समाज घडविणाऱ्या महान व्यक्तीं व सामाजिक विषयांवरील चित्रपटांसाठी धोरण तयार करणार
अमृतमहोत्सवी वर्षात महान व्यक्तींवरील मालिकांनाही अनुदान देणार
मुंबई दि. 18 जानेवारी 2023:
महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सामाजिक आणि...
मुंबई-माधुरी दीक्षित,श्रीराम नेने , जॉन अब्राहम, पुष्कर जोग,प्राजक्ता माळी,तुषार दळवी, महेश टिळेकर यांच्यासह सुमारे अडीच हजार मतदारांची नावे वगळल्यानंतर उच्च न्यायालयात गेलेल्या महामंडळाच्या निवडणुकीला...
'पोस्ट ऑफीस उघडं आहे...', ही मालिका ५ जानेवारीपासून गुरुवार ते शनिवार रात्री 9 वा. सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी दाखल झाली आहे. वेगळ्या विषयांच्या आणि धाटणीच्या मालिका आपल्याला सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतात. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातले विनोदी अभिनेते या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. मकरंद अनासपुरेही या मालिकेतून आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
मालिकेत एक विशिष्ट जोडी पाहायला मिळणार आहे. मकरंद अनासपुरे आणि दिलीप घारे ही गुरुशिष्यांची जोडी ह्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. हे दोघेही दिग्गज अभिनेते आहेत. 'पोस्ट ऑफिस उघडं आहे...' या मालिकेत दिलीप घारे हे मकरंद अनासपुरे यांच्या वडिलांचा भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. दिलीप घारे हे माझे अभिनयातले गुरू आहेत, असं मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं. अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात दिलीप घरे यांनी मकरंद अनासपुरे यांना अभिनय शिकवला आणि आता हे दोघे दिग्गज आपल्याला एकाच मालिकेत दिसणार आहेत. त्यांची जुगलबंदी पाहण्यासारखी आहे. वडील आणि मुलगा यांची ही मराठवाड्यातली सुंदर जोडी आपल्याला पाहता येणार आहे. याबद्दल मकरंद अनासपुरेही उत्सुक आहेत.
मराठी सिनेनाटयसृष्टीत चिरतरुणअभिनेता म्हणून अशोक शिंदे यांची ओळख आहे.नाटक, चित्रपट, मालिकांमधून नायक, सहनायक तसेच खलनायक अशा विविधांगी भूमिका त्यांनी आजवर साकारल्या. आपल्या व्यक्तिमत्वाच्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण...
बालकवींची 'फुलराणी' म्हणजे नितांतसुंदर काव्य… महाराष्ट्राच्या कितीतरी पिढ्या या फुलराणीने फुलवल्या. त्यामुळेच मराठी रुपेरी पडद्यावर येऊ घातलेल्या ‘फुलराणी’ चित्रपटाविषयी उत्सुकता असणं साहजिकचहोतं. चित्रपटात फुलराणी कशी असणार? आणि विशेष म्हणजे कोण असणार? याविषयी खूप उत्सुकता पहायला मिळते आहे. चित्रपटाच्या...