मुंबई-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी ह्या एक आदर्श माता होत्या, कश्या प्रकारे उत्तम राज्य करावे हा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. त्यांच्याकडून आजच्या महिलांनी - तरुणींनी शिकण्यासारखं...
मराठी मनोरंजन विश्वातील ग्लॅमडॉल, सोनाली कुलकर्णी सगळ्यांचीच लाडकी आहे. उत्तम अभिनय आणि अप्रतिम डान्स ही सोनालीची खासियत आहे. या गुणांच्या जोरावर सोनालीने तिची वेगळी छाप पाडलेली आहे. तिला लाघवी सौंदर्य सुद्धा लाभलेलं आहे. तिचा उत्तम फॅशन सेन्स, तिचं जातीचं सौंदर्य वाढवण्याचं काम करतो. सोनाली वेगवेगळ्या स्टाईल स्टेटमेंट्सचा वापर करत असल्याने, तिचे नवे ग्लॅमरस लुक पाहायला मिळतात. 'झी युवा' वाहिनीवर सध्या सुरु असलेल्या, 'युवा डान्सिंग क्वीन' या कार्यक्रमात, दर आठवड्यात सोनालीचा नवा लुक पाहायला मिळतो. 'युवा डान्सिंग क्वीन'मधील तिचा पेहराव, थीमला साजेसा आणि आकर्षक असतो. अनेक सौंदर्यवतींचा सहभाग असलेल्या या मंचावर सोनालीच्या फॅशनचा खास प्रभाव पडतो!!!
साध्या कुर्तीपासून ते साडीपर्यंत किंवा अगदी वेस्टर्न आऊटफिटपर्यंत, सगळ्या प्रकारचे पेहराव तिच्या सौंदर्यात भरच घालतात. तिच्या या स्टाईल स्टेटमेंटबद्दल विचारले असता ती म्हणाली;
"हॉलिवूड आणि बॉलीवूडमधील अनेक सौंदर्यवतींचं स्टाईल स्टेटमेंट बघून मी प्रभावित होते. नव्वदच्या दशकात जन्मलेल्या आम्हा मुलांवर 'फ्रेंड्स' या मालिकेचा प्रभाव होता. त्यामुळे जेनिफर माझी सगळ्यात फेवरेट आहे. तिने साकारलेल्या भूमिकेची फॅशन बघून मी खूपच प्रभावित होत असे. पण, फॅशनच्या बाबतीत, आदर्श व्यक्तीचे अनुसरण करण्याचे मी टाळते. अनुसरण करण्याच्या नादात त्या व्यक्तीची नक्कल आपण करू लागतो. मला कुणाचीही नक्कल करायला आवडत नाही. ट्रेडिशनल आणि वेस्टर्न असे दोन्ही प्रकार मला आवडतात. खास दिवसांचे निमित्त साधून उत्तम पेहराव करायला मला आवडते. कपडे परिधान करत असताना, आपल्या शरीराचा बांधा कसा आहे, याचा सुद्धा विचार होणे गरजेचे आहे. फॅशन सांभाळताना, पेहराव आपल्यासाठी सोयीचा सुद्धा असायला हवा. ती खबरदारी सुद्धा मी घेते."
सोनालीचे नवनवीन स्टाईल स्टेटमेंट जाणून घेण्यासाठी पाहत रहा, 'युवा डान्सिंग क्वीन', बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता, फक्त आपल्या लाडक्या 'झी युवा' वाहिनीवर!!!
तेजश्री प्रधान म्हणजे टेलिव्हिजन क्षेत्रातील गाजलेला चेहरा. ही लोकप्रिय अभिनेत्री चित्रपट आणि नाटक या माध्यमातूनसुद्धा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. तेजश्रीच्या अभिनयाचे आणि तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत.
तेजश्रीचा आगामी चित्रपट हाजरी ९ फेब्रुवारीला झी टॉकीज वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकतंच या चित्रपटाचा प्रोमो रिलीज झाला. या प्रोमोला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून तेजश्रीच्या या नव्या चित्रपटाबद्दल सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात तेजश्री स्वप्नालीची व्यक्तिरेखा साकारतेय जी स्पष्टवक्ती आणि सडेतोड आहे. तिची ही भूमिका तिने आधी साकारलेल्या सगळ्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. स्वप्नालीसाठी तेजश्रीचा आवाज देखील वरच्या पट्टीत असणार आहे त्यामुळे तेजश्रीचा या भूमिकेसाठी एक वेगळाच सूर लागलेला प्रेक्षकांना पहायला मिळेल. या चित्रपटात स्वप्नाली ही एक सेल्सगर्ल आहे. ती एका अनुरूप जोडीदाराच्या शोधात आहे. स्वप्नालीच्या नशिबात देखील एखादा चांगला मुलगा असेल जो कदाचित तिचीच वाट बघत असेल अशा भावना ती या प्रोमोमध्ये व्यक्त करते. आता स्वप्नालीच्या नशिबात कोण आहे? तिला अनुरूप जोडीदार मिळेल का? आणि तिच्या लग्नाची गाठ कुठल्या मुलाशी बांधली जाणार? हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका हाजरी चित्रपट फक्त झी टॉकीज वर.
झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेनं अल्पावधीतचं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. कुठलीही ऐतिहासिक भूमिका प्रेक्षकांना...
होणार सून मी या घरची'मधील आई आजी असो, किंवा 'चार दिवस सासूचे' मालिकेतील सासू; रोहिणी हट्टंगडी या नावाची जादू नेहमी निराळीच असते. सगळ्यांची लाडकी आणि...