Filmy Mania

भाऊबळी’चा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीला…

झी स्टुडिओजने नेहमीच प्रेक्षकांना खूप उत्कृष्ट सिनेमे दिले. ‘पांडू’, 'टाईमपास ३', 'धर्मवीर' सारखे सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर झी स्टुडिओज आता विनोदी सिनेमा घेऊन येत आहेत. झी...

जगभरातील तीस देशांतील चित्रपटांतून निवडलेला एकमेव मराठी चित्रपट-अमेरिकेतील फोर्थ स्मिथ आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये ‘बनी’चे स्क्रिनिंग!

जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अमेरिकेतील ‘फोर्थ स्मिथ आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल’मध्ये निर्माते शंकर धुरी यांच्या ‘आकृती क्रिएशन्स’ निर्मित आणि निलेश उपाध्ये लिखित - दिग्दर्शित 'बनी' या एकमेव मराठी चित्रपटाची निवड...

विशालचा नवा अल्बम ‘तू संग मेरे’

मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता असलेल्या अभिनेता विशाल निकमच्या मनात सध्या कुणीतरी घर केलंय... त्याच्या मनातील ती व्यक्ती कोण हे लवकरच त्याच्या चाहत्यांना समजणार...

सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ‘फौजी’

सैनिक देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. त्यांच्यामुळे आपण आपलं आयुष्य सुखाने जगू शकतो. कधी कुठे हल्ला झाला किंवा दंगली झाल्या तर आपण खंत व्यक्त...

भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लघुपटाची निर्मिती!  

'कालजयी सावरकर' म्हणजे सावरकरांचे चरित्र आणि विचार मांडण्याचा एक स्तुत्य प्रयत्न! लघुपटाच्या विशेष स्क्रिनिंग दरम्यान जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांची प्रतिक्रीया  दादर येथील प्लाझा सिनेमाचे हाऊसफुल झालेले प्रिव्हियू थिएटर आणि पत्रकारांसोबतच्या संवादातून झालेले सावरकरांच्या कालजयी विचारांचे जागरण याला निमित्त होते 'कालजयी सावरकर' या लघुपटाचे पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेले विशेष प्रिव्हियू स्क्रिनिंगचे ! या कार्यक्रमाला जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. विवेक समूहाची निर्मिती असलेल्या 'कालजयी सावरकर' या लघुपटातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र आणि त्यांचे प्रखर राष्ट्रवादी विचार मांडण्याचा अतिशय स्तुत्य प्रयत्न झाला आहे आणि याचा मला आनंद वाटतो अशी बोलकी प्रतिक्रीया जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी लघुपट संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. याप्रसंगी लघुपटातील अभिनेते मनोज जोशी, सौरभ गोखले आणि तेजस बर्वे यांच्यासह इतर सहकलाकार आणि तंत्रज्ञ ही उपस्थित होते. लघुपटाचे स्क्रिनिंग झाल्यानंतर प्रश्नोत्तरादरम्यान बोलताना लघुपटाचे दिग्दर्शक गोपी कुकडे म्हणाले की, 'क्रिएटीव्हीटी अर्थात कलात्मकता ही माध्यम बदललं तरी त्याचं मूळ बदलत नाही त्यामुळे गेली ३० हून अधिक वर्ष जाहिरात क्षेत्रात काम केल्यानंतर आता लघुपटाच्या माध्यमात काम करताना फारसे अवघड गेले नाही. यावेळी निर्माते आणि विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर सुद्धा उपस्थित होते त्यांनीही पत्रकारांना संबोधित करून आपली या लघुपटामागील निर्मितीची संकल्पना मांडली. लवकरच हा लघुपट विविध संस्थांच्या माध्यमातून गावा - गावात आणि शहरा - शहरात भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या वर्षाचे औचित्य साधून दाखवला जाणार आहे. या लघुपटात पारतंत्र्यातील हिंदुस्थानच्या भूमिकेत अभिनेते मनोज जोशी यांनी तर नवभारताची भूमिका तेजस बर्वे या अभिनेत्याने साकारली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रमुख भूमिकेत...

Popular