Filmy Mania

‘महक’तर्फे रविवारी ‘मेरा साया साथ होगा’ची लाईव्ह मैफल

पुणे : कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक कलाकारांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चार भिंतीत आपण सगळे बंद असल्याने एकमेकांना भेटणे शक्य नाही. काम करणे शक्य...

टिव्ही मालिकांचे मानधन 3 महिन्यांनी का? एका महिन्यातच मिळाले पाहिजे-प्रिया बेर्डे

पुणे ः जे प्रश्न सोडवायला पाहिजेत ते कोणी सोडवत नाही असे चित्रपट कलावंत, तंत्रज्ञ, बॅकस्टेज आर्टिस्ट यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी...

छोट्या शिवबाच्या भूमिकेत आर्यन लहामगे!

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे स्वराज्याचा आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकताना, पाहताना सर्वांचा ऊर अभिमानानं भरून येतो, पण त्यांच्या या शौर्य आणि जडघडण यांमागे मोठा वाटा आहे तो त्यांच्या आईचा, जिजाऊ माँसाहेबांचा आणि म्हणूनच त्यांना 'स्वराज्यजननी जिजामाता' म्हटलं जातं. सोनी मराठी  वाहिनीवरल्या ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. १३ जुलैपासून सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वा. मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.  ही गाथा मुलखावेगळ्या आईची गाथा आहे. जिजाऊंनी स्वराज्याचा सिंह, रयतेचा राजा कसा घडवला याची कथा या मालिकेत मांडली आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशीच मालिकेतही शिवजन्म झाला आणि स्वराज्यबांधणीच्या प्रवासाला सुरुवात झाली. मालिका आता काही वर्षांचा अवकाश घेते आहे. आता आर्यन रवींद्रनाथ लहामगे हा बालकलाकार छोट्या शिवबाची भूमिका साकारताना दिसणार आहे. यापूर्वी आर्यनने एक होती राजकन्या आणि सावित्रीजोती या मालिकेत अभिनय केला आहे. शिवबाची भूमिका साकारण्यासाठी आर्यनने घोडेस्वारी आणि तलवारबाजी यांचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याचप्रमाणे मिळालेल्या वेळेत त्यानं बरीच पुस्तकंही वाचून काढली आहेत.  या मालिकेतून प्रेक्षकांना जिजाऊंचे संस्कार आणि शिवबांची जडणघडण पाहायला मिळणार आहे! पाहा, स्वराज्यजननी जिजामाता सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वा. आपल्या सोनी मराठीवर.

बॉलिवूडच्या ‘नृत्यगुरू’ हरपल्या- सांस्कृतिक कार्यमंत्री-अमित देशमुख

मुंबई  : प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांच्या निधनामुळे बॉलिवूडच्या नृत्यगुरू हरपल्या, अशी शोकभावना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली. श्री. देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, सरोज...

पती-पत्‍नीमधील नोक-झोक’हप्‍पू की उलटन पलटन’येतेय नवे किस्से घेऊन …

अॅण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'मधील पडद्यावरील जोडी हप्‍पू व राजेशची भूमिका साकारणारे योगेश त्रिपाठी व कामना पाठक ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी बनली आहे. त्‍यांच्‍यामधील...

Popular