उपाध्यक्षपदी सीए राजेश अग्रवाल, सचिवपदी सीए प्रीतेश मुनोत, खजिनदारपदी सीए प्रणव आपटे यांची निवड
पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेच्या अध्यक्षपदी सीए काशिनाथ पठारे यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी सीए राजेश अग्रवाल, सचिवपदी सीए प्रीतेश मुनोत, खजिनदारपदी सीए प्रणव आपटे, तर ‘विकासा’ या विद्यार्थी शाखेच्या अध्यक्षपदी सीए मौसमी शहा यांची निवड झाली आहे. २०२२-२०२३ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष सीए काशिनाथ पठारे यांनी मावळते अध्यक्ष सीए समीर लड्डा यांच्याकडून पदभार स्वीकारला. कार्यकारिणी सदस्य म्हणून सीए ऋषिकेश बडवे, सीए अमृता कुलकर्णी, सीए सचिन मिणियार, सीए अजिंक्य रणदिवे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समिती सदस्य आणि वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे उपाध्यक्ष सीए यशवंत कासार, सीए ऋता चितळे उपस्थित होते. शाखेच्या वतीने तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले. सीए समीर लड्डा यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामांविषयी तसेच राबविलेल्या योजनांविषयी माहिती दिली. सर्व सहकारी व कर्मचारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
आयसीएआय पुणे शाखेची सुरुवात १९६२ मध्ये झाली. आज पुणे शाखेचे १०,००० पेक्षा अधिक सभासद आहेत. तर २२००० पेक्षा जास्त विद्यार्थी पुणे शाखेशी संलग्नित आहेत. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवन येथे अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या संस्थेत सनदी लेखापालांसाठी अनेक उपक्रमांचे आयोजन वर्षभर केले जाते. त्यामध्ये कार्यशाळा, चर्चासत्रे आदी गोष्टींचा समावेश आहे.

