डोबिंवलीमध्ये आगळावेगळा आर्मी डे शानदारपणे साजरमुंबई, दि. १६ जानेवारी- पाकिस्तान हा देश कधीही सुधारणा नाही. भारताला कसे पाण्यात बघायचे आणि देशाचे तुकडे कसे करायचे...
पुणे-छत्रपती संभाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिवस. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या राज्याभिषेकदिनाचे औचित्य साधत डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास तब्बल ३०...
पुणे दि.१६- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये जी-२० राष्ट्रांच्या परिषदेच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी...
'पोस्ट ऑफीस उघडं आहे...', ही मालिका ५ जानेवारीपासून गुरुवार ते शनिवार रात्री 9 वा. सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी दाखल झाली आहे. वेगळ्या विषयांच्या आणि धाटणीच्या मालिका आपल्याला सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतात. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातले विनोदी अभिनेते या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. मकरंद अनासपुरेही या मालिकेतून आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
मालिकेत एक विशिष्ट जोडी पाहायला मिळणार आहे. मकरंद अनासपुरे आणि दिलीप घारे ही गुरुशिष्यांची जोडी ह्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. हे दोघेही दिग्गज अभिनेते आहेत. 'पोस्ट ऑफिस उघडं आहे...' या मालिकेत दिलीप घारे हे मकरंद अनासपुरे यांच्या वडिलांचा भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. दिलीप घारे हे माझे अभिनयातले गुरू आहेत, असं मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं. अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात दिलीप घरे यांनी मकरंद अनासपुरे यांना अभिनय शिकवला आणि आता हे दोघे दिग्गज आपल्याला एकाच मालिकेत दिसणार आहेत. त्यांची जुगलबंदी पाहण्यासारखी आहे. वडील आणि मुलगा यांची ही मराठवाड्यातली सुंदर जोडी आपल्याला पाहता येणार आहे. याबद्दल मकरंद अनासपुरेही उत्सुक आहेत.