Filmy Mania

‘युवा’ कलाकारांनी सेटवर साजरी केली दिवाळी!!!

दिवाळी म्हणजे, प्रकाशाचा, दिव्यांचा आणि आनंदाचा सण आहे. सगळेच जण अत्यंत उत्साहाने हा सण साजरा करतात. दिवाळीचा आनंद साजरा करण्यसाठी यावेळी 'झी युवा' वाहिनीचे कलाकार सुद्धा एकत्र आले आहेत. सण साजरा करण्यात कुठलीही कसर या सर्वांनी सोडलेली नाही. सर्व कलाकारांनी मिळून दणक्यात हा दिवाळीचा सण साजरा केला आहे. नेहमीच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून सर्वांनी दिवाळीचा आनंद लुटला. नेहमी चित्रीकरणात व्यस्त असलेल्या कलाकारांना प्रत्येक सण कुटुंबासोबत साजरा करणे शक्य होत नाही. पण यंदा, 'झी युवा' वाहिनीने या कलाकारांना दिवाळी साजरी करण्याची संधी दिली आहे. वाहिनीच्या संपूर्ण 'कुटुंबाने' सेटवर एकत्र येऊन दिवाळी साजरी केली. 'तू अशी जवळी रहा', 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण', 'साजणा', 'प्रेम, पॉयजन, पंगा' या सगळ्याच मालिकेतील कलाकारांनी एकत्र येऊन फराळाचा आनंद लुटला. भरपूर गप्पांसह, घरच्यांसाठी दिवाळीत काय काय विशेष करणार आहेत याविषयी सुद्धा कलाकारांनी चर्चा केली. शूटिंगमधून मिळालेल्या सुट्टीत घरी जाऊन दिवाळीच्या कामात हातभार लावणार असल्याचं सगळ्याच कलाकारांचं म्हणणं आहे. शरयू सोनावणे घरी खास कंदील करायला मदत करणार आहे. दामले कुटुंबाने नवे घर घेतले आहे; नव्या घरात आपल्या खरेदीचा वाटा काय असेल हेदेखील निखिलने या गप्पांमध्ये सांगितले. गप्पांसोबतच या कलाकारांचा अंताक्षरीचा डाव सुद्धा रंगला. कलाकारांनी आपल्या मालिकांची शीर्षकगीतं म्हणत हा आनंद वाढवला. दिवाळीच्या दिवसात सुट्टी मिळाली असल्याने दोन महिन्यानंतर घरी जात असल्याचा आनंद गौरीच्या चेहऱ्यावर दिसत होता. फराळातील पदार्थांपैकी, बनवण्यासाठी सगळ्यात कठीण असल्याने अनारसे आवडत असल्याचं अभिजितने सांगितलं. आईबाबांना दिवाळीत खास सरप्राईज देणार असल्याचं पूजाने सांगितलं आहे. दिवाळीचा माहोल सेटवर साजरा होत असताना, सर्व कलाकारांनी करण बेंद्रे याला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या. यंदाची दिवाळी साजरी करण्यासाठी तितिक्षा तावडे आणि सिद्दार्थ बोडके यांचे काही खास प्लॅन्स आहेत.या दोघांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. इतरांना त्रास होणार नाही अशाप्रकारे दिवाळी साजरी करण्याचं आवाहन सगळ्यांना केलं. शिवाय त्यांच्या प्लॅन्सबद्दल बोलताना हे दोघे म्हणाले; "झी युवाच्या कटुंबासोबत दिवाळी साजरी केली जाणार आहे. तसंच 'तू अशी जवळी राहा' मालिकेच्या सेटवर सुद्धा दिवाळीचा आनंद लुटण्याची संधी यंदा मिळणार आहे. दिवाळीसाठी मोठी सुट्टी मिळणार असल्याने मी घरी सुद्धा जाणार आहे. त्यामुळे यंदा तीनवेळा दिवाळी साजरी करायला मिळणार असल्याने मी खूप खुश आहे." -तितिक्षा तावडे "झी युवा सोबत दिवाळी साजरी करण्याचं हे दुसरं वर्ष आहे. सेटवर दिवाळीचा माहोल आणि मिळणार असलेली मोठी सुट्टी या दोन्ही गोष्टींमुळे मला खूप आनंद झालेला आहे. मागच्या वर्षी दिवाळीत घरी जायला मिळालं नव्हतं, पण यंदा मोठी सुट्टी असल्याने मी घरी जाऊ खूप धमाल करणार आहे. यंदा तीनवेळा दिवाळी साजरी करायची असल्याने उत्सुकता खूप उत्सुकता लागून राहिली आहे." -सिद्धार्थ बोडके

पॉयजन’मुळे होणार नाही ना, जुईच्या प्रेमाचा पंगा!!!!

'झी युवा' वाहिनीवरील  'प्रेम पॉयजन पंगा' या मिलकेतून पहिल्यांदाच मराठी टेलिव्हिजनवर इच्छाधारी नागीण दिसणार आहे. ही निराळी भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे तिच्या या...

कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१९ मध्ये झळकणार नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे नाव !

सेक्रेड गेम्समधील गणेश गायतोंडे असो वा गँग्स ऑफ वासेपुरच्या दोन्ही भागातील फैजल खान, अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीने आपल्या अभिनयाने जागतिक स्तरावर करोडो लोकांच्या मनावर राज्य...

‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाचे चित्रीकरण झाले पूर्ण

बहुप्रतिक्षित आणि मल्टिस्टारर फिल्म ‘मीडियम स्पाइसी’चे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले. सई ताम्हणकर, पर्ण पेठे, ललित प्रभाकर, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, सागर देशमुख, इप्शिता, नीना कुळकर्णी, रवींद्र मंकणी अशा तगड्या स्टारकास्टमूळे ह्या मल्टिस्टारर सिनेमाची...

”श्री राम समर्थ” १ नोव्हेंबर रोजी होणार प्रदर्शित

राष्ट्रसंत रामदास स्वामींच्या मुख्य भूमिकेत अभिनेता शंतनू मोघे यांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार पारंपारिक आरती आणि कंटेम्पररी गाण्यांचा उत्तम मेळ राष्ट्रसंत रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित...

Popular