Feature Slider

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या पदयात्रेस मोठी गर्दी

पुणे-महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या दि.१४ सायंकाळी झालेल्या प्रभाग  क्र.१६ मधील पदयात्रेस कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी 4:३० वाजता सुरु झालेल्या...

तिळवण तेली समाजाचा धंगेकर यांना  पाठिंबा व निवडून आणण्याचा निर्धार- आबा बागुल

पुणे'ज्याच्या मागे तेली तो भाग्यशाली' अशी श्रद्धा असलेला कसबा मतदारसंघातील सर्व तेली समाज महाविकास आघाडीच्या बाजूने खंबीरपणे उभा राहणार असून धंगेकर यांना विजयी करून दाखवणारच 'असा निर्धार माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी आज येथे व्यक्त केला. पुणे शहर तिळवण तेली समाजाच्या वतीने कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र माळवदकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष विरेंद्र किराड, विशाल धनवडे, अविनाश बागवे, वनराज आंदेकर, लक्ष्मीताई उदयकांत आंदेकर, निसार शेख, सुरेश कांबळे, दत्ता सागरे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. तेली समाजाचे अध्यक्ष घनश्याम वाळुंजकर यांच्या नेतृत्वाखाली समाजाचे बहुसंख्य स्त्री पुरुष व तरुण यावेळी उपस्थित होते. श्री बागुल पुढे म्हणाले, मेहनत, कर्तुत्व व निष्ठा या त्रिसूत्री पद्धतीने तेली समाज सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर असून अचूक व योग्य व्यक्तीची निवड करताना समाज सर्व ताकदीनिशी उभा राहतो, हे मागील पन्नास वर्षाच्या काळात दिसून आले आहे. त्यामुळे रविंद्र धंगेकर यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निश्चय समाजाने केला असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या प्रास्ताविक पर मनोगतात समाजाचे अध्यक्ष घनश्याम वाळुंजकर यांनी, कसबा मतदार संघातील ४९२३ कुटुंबे धंगेकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील अशी घोषणा त्यांनी केली. यावेळी माजी मंत्री बागवे, मोहन जोशी, रविंद्र माळवदकर, विरेंद्र किराड यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमाला प्रवीण करपे, संजय भगत, जयाशेठ किराड,  कुमार भगत, सौरभ अमराळे, दीपक पवार, विलास रत्नपारखी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित बागुल यांनी तर आभार माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी मानले.

महाराष्ट्रातील श्री भीमाशंकर हेच धर्मशास्त्रांत वर्णित सहावे ज्योतिर्लिंग असल्याने याविषयी राजकीय वाद नको ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची भूमिका

पुणे- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी शंकराचार्य-धर्माचार्य यांचे मार्गदर्शन घेऊन पुणे जिल्ह्यातील श्री भीमाशंकर हेच सहावे ज्योतिर्लिंग असल्याची भूमिका देशासमोर मांडावी,...

शिवजयंतीनिमित्त राज्य शासनातर्फे किल्ले शिवनेरी येथे हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३

पुणे दि. १५: महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध...

एयर इंडियातर्फे आधुनिक विमानांचे संपादन करण्यासाठी पूर्वकरारावर सही

नवी दिल्ली – एयर इंडिया हा भारतातील आघाडीचा विमानसेवा समूह आणि टाटा सन्म समूहाचा भाग असलेल्या कंपनीने आज एयरबस आणि बोईंगसह पूर्वकरारावर (लेटर्स ऑफ...

Popular