बीव्हीजी व डिक्की शेतकरी उद्योजक घडवणार : मिलिंद कांबळे

Date:

पुणे :
बीव्हीजी उद्योग समुह व दलित चेंबर ऑफ कॉमर्स (डीक्की) आगामी काळात शेतकरी उद्योजक उभारणार असल्याचे प्रतिपादन डीक्कीचे अध्यक्ष श्री. मिलिंद कांबळे यांनी केले.
बीव्हीजी लाईफ सायन्सेसतर्फे आयोजित केलेल्या खरीप नियोजन शेतकरी मेळाव्यात श्री. कांबळे बोलत होते. यावेळी बीव्हीजी समुहाचे चेअरमन श्री. हणमंतराव गायकवाड, हास्य क्लबचे श्री. मकरंद टिल्लू, विश्वशांती इंटरनॅशनल फाऊंडेशनचे डॉ. दत्ता कोहीनकर, श्री. वसंत हणकारे, श्री. प्रमोद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. कांबळे म्हणाले की, विषमुक्त शेतमाल विक्रीची बाजारपेठ निर्माण करणे ही काळाची गरज आहे. परदेशी बाजारपेठेत भारतीय विषमुक्त शेतमालास मोठी मागणी आहे. मात्र, त्याचवेळी रासायनिक शेतीमध्ये अतिरिक्त उत्पादनाचा अट्टाहास टाळून उत्पादित केलेल्या शेतमालास देशांतर्गत बाजारपेठ मिळवून देणेही तितकेच महत्वाचे आहे. अशावेळी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कमी खर्चात बीव्हीजी लाईफ सायन्सेसने आश्वासक चळवळ उभी केली आहे. श्री. हणमंतराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बीव्हीजी शेतीच्या क्षेत्रातही नक्कीच मोठा पल्ला गाठणार आहे. सध्याच्या हवामान बदलाच्या काळात बीव्हीजी कृषी तंत्रज्ञानाने शेतकरी टिकवला आहे.
यावेळी बोलताना श्री. गायकवाड म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. परंतु, आता शेती हा व्यवसाय म्हणून करणे गरजेचे आहे. शेतीवरचा खर्च कमी केलाच पाहिजे. जास्त उत्पादन मिळावे, या आशेने रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात होत आहेत. हे शेतीसाठी व मानवाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. म्हणून सर्वांनी विषमुक्त शेतीस प्राधान्य द्यावे. शेतकऱ्यांनी प्रथम माती व पाणी परिक्षण करुन घ्यावे. शेतीत नवनवीन जैविक खते व तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती हा यशस्वी व्यवसाय होईल. यापुढे प्रत्येक शेतकरी व नागरिकाने विषमुक्त शेतीसाठी प्रचार व प्रसाराबरोबर प्रत्यक्ष अनुकरण करावे. सध्या वाढलेले दुर्घर आजार हे आहारातून होत आहेत. म्हणून आता पुन्हा सेंद्रीय उत्पादन अर्थात विषमुक्त शेतीकडेच वळले पाहिजे. तरुणांना बाहेरच्या देशात नोकरी व व्यवसायासाठी मोठी संधी आहेत. प्रत्येकाकडे एक वेगळे कौशल्य आहे. त्याचा वापर करा. कौशल्य आधारित शिक्षण घेत व्यवसाय करा. यश नक्की मिळेलच संघर्ष जीवनाला घडवत असून भारत निर्माण कंपनी ही शेती, स्वच्छता, आरोग्य या क्षेत्रात मोठे काम करत आहे. नव्याने अनेक योजना राबवून देतांना सुमारे दहा कोटी जनतेच्या आयुष्यात परिवर्तन करण्याचा मनोदय असल्याचेही श्री. गायकवाड यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत बीव्हीजी लाईफ सायन्सेसचे संचालक श्री. गणेश लिमये यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्मिता पोफळे यांनी केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मी खोटं एफआयआर केल्याचे सिद्ध झाले तर मला जेल मध्ये टाका.. रोहित पवार आक्रमक

VSR आणि विमान वाहतूक मंत्र्याचे लागेबांधे बारामती - मी...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...