होणार सून मी या घरची'मधील आई आजी असो, किंवा 'चार दिवस सासूचे' मालिकेतील सासू; रोहिणी हट्टंगडी या नावाची जादू नेहमी निराळीच असते. सगळ्यांची लाडकी आणि...
भारतीय सिनेसृष्टीत काही कलाकारांनी बालवयापासूनच अत्यंत सुरेख अभिनयाचं दर्शन घडवत रसिकांची मनं जिंकली आहेत. यात ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यापासून मराठमोळ्या बालकलाकारांचाही फार मोलाचा वाटा...
लग्नघरातल्या धावपळीचा कर्ता-धर्ता ‘नारायण’ याची ओळख पु.ल देशपांडे यांनी आपल्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातून घडवलीच आहे. आगामी ‘बायको देता का बायको’ या मराठी...
आधुनिक विचारांनी, ज्यांनी प्रगतीची वाट दाखवली, त्या महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सोनी मराठी वाहिनीवरील ‘सावित्रीजोती - आभाळाएवढी माणसं होती’...
झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने
अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे.
मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून
प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक
प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं बहुतांश श्रेय हे
मालिकेतील कलाकारांनाही जातं. मुख्य म्हणजे
'रात्रीस खेळ चाले २', मधील कलाकारांच्या
अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे.
ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे.
शेवंता तिचं सामान घेऊन अण्णा नाईकांच्या वाड्यावर
तळ ठोकायला आली आहे. माईंसमोर अण्णा आणि
शेवंताचं प्रकरण उघड झाल्यावर माई मात्र तिला
वाड्यात घ्यायला नकार देतात. शेवंता मात्र हार
मानण्याऱ्यातली नाही आहे, ती तिकडेच पारावर
बसून रात्र काढते. आता शेवंताचं पुढचं पाऊल काय
असेल? तिला नाईकांच्या वाड्यात प्रवेश मिळेल का?
माईंचा नकार असताना अण्णा तिला वाड्यात घेतील
का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.