पुणे : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुरेंद्र पठारे फाऊंडेशनतर्फे येत्या मंगळवारी (ता. २६ जानेवारी) सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. कै. राजाराम भिकू पठारे इनडोअर स्टेडियम, खराडीगाव येथे हे शिबीर होणार आहे. सोशल डिस्टंसिंग व अन्य नियमांचे पालन करून हे शिबीर होणार आहे.’कोविड-१९’मुळे राज्यात अनेक ठिकाणी रक्ताची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना हातभार लावावा, या विचारातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. अधिकाधिक रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी केले आहे.
सुरेंद्र पठारे फाऊंडेशनतर्फे मंगळवारी (ता. २६) रक्तदान
Date:

