Feature Slider

“अपयश ही फक्त एक घटना असते, व्यक्ती कधीच अपयशी नसते”: खेर

#IFFIWood,SHARAD LONKAR 23 नोव्‍हेंबर 2025  गोव्यातील पणजी इथल्या कला मंदिरात आजच्या पहिल्या मास्टरक्लासमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणातून शेकडो लोकांना पूर्णपणे...

इफ्फीमध्ये उलगडले ‘निलगिरीज’, ‘मु. पो. बॉम्बिलवाडी’ आणि ‘शिकार’ या तीन चित्रपटांचे सिने विश्व

'शिकार'चे कलाकार आणि चमूने जुबीन गर्ग यांचा केला गौरव, विविध देशांमध्ये केलेल्या प्रवासाची दिली माहिती'निलगिरीज' चित्रपट निर्मात्यांनी सांगितल्या संयमाच्या कथा; सह अस्तित्वाचे केले आवाहन'बोंबीलवाडी'च्या...

स्वरमयी गुरुकुलतर्फे डॉ. रेवती कामत यांची गायन मैफल

पुणे : सुश्राव्य, सुमधुर गायन त्याला संयमित तबला वादनासह मोहक संवादिनीच्या सुरावटींची लाभलेली साथ अशा सांगीतिक मैफलीचा आनंद आज रसिकांना मिळाला. निमित्त होते डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुलतर्फे आयोजित डॉ. रेवती कामत यांच्या शास्त्रीय गायन मैफलीचे. स्वरमयी गुरुकुल, संभाजी उद्यानासमोर येथे आज (दि. २३) या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. रेवती कामत यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग ललतमधील गुरू डॉ. अश्र्विनी भिडे-देशपांडे रचित ‘हो नंदलाल’ या विलंबित एक तालातील रचनेने केली. यानंतर डॉ. प्रभा अत्रे यांचे सांगीतिक विचार मांडत डॉ. रेवती कामत यांनी डॉ. प्रभा अत्रे यांची ‘नम जपत बार बार, हे गोपाल हे दयाल’ ही भक्तिभावपूर्ण बंदिश सुमधुरपणे सादर केली. डॉ. कामत यांनी जौनपुरी राग सादर करताना दोन बंदिशी ऐकविल्या. यात झपतालातील ‘मानो जरा नित दिन’ तसेच ‘पायल बाजन लागी रे अब’ यांचा समावेश होता. ‘अब मोरी बात मान ले पिहरवा’ ही राग शुद्ध सारंगमधील बंदिश प्रभावीपणे सादर करून त्यांनी रसिकांना आनंदित केले. मैफलीची सांगता भैरवीने करताना डॉ. रेवती कामत यांनी सुप्रसिद्ध ऐतिहासिक कवी, संगीतकार अमीर खुसरो यांनी रचलेल्या जीवनाचे वास्तव दर्शविणाऱ्या ‘बहुत रही बाबुल घर’ या रचनेतील अर्थपूर्णता प्रभावीपणे रसिकांपर्यंत पोहोचविली.   डॉ. रेवती कामत यांना भरत कामत (तबला), लीलाधर चक्रदेव (संवादिनी), ओजस्वी वर्टीकर (तानपुरा, सहगायन) यांनी समर्पक साथसंगत केली. कलाकारांचे स्वागत स्वरमयी गुरुकुलचे सल्लागार भरत वेदपाठक यांनी तर सूत्रसंचालन पल्लवी घोडके यांनी केले.

 “पुण्याने देशाला मोजके व कसलेले खेळाडू दिले” – राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ

 एफआयएच पुरुष हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफीचे पुण्यात भव्य स्वागत पुणे : तमिळनाडूमध्ये होणाऱ्या एफआयएच पुरुष हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप २०२५ च्या ट्रॉफीचे आज...

विमाने कोसळली.. तशी भाजप’ची विश्वासार्हता भुईसपाट..

अतिरेकी हल्ले, बॉम्बस्फोट, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा.. मात्र  सरकारी संपत्तीच्या लुटीला राजकीय थारा..!⁃काँग्रेस’ची प्रखर टिकापुणे दि २३ - २०१४ मध्ये हाती आलेल्या व “आर्थिक महासत्ता होऊ...

Popular