Filmy Mania

‘फकाट’चे हायली कॉन्फिडेन्शिअल टीझर प्रदर्शित

निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधवआता पुन्हा एकदा एक चित्रपट घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'फकाट' या आगळ्यावेगळ्या नावाचा चित्रपट हायली कॉन्फिडेन्शिअल धिंगाणा...

रावरंभा’ चित्रपटात ‘शाहीन आपा’च्या भूमिकेत.. अपूर्वाचा अनोखा अंदाज

आपल्या अभिनयाने आणि बिनधास्त स्वभावाने कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नवीन काय घेऊन येणार? याची उत्सुकता कायमच तिच्या चाहत्यांना असते. वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अपूर्वा...

आता होणार हवा… टीडीएम करणार प्रेक्षकांच्या मनावर राज्य !

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच वेगवेगळे प्रयोग होताना दिसतात. गेल्या काही वर्षांपासून गावातील संस्कृती, गावचा रांगडेपणा, स्थानिक-सामाजिक प्रश्नांवर बोलणारे चित्रपट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आधुनिकीकरणाच्या युगात...

‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेनी गाठला ५०० भागांचा टप्पा!

सोनी मराठी वाहिनीवरील 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेने संतांची परंपरा उलगडत प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे. माउली आणि त्यांची भावंडं, यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलं. प्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेत. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळते आहे. आळंदीच्या ग्रामस्थांना माउलींच्या दिव्यत्वाचे दर्शन वेळोवेळी होते आहे. माउली आणि त्यांची भावंड यांचे चमत्कार ग्रामस्थांना पाहायला मिळाले.                   मालिकेत  माउली आणि त्यांची भावंडं यांच्याबरोबर संत सेना महाराज यांची भेट झाली. आत्तापर्यंत निरनिराळे संत आणि त्यांची मांदियाळी आपल्याला 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेतून पाहायला मिळाली असून मालिका आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेचे ५०० भाग पूर्ण होताहेत. माउलींचे चमत्कार आपल्याला यापुढेही पाहायला मिळतील. आता माउलींच्या कार्यात ग्रामजोशी पुन्हा अडथळा निर्माण करताना दिसणार आहेत. त्यांना माउली आणि त्यांची भावंडं कसे सामोरे जाणार, हे पाहायला मिळणार आहे.                   'ज्ञानेश्वर माउली' मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले असून येत्या रविवारी ९ एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वा. मालिकेचा महाएपिसोड सोनी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीच्या विकासासाठी लवकरच ‘ऑनलाईन फिल्म बाजार पोर्टल’ – चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे

मुंबई, दि. 31 : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात फिल्म बाजार या संकल्पनेअंतर्गत लेखक, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ज्ञ यांना एकत्र आणून सुलभ चित्रपटनिर्मितीच्या...

Popular