जात, धर्म :”भारतीय”..जनहित याचिका आज सर्वोच्च न्यायालयात दाखल

Date:

जातीपातीच्या पुसण्या खाणाखुणा ‘भारतीय ‘ नावाची चळवळ अवतरली

पुणे- कोणत्याही आवश्यक त्या ठिकाणी जात धर्म : अशी विचारणा करणाऱ्या कॉलम मध्ये ‘ भारतीय ‘ अशी टिप्पणी कायदेशीर मानली जावी या अनुषंगाने पुण्यातील वैभव वाघ आणि वंदेमातरम संघटनेने सुरु केलेली चळवळ आता सर्वोच्च न्यायालयाच्या दारी पोहोचली आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात “जात धर्म भारतीय” या विचाराला कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून या आशयाची जनहित याचिका आज सन्मानीय सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे अशी माहिती वैभव वाघ यांनी येथे माय मराठी ला दिली .
कार्यकर्ता म्हणून पुण्याला परिचित असलेला वैभव म्हणाला ,’खरे तर आज खूप आनंद होत आहे की गेली काही वर्षे आपली सुरु असलेली राष्ट्रीय एकात्मतेची जात धर्म भारतीयची लढाई सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आता एका महत्वाच्या वळणावर आली आहे.
गेली अनेक वर्षे वंदेमातरम् संघटना आणि वंदेमातरम् परिवारातील सर्व संस्था “जात धर्म पंथ फक्त भारतीय” हा विचार घेऊन विविध माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारासाठी कार्यरत आहे. विविध आंदोलने, उपक्रम, प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध उत्सव या माध्यमातून हे काम चालूच आहे. या कालावधीत जात धर्म भारतीय हा विचार मनापासून पटणारे आणि हा विचार कृतीतून आचरणात आणणारे अनेक राष्ट्रबांधव संपर्कात आले. विविध दौऱ्यांमधून प्रवासा दरम्यान हे पण कळले की संपूर्ण देशात जात धर्म भारतीय ही संकल्पना मानणारे राष्ट्रबांधव खुप मोठ्या प्रमाणावर आहेत. पण जात धर्म भारतीय या संकल्पनेला शासकीय पातळीवर अधिकृत अशी कोणतीही पार्श्वभूमी किंवा कोणता कायदा, नियम नाही. त्या मुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात “जात धर्म भारतीय” या विचाराला कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून या आशयाची जनहित याचिका आज सन्मानीय सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.

वंदेमातरम् संघटना, राष्ट्रप्रथम एकात्मता परिषद आणि आय फॉर इंडिया ट्रस्टच्या वतीने वैभव वाघ यांनी ही याचिका दाखल केली. सन्माननीय सर्वोच्च न्यायालयात जात धर्म भारतीय या विचाराच्या बाजूने कायदेतज्ञ ॲड. अरविंद आव्हाड अभ्यासूपणे बाजू मांडणार आहेत. या कायदेशीर प्रक्रियेसाठी ॲड. शिवम पोतदार, ॲड.अनिश पाडेकर यांनी विशेष मेहनत घेतली असून जेष्ठ कायदेतज्ञ ॲड. सुधाकर आव्हाड सर , डॉ. असित अरगडे , पूजा देसाई, ॲड.अजय वाघ, ॲड. मनिष पाडेकर , ॲड.तेजस दंडगव्हाळ, ॲड. विशाल सुतार, ॲड. किर्ती शिंदे यांनी विशेष सहकार्य केले आहे. वंदेमातरम् संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, पुणे शहरातील सामाजिक क्षेत्रातील आमचे सर्व गुरुबंधू आणि सर्व समविचारी मित्र मैत्रीणींची साथ तर आहेच.

राष्ट्रपुरुष आमच्या हक्काचे नाही कोणत्या जातीचे ही घोषणा देत विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये चेहरेपट्टीच्या कागदावर जात धर्म म्हणून “भारतीय” असे नमूद केल्यापासून सुरु झालेली ही लोकचळवळ आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे.

ज्या देशात छत्रपती शिवरायांनी जाती पातीच्या संकुचित विचारांना मूठमाती देत स्वराज्य निर्माण केले, भगतसिंगांनी कौमी एकता जिंदाबादचा नारा दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी Caste Religion only Indian चा विचार दिला. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा अनेक राष्ट्रपुरुषांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या विविध चळवळी राबविल्या त्याच आपल्या भारतदेशाच्या सर्वोच्च न्यायालयात आता आपण “जात धर्म भारतीय” या भावनेला अधिकृत मान्यता मिळावी अशी प्रार्थना केली आहे. आता पुढील काळात निकाल लागेपर्यंत हे प्रकरण न्यायप्रविष्ट असणार आहे त्यामुळे जास्त काही बोलता येणार नाही. पण खुप अभ्यासपूर्वक आणि मेहनतीने आपली बाजू सन्माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केली आहे. बघू यात आता पुढे काय होतय…

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘पीएमआरडीए’ मुख्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण पुणे :...

जिल्ह्यात पहिल्याच दिवशी आठ हजाराहून अधिक नागरिकांनी केली स्व-गणना-अपर जिल्हाधिकाऱ्‍यांची माहिती

जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश...

डॉ. सुरेश गरसोळे यांनी नकाश्याला आधुनिक तंत्रज्ञाना ची जोड द्यावी – दीपक शिकारपूर.

महाराष्ट्र दिनी नवीन जिल्हे व अहिल्यानगर, संभाजीनगर, धाराशिव ह्या...

सामाजिक न्यायासाठी आग्रही हीच समाजवादी चळवळीची ओळख:अॅड.मोहन वाडेकर        

नानासाहेब गोरे स्मृती दिनानिमित्त अभिवादन सभेला चांगला प्रतिसाद पुणे :एस....