पुणे, ता. ३० – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या बीएमसीसी अमृत महोत्सवी वर्षास आजपासून प्रारंभ झाला.
आगामी काळात कौशल्य विकासाच्या कार्यक्रमांना बीएमसीसीत प्राधान्य देणार असून, सामाजिकदृष्ट्या मागास समाजाला उद्योग व स्वयंरोजगाराच्या संधींबद्दल मार्गदर्शन करणार असल्याचे महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण शाळिग्राम यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. डॉ. शैलजा देसाई, डॉ. राजश्री गोखले, प्र. के. घाणेकर यांनी मनोगत व्यक्त केली. उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, प्रा. सुरेश वाघमारे, डॉ. आशिष पुराणीक, रजिस्टार संजय गोसावी यांनी संयोजन केले.
पर्यावरणाचे अभ्यासक प्र. के. घाणेकर यांच्या हस्ते महाविद्यालयात ७५ रोपे लावण्यात आली. किशोर लोहोकरे, श्रीकृष्ण बर्वे, अरुण निम्हण, बाळासाहेब गांजवे या माजी विद्यार्थ्यांची प्रमुख उपस्थिती होती.