मराठी सिनेसृष्टीतली ‘वर्कहोलिक’ म्हणून ओळखली जाणारी आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने सोमवारपासून चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. सोमवारी सई तिच्या रिएलिटी शोच्या चित्रीकरणस्थळी पोहोचली. तब्बल तीन महिन्यांनी पुन:श्च हरिओम...
मुंबई. बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमने म्युझिक इंडस्ट्रीतील घराणेशाहीवर आवाज उठवला आहे. दिग्दर्शक, निर्माता तयार असतानाही अनेक नव्या कलाकारांना संगीत कंपन्यांच्या मक्तेदारीमुळे काम मिळत नसल्याचे...
कोरोनाच्या प्रार्दुभावाने गेले तीन महिने सर्व काही ठप्प होतं पण आता हळूहळू सर्व गोष्टी पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत आणि आखून दिलेल्या नियमांचं पालन करून मालिकांचं चित्रीकरण पुन्हा सुरू करण्याची परवानगीसुद्धा निर्मात्यांना मिळाली आहे. याचं पार्शवभूमीवर सोनी मराठी वाहिनीने सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे योग्य ते पालन करून मुंबईतील पहिल्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. मुंबईत चित्रीकरण होणारी स्वराज्यजननी जिजामाता ही पहिली मालिका आहे.
सोनी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. एका मुलखावेगळ्या आईची गाथा, जिनं स्वराज्याचा सिंह घडवला अशा जिजामातांच्या आयुष्यावर ही मालिका आहे. या मालिकेचं चित्रीकरण दादासाहेब फाळके चित्रनगरी इथं सुरू झालं आहे. सरकारनं आखून दिलेले सर्व नियम पळून या मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं आहे. संपूर्ण सेटचं सॅनिटायजेशन करण्यात आलं आहे. सेटवर मास्क सक्तीचे असून नियमानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आता चित्रीकरण पार पडणार आहे. काही लोक सेटवरच राहून काम करणार असून त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं ही निर्मात्या संस्थांची जबाबदारी आहे. मुंबईत चित्रीकरण सुरू होणारी ही पहिलीच मालिका आहे. ही मालिका डॉ. अमोल कोल्हे यांची असल्यानं आणि ते स्वतः डॉक्टर असल्यानं चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी त्यांनी स्वतः सेटवर उपस्थित राहून सर्वांना नियम समजावून सांगितले व सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर चमू यांना प्रोत्साहन दिले. तीन महिन्यांनंतर आपापल्या कामावर रुजू झाल्यामुळे सर्वच मंडळींमध्ये उत्साह होता. 'स्वराज्यजननी जिजामाता' ही ऐतिहासिक मालिका असल्यानं मिळालेल्या वेळेत कलाकारांनी आपापल्या व्यक्तिरेखेसाठी कसून तयार केली आहे. आता नियमांच्या चौकटीत राहून आपलं काम व्यवस्थित करून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेचा पूर्ण चमू सज्ज झाला आहे. पाहत राहा 'स्वराज्यजननी जिजामाता' सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वा. आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.
’टोटल हुबलाक' मधून मोनालीसाची एन्ट्री टीव्ही विश्वात
मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक नवनवीन तरुण कलाकार आपल्या अभिनयाने छाप सोडत प्रेक्षकांची मन जिंकत आहेत. अशाच पैकी एक...
लॉकडाऊनच्या प्रदीर्घ काळात कधीही न थांबणारी मनोरंजन सृष्टी थांबली होती. अनेक चित्रपट, मालिका, वेब सीरिज यांचे चित्रीकरण ठप्प झाले होते. सलग ३ महिने चित्रीकरण...