेअर केला होता आणि...

Popular