Feature Slider

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला साडेसात कोटी रुपयांची देणगी देणार

पुणे, ९ डिसेंबर २०२२- मूर्ती ट्रस्ट या श्रीमती सुधा मूर्ती आणि श्री. नारायण मूर्ती यांच्या कौटुंबिक प्रतिष्ठानने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला (BORI) संस्कृत आणि प्राकृत भाषेतील दुर्मिळ पुस्तके आणि हस्तलिखितांचे जतन आणि संशोधन करण्यासाठी साडेसात कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. या अनुदानामध्ये १८,००० चौरस फूट हेरिटेज शैलीची, २०० आसन क्षमता असलेली शैक्षणिक आणि संशोधन इमारत, व्याख्याने आयोजित करण्यासाठी एक अत्याधुनिक सभागृह आणि प्राचीन पुस्तके आणि हस्तलिखिते डिजीटाईज करण्यासाठी दृकश्राव्य स्टुडिओ असलेल्या मूर्ती सेंटर ऑफ इंडिक स्टडीजचे बांधकाम समाविष्ट आहे. श्रीमती सुधा मूर्ती यांच्या हस्ते इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. नवीन उपक्रमाबद्दल बोलताना श्रीमती सुधा मूर्ती म्हणाल्या, "भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था  ही १०५ वर्षे जुनी संस्था आहे आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे. या संस्थेने बौद्धिक शोधनिबंध आणि पुस्तकांची भरपूर निर्मिती केली आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमधील प्रत्येक प्राध्यापक महान विद्वान आहेत. 'महाभारताची चिकित्सा आवृत्ती' आणि 'काणे यांचे धर्मशास्त्र' या दोन पुस्तकांच्या बौद्धिक कार्याने मी भारावून गेले. ही दोन्ही पुस्तके माझ्या मनाला खूप भावली आहेत. काळ बदलला तसे आता...

वसंत मोरे,म्हणाले,’असे करतो पत्रकारांच्याच पक्षात येतो’

वसंत मोरे आणि मनसे कोअर कमिटी यांच्यातील मतभेद जाणून घेण्यासाठी अमित ठाकरेंचा पुढाकार वसंत मोरेंनी अमित ठाकरेंना सांगितली कोअर कमिटी बाबतची गाऱ्हाणी म्हणाले ,'...

‘सोनिया शक्ती’ विद्यार्थ्यांच्या पंखाना बळ देईल : सतेज पाटील

सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत ७६ विद्यार्थ्यांना 'सोनिया शक्ती' शिष्यवृत्तीचे वितरण; १४० तरुणांना पोलीस भरतीसाठी साहाय्यपुणे : "भारत हा तरुणांचा देश असून, या तरुणाईला सक्षम...

वीजयंत्रणेतील बिघाडामुळे पिंपरी चिंचवडसह शिवाजीनगर परिसरामध्ये वीजपुरवठा खंडित

पुणे, दि. ०९ डिसेंबर २०२२: महापारेषण कंपनीच्या चाकण व लोणीकंद या अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रातील यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शुक्रवारी (दि. ९) सकाळी पावणे दहानंतर पिंपरी चिंचवड...

भूजल आराखड्यातील बाबींवर प्राधान्याने अंमलबावणी- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे, दि. ९: केंद्रीय भूमी जल बोर्डाच्यावतीने तयार करण्यात आलेला पुणे जिल्ह्याचा भूजल व्यवस्थापन आराखडा बोर्डाच्या पुणे येथील राज्य कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश...

Popular