संपूर्ण भारतात छोटा पडदा म्हणजेच टीव्ही पाहणारा प्रेक्षक वर्ग खूप मोठा आहे , त्यात डेलीसोप बरोबर रिऍलिटी शोज सुद्धातितक्याच चवीने पाहिले जातात. झी युवावरील सर्वच शो प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या वाहिनीवरील संगीत व नृत्यावरआधारित 'अप्सरा आली' या कार्यक्रमाने तर संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले आहे. महाराष्ट्राची लोककला लावणी आणि इतरनृत्य प्रकारांवर आधारित १४ अप्सरांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम आता त्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे . येत्यारविवारी १० मार्च ला संध्याकाळी ७ वाजता कार्यक्रमातील टॉप ५ अप्सरा महा अंतिम फेरीत एकमेकींशी स्पर्धा करणार आहेत. सुरेखाताई पुणेकर, दीपाली सय्यद, सोनाली कुलकर्णी या महा अप्सरांबरोबरच महागुरू सचिन पिळगावकर सुद्धा महा अंतिमफेरीच परीक्षण करतील .
तीन महिन्यांच्या प्रवासानंतर १४ अप्सरामधून केवळ टॉप पाच अप्सरा या कार्यक्रमात टिकल्या आणि त्यांनी त्यांच्या नृत्यानेअक्ख महाराष्ट्र गाजवलं . मालवणची लाडूबाई ऋतुजा राणे , साताऱ्याची गुलछडी माधुरी पवार , डोंबिवली फास्ट किन्नरीदामा व पुण्याची ऑलराउंडर ऐश्वर्या काळे आणि पुण्याची मैना श्वेता परदेशी , या ५ जणी त्यांचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देत महाअंतिम फेरीपर्यंत धडक मारली . पारंपरिक लावणीचा साज, आणि अस्सल मातीची लावणी करत अनेक परफॉर्मन्स मधून बंदारुपया परफॉर्मन्सचा मान मिळवत साताऱ्याची गुलछडी माधुरी पवारने अख्या महाराष्ट्राला लावणीच्या ठेक्यावर नाचवले. लावणीचा अस्सल ठसा जपून वेगवेगळ्या फॉर्म मधून लावणी मंचावर सादर करताना ऑल राउंडर ही पदवी मिळवणारी ऐश्वर्याकाळेने या मंचाला एका वेगळ्या उंचीवर नेले. वयाने लहान असल्याने सगळ्यांचे लाड करून घेणारी मालवणची लाडूबाई तिच्यापरफॉर्मन्स मधून सगळ्यांनाच खुश केले. गश्मीर महाजनी, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, ललित प्रभाकर, स्वप्नील जोशी यासगळ्याच कलाकारांना आपल्यासोबत परफॉर्म करण्यासाठी जिने भुरळ घातली अशी ग्लॅमरस किन्नरी दामाने आपल्यापरफॉर्मन्सने सगळ्यांचे मन जिंकले. वडिलांचा नृत्याचा वसा चालवून प्रत्येक परफॉर्मन्स एकदम परफेक्ट करणारी श्वेतापरदेशी. या पाचही जणींची लावणीची जुगलबंदी महा-अंतिम फेरीची चुरस वाढवेल. या पाचही जणींपैकी कोण बनेलमहाराष्ट्राची पहिली अप्सरा? या अप्सरांमध्ये मुख्य गोष्ट अशी कि एकमेकींसमोर स्पर्धक म्हणून उभ्या ठाकलेल्याअसतानाही, सगळ्यांच्यात असलेला जिव्हाळा मात्र एखाद्या कुटुंबाप्रमाणे आहे. प्रेम, आपुलकी व खिलाडूवृत्तीने या पाचहीअप्सरा अंतिम सोहळ्यात त्यांचा उत्कृष्ट परफॉर्मन्स देतील . महाअंतिम सोहळयाचे मुख्य आकर्षण टॉप ५ अप्सरांचीजुगलबंदी असेलंच पण त्याच बरोबर महाअप्सरा सुद्धा स्पेशल नृत्य परफॉर्म करणार आहेत .
अंतिम सोहळ्यात टॉप ५ अप्सरांची ही अंतिम टक्कर पाहायला विसरू नका, रविवार १० मार्च, रोजी संध्याकाळी ७ वाजता, झीयुवावर!!! झी युवा वाहिनीवरील सर्व कार्यक्रम बघत राहण्यासाठी ३९ रुपयांचा ' झी फैमिली पॅक' नक्की निवडा...या मध्येतुमचे मनोरंजन करण्याऱ्या २० झी वाहिन्या आपल्याला पाहायला मिळतील.
टेलिव्हिजन आणि रूपेरी पडद्यानंतर सध्या वेब सीरीजचे जग सर्वाधिक लोकप्रिय झालेले आहे. त्यामूळेच तर वेबसीरिजमधल्या कलाकारांची फॅन फॉलोविंगही खूप जास्त वाढत आहे.
स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या...
राजकन्या म्हटंलं की डोळ्यासमोर उभी राहते ती परीकथा आणि परिकथेतील 'ती' राजकन्या. मात्र सोनी मराठीवर नुकताच लाँच झालेल्या प्रोमोमधून तुमच्या-आमच्या सारखीच साधी, मध्यमवर्गीयमुलगी राजकुमारी म्हणून डोळ्यासमोर येते. तिचं विश्व कसं असेल याच वर्णन करताना तिच्या बाबांनी म्हटलेली कविता, त्यांच्या साठी ती राजकन्याच आहे, हे स्पष्ट दिसून येतं. असं असलं तरी बाबांच्या याराजकन्येच्या वाटेत कितीतरी अडथळे आहेत. डोळ्यात डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या या राजकन्येच्या हाती सफेद डॉक्टरी कोटाऐवजी पोलिसांची खाकी वर्दी आली आहे. खाकीवर्दीतल्या या राजकन्येचं आयुष्य 11 मार्चपासून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. याची पत्रकार परिषद नुकतीच मुंबईत पार पडली. यावेळी बाबांची राजकन्या अवनी म्हणजेच किरण ढाणे, बाबांच्याभूमिकेत दिसणारे किशोर कदम ही प्रमुख पात्रं, सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, मालिकेचे निर्माते - कोठारे व्हिजन चे महेश कोठारे, आदिनाथ कोठारे आणि या मालिकेच्याटायटल ट्रॅक ची उत्तम सांगड घालणारे अशोक पत्की त्याबरोबरच याचं शीर्षकगीत लिहिणाऱ्या अश्विनी शेंडे उपस्थित होते. या सगळ्यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली.
21 व्या शतकातल्या त्या प्रत्येक स्त्री चं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या अवनीने बाबांचं छत्र डोक्यावरून निसटल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. आई आणि भावाची काळजी घेताना ती कुठेहीअपुरी पडत नाही. बाबांच्या या राजकन्येचा खडतर प्रवास कधी संपणार आणि तिच्या बाबांनी कवितेत म्हटल्याप्रमाणे तिला लाखो सलाम कधी आणि कसे छळणार हे हळूहळू मालिकेतून उलगडत जाणारआहे. या मालिकेचं कथानक आणि विषयाबरोबरच शीर्षकगीत हे या मालिकेचं अजून एक वैशिष्ट्य आहे. हे शीर्षकगीत अश्विनी शेंडे यांनी लिहिलं असून त्याला देवकी पंडित आणि अजय पुरकर यांनीआवाज दिला आहे तर एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मालिकाविश्व समृध्द करणाऱ्या अशोक पत्की यांचं संगीत याला लाभलं आहे. या मालिकेच्या शीर्षकगीताच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी जमलेली देवकीपंडित आणि अशोक पत्की यांच्या संगीताची मैफल प्रेक्षकांना सुखावणारी ठरणार आहे.‘एक होती राजकन्या’ असा बाबांच्या कवितेतून होणारा या राजकन्येचा उल्लेख आणि राजकुमाराच्या भेटीने होणारा शेवट,11 मार्चपासून सोमवार ते शनिवारसंध्याकाळी 7.30 वाजता सोनी मराठीवर.
छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणजे अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री सुरुची अडारकर. यापूर्वी 'का रे दुरावा' या मालिकेत ही जोडी बराच काळ एकत्र...
‘लाखात एक आपला फौजी’ असं म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने गेल्या दीड वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं...